Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै ०९, २०२३

उद्धव ठाकरे यांचे नागपूर आगमन होताच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला हा इशारा | Uddhav Thackeray Nagpur




विदर्भ दौऱ्यातील पहिल्या टप्प्यासाठी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे @OfficeofUT @uddhavthackeray ह्यांचे आज नागपूर येथे आगमन झाले.ह्यावेळी #शिवसैनिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. नागपूर-यवतमाळ मार्गावर स्वागतासाठी उभ्या असलेल्या शिवसैनिकांसोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गाडीतून उतरुन संवाद साधला. #UddhavThackeray #ShivsenaUBT 

त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर प्रखर टीका केली आहे.


This warning was given by the state president of BJP as soon as Uddhav Thackeray arrived in Nagpur

सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही
विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय, असेही बावनकुळे म्हणाले.


सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावं लागतंय.
उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचं ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे.

उद्धव ठाकरे तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळालं हेही एकदा जनतेला सांगून टाका, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मजबुरी आहे, म्हणून उद्धव ठाकरे दौऱ्यावर जात आहेत. काय करतील ते? करोनामध्ये दौरा केला असता तर कदाचित एकनाथ शिंदे आमच्याकडे आलेच नसते. अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 

#MaharashtraPoliticalCrisis #UddhavThackeray #EknathShinde #SudhirMungantiwars @SMungantiwar




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.