Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २८, २०२२

नागपूर येथे भारतीय महसूल सेवेच्या 76 व्या तुकडीच्या प्रवेशपुर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन Inauguration of Induction Training of the 76th Batch of Indian Revenue Service in NADT, Nagpur



Inauguration of Induction Training of the 76th Batch of Indian Revenue Service in NADT, Nagpur

The Inauguration Ceremony of the Induction Training for 76th batch of 59 IRS officers and 02 officers of the Royal Bhutan Service was conducted on 28th December, 2022 at the National Academy of Direct Taxes (NADT), Nagpur. Smt. Anuja Sarangi, Hon'ble Member, Central Board of Direct Taxeswas the Chief Guest on the occasion. Senior officers heading various Central and State Government organizations and senior officers from the Income Tax Department, Nagpur were present on the occasion.

The National Academy of Direct Taxes, Nagpur is the apex training institute for the Indian Revenue Service Officers (Income Tax) of the Government of India. The IRS Officers are recruited through the Civil Services Examination (CSE) conducted by the Union Public Service Commission (UPSC). The direct recruit IRS Officers undergo Induction Training of about 16 months before being posted to field offices. During their training, the Officer Trainees are trained on various aspects of tax administration and are provided specialized inputs in Income Tax Laws, jurisprudence as well as Allied laws, General Laws and Business laws.

The 76th Batch of IRS Comprises of 61 Officer Trainees including 25 women (41%). 38% of Officer Trainees of the batch are from rural background and the rest are from urban or semi-urban background. As far as educational background of the Officer Trainees is concerned, around 2/3rd of the Officer Trainees are from Engineering background. For about half of the batch it is their first job.

The Chief Guest, Smt. Anuja Sarangi, Hon'ble Member, while addressing the new entrants, at the outset, congratulated the Officer Trainees for getting into Indian Revenue Service. She acknowledged the role of Indian Revenue Service and importance of Income Tax Department in Government's policy formulation. She emphasized the importance of tax laws and various other laws as a part of training. She pointed out the importance of academics, law, accounting and allied acts for training of Officer Trainees. Discipline, integrity, humility, ethics and sense ofcommitment as public servant was a part of oath given to officer trainees. She has discussed the vision of department with values of transparency, progressive taxation and voluntary compliance. She has pointed out the importance of faceless scheme and departments other key initiatives for better tax services. She discussed increasing Direct Tax collection and creation of new infrastructure for country.

Team NADT led by Shri Sanjay Puri, Pr. DG (Trg.), NADT, expressed their heartfelt gratitude to the dignitaries for taking their time out of their busy schedule and for their valuable guidance to the young Officer Trainees of the 76th batch of IRS.





नागपूर 28 डिसेंबर 2022

सचोटी, नम्रता, नैतिकता आणि लोकसेवक म्हणून बांधिलकीची भावना हे घटक प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी आत्मसात केले पाहिजे. पारदर्शकता, प्रगतीशील कर आकारणी आणि ऐच्छिक अनुपालन या मूल्यांसह आयकर विभाग नव्या दृष्टीकोनातून काम करत असून फेसलेस योजना आणि चांगल्या कर सेवांसाठी विभागांच्या इतर प्रमुख उपक्रमानांही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सदस्या श्रीमती. अनुजा सारंगी यांनी केले . भारतीय महसूल सेवेतील 59 आय आर एस अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेतील 02 अधिकाऱ्यांच्या 76 व्या तुकडीसाठी प्रवेश प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा आज राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी - नॅशनल अॅकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस - एनएडीटी नागपूर येथे झाला,याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी एनएडीटी नागपूरचे प्रमुख महासंचालक संजय पुरी उपस्थित होते,

सारंगी यांनी प्रारंभीच संबोधित करताना, अधिकारी प्रशिक्षणार्थींचे भारतीय महसूल सेवेत प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले. भारतीय महसूल सेवेची भूमिका आणि सरकारच्या धोरण निर्मितीमध्ये आयकर विभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर ही भारत सरकारच्या भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांसाठी असणारी सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. नागरी सेवा परीक्षेद्वारे भरती झालेले आयआरएस अधिकारी 16 महिन्यांचे प्रवेश पुर्व प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर प्रशासनाच्या विविध पैलूंवर प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना प्राप्तिकर कायदे, न्यायशास्त्र तसेच संबंधित कायदे, सामान्य कायदे आणि व्यवसाय कायदे यासंबंधी विशेष माहिती दिली जाते.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना वित्त आणि लेखा प्रणालीवर सखोल प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थींना करचोरी आणि मनी लाँड्रिंगसह कर प्रकरणे आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये तपासासाठी तयार करण्यासाठी फायनान्शियल फॉरेन्सिक्स आणि सायबर फॉरेन्सिक्समधील तपशील देखील दिले जातात. प्रशिक्षणार्थी यांना विशेषतः करदाता सेवा आणि इतर सार्वजनिक सेवा तसेच माहितीचा अधिकार इत्यादींबाबत संवेदनशील केल जाते. प्रशिक्षणाच्या व्यावहारिक बाबींमध्ये आयकर विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी तसेच संसदेसह भारतातील विविध संवैधानिक संस्था तसेच आरबीआय , एसबीआय , एनएसडीएल सारख्या वैधानिक संस्थांशी ॲटेचमेंट कार्यक्रमांचाही समावेश यात असतो .

76 व्या तुकडीत 25 महिलांसह (41% प्रमाण ) 61 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. बॅचचे 38% अधिकारी प्रशिक्षणार्थी ग्रामीण पार्श्वभूमीतील आहेत आणि उर्वरित शहरी किंवा निमशहरी पार्श्वभूमीतील आहेत. अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा संबंध आहे, सुमारे 2/3 अधिकारी प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत. सुमारे अर्ध्या बॅचसाठी ही त्यांची पहिलीच नोकरी आहे.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि दर्जेदार करदाता सेवा देण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये सदर प्रशिक्षण सुनिश्चित करते. इंडक्शन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, अधिकारी प्रशिक्षणार्थींना संपूर्ण भारतातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून नियुक्त केले जाते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.