Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै ११, २०२३

पूजा मानमोडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले संकल्पपत्र




पूजा मानमोडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले संकल्पपत्र 

शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांची कन्या पूजा मानमोडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक संकल्पपत्र भेट दिले. त्यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि उद्धव ठाकरे हा यांच्या मार्गदर्शनात एक नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. (Pooja Manmode, Shiv Sena chief Uddhav Thackeray )

उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, सोमवारी नागपूर येथील कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी पूजा मानमोडे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी एक संकल्पपत्र भेट दिले. या संकल्पपत्रात पूजा मानमोडे यांनी लिहले आहे की, वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आम्हा तरुणांना आजही प्रेरित करते.

बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा कोकणातील सागरी लाटातून, सह्याद्रीच्या माथ्यातून, वारीच्या भजनातून आणि विदर्भाच्या वनराईतून पुन्हा मिरवायचा आहे.

महाराष्ट्रातील तमाम तरुणांना
बाळासाहेबांच्या आशीर्वादाची, उद्धवसाहेब, आपल्या मार्गदर्शनाची
आणि आदित्यसाहेबांच्या सोबतीची गरज आहे.

शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकला पाहिजे, यासाठी माझ्यासारखे नवतरुण एकत्र येतील आणि आपणास बळ देतील.

साहेब, आपण फक्त पुढे व्हा..
आम्ही सारे आपल्या सोबत आहोत..

शिवस्वराज्य पुन्हा स्थापन करण्यासाठी तुम्ही स्वराज्याची "मशाल" पेटवा...

ती घराघरात पोहोचविण्यासाठी पुढचे प्रत्येक पाऊल आपल्यासोबत पडेल.

आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो, हीच प्रार्थना!

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.