वाढोणा, (वा.). नागभीड तालुक्यातील नांदेड- पूलगाव या आडवळणावरील अगदी जवळच्या असलेल्या मार्गाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गाची दुरवस्था दिवसागणिक वाढत चालली आहे. हा मार्ग उंच व खोलवटांनी भरलेला आहे. या मार्गांवर डांबरीकरण करा, अशी मागणी दिपक खोब्रागडे जिल्हा सचिव, राकाँपा यांनी केली आहे.
नांदेड गावातील बाजार परिसरातून नांदेड- पूलगाव हा अगदी जवळचा 4 किमी. अंतराचा मार्ग अस्तित्वात आहे. नांदेडहून पूलगावला जाताना सुरुवातीस मार्गाच्या काही थोड्या फार भागात जुने डांबरीकरण झाले आहे. मात्र त्यापुढील वाट मोठी खडतर आहे. जागोजागी मार्गात उंच व खोलवटा आहे आणि
नांदेड- पूलगाव मार्गावर थोड्या भागात डांबरीकरण केलेला आहे. तो ही आता उखडत चालला आहे. बाकी सर्व मार्ग दुरवस्थेत गेलेला आहे. साधे खडीकरणही या मार्गावर करण्यात आले नाही. हा मार्ग जवळचा असल्याने या मार्गाने नागरिक कसे बसे त्रास सहन करून प्रवास करीतच असतात. हे फार जिकरीचे आहे.
नांदेड- ड-पूलगाव हा मार्ग नागरिकांच्या सोईचा मार्ग आहे. या मार्गाला अन्य छोटे गाव जुडलेले आहे. यामुळे या मार्गाने नागरिकांचे नेहमीच जाणे-येणे सुरू असते. मात्र या मार्गाची अवस्था फार वाईट असल्याने लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गांचे डांबरीकरण करने अत्यंत गरजेचे आहे.
खड्ड्यासारखा खोलगट भाग पडलेला आहे. या मार्गातील पुलांची अवस्था फार बिकट झालेली आहे. या परिसरात नांदेड हे मोठे गाव असल्याने कोजी वैजापूर आदी गावातील नागरिक पूलगाव हून नांदेडला बाजार आदी कामांसाठी दररोज ये-जा करीत असतान