Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै १३, २०२३

लोकमतच्या त्या बातमीत तथ्य नाही; या नेत्याने दिले स्पष्टीकरण #lokmat #news #jayantpatil

लोकमतच्या त्या बातमीत तथ्य नाही; या नेत्याने दिले स्पष्टीकरण 

 

दैनिक लोकमतने ऑनलाईन प्रसिद्धीस दिलेली बातमी माझ्या वाचनात आली. बातमीत दिल्याप्रमाणे कोणतेही तथ्य नसून मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबतच आहे. पवार साहेबांच्या सोबत असणारे आम्ही सर्व आमदार साहेबांच्या विचारधारेवर ठाम आहोत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी  दिले. 



लोकमत न्यूज नेटवर्कने आपल्या वृत्तात म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील यांना आपल्या गटात खेचून आणण्याच्या हालचाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने सुरू केल्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र, दैनिक लोकमतने ऑनलाईन प्रसिद्धीस दिलेली बातमी कोणतेही तथ्य नसल्याचे जयंत पाटील यांनी ट्विट करून सांगितले आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.