Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै ०९, २०२३

या जिल्ह्यात जोरदार पाऊस; नदीला आला पूर Heavy rains




अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि #अकोला #बुलढाणा #नागपूरमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

#अकोला जिल्ह्यात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पेरण्यांना प्रारंभ झाला असून नदी नाल्यांना पूर आला आहे. अकोला जिल्ह्यातील #पूर्णा_नदीची जलपातळी वाढल्याने गांधीग्राम येथील काही महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला पूल हा पाण्याखाली गेला आहे.

#गोंदिया:
गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गोंदिया शहराच्या जवळून वाहणाऱ्या #पांगोली_नदीच्या पाणीपत्रात देखील वाढ झाली आहे. या नदीवर बारब्रिक्स कंपनीच्या वतीने पुलाचे बांधकाम सुरू आहे.
#Gondia

दिल्ली, हिमाचल, पंजाबसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्लीत ४१ वर्षांचा विक्रम मोडला. १९८२ पासून जुलैमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक १५३ मिमी पाऊस झाला. यापूर्वी २५ जुलै १९८२ रोजी १६९.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. २००३ मध्ये २४ तासांत १३३.४ मिमी पाऊस झाला.

आणि २०१३ मध्ये दिल्लीत १२३.४ मिमी पाऊस पडला होता. जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये पोशाना नदी ओलांडताना पावसामुळे लष्कराचे दोन जवान बुडाले. त्याच वेळी हिमाचलमध्ये ५, जम्मूमध्ये २ आणि यूपीमध्ये ४ लोकांचा मृत्यू झाला. हिमाचलमध्ये बियास नदीने बरेच नुकसान केले आहे. नदीत पूल वाहूनयेत्या २४ तासात मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरान , त्रिपुरा, ओडिशा, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मुसळधार
Light to moderate rainfall very likely to occur at few places over Amravati district of and light to moderate rainfall very likely to occur at isolated places over #Akola #Buldhana #Nagpur



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.