Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०४, २०२२

नवेगावबांध वनक्षेत्रात हत्याच्या हल्ल्यात एक ठार.तिडका जब्बार खेडा परिसरातील घटना.



 
संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.४ ऑक्टोबर:-
नवेगावबाध वन परिक्षेत्रातील तिडका जंगलालगत शेत शिवारात हत्त्यांच्या हल्यामध्ये तिडका निवासी सुरेंद्र जेठू कळईबाग वय 55 या आदिवासी शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर जवरू पोरेटी वय 45 हा आदिवासी शेतकरी जखमी झाला आहे. 
अर्जुनी-मोर तालुक्यातील तिडका या आदिवासीबहुल गावातील परिसरामध्ये मागील 29 तारखेपासून हत्तींचे वास्तव्य आहे.आदिवासी च्या उपजीविकेचे साधन म्हणून शेतीचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते . हत्तीच्या होणाऱ्या नुकसानीपासून आपल्या शेतीचे रक्षण व्हावे,याकरिता तिडका वासियांनी वनविभागाची च्या सूचनेनुसार आपल्या शेतीचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण  गावकरी एकत्र येवून त्यांनी काल रात्रीला हत्तीचा कळप पळवून लावण्यासाठी डफळी, वाजे आणि मशाली पेटवून  आपल्या शेतांचे  रक्षण करण्याचा प्रयत्न केला .
हत्तीचा कळप  त्यामुळे जंगलाच्या दिशेने  पळून गेला . सकाळी जंगलातील हत्तीमुळे  आपल्या शेताचेचे नुकसान झाले तर नाही ना? या दृष्टिकोनातून पंचवीस ते तीस आदिवासी शेतकरी शेत शिवार मध्ये गेले असता लोकांचा समूह पाहून विश्रांती करीत असलेल्या हत्त्यांनी अचानक गावकऱ्यांवर हल्ला केला. सदर हल्ल्यामध्ये एक आदिवासी शेतकरी जाग्यावरच मृत पडला.तर एक शेतकरी जखमी  झाला. सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले व पोलिसांच्या मदतीने मृतदेह नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता घेऊन आले. जखमी व्यक्तीला सुद्धा नवेगावबांध येथील  ग्रामीण रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आलेले आहे .
सदर घटना ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे. सदर हत्तीच्या कळपाचा तसेच वाघाचा व इतर हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त वन विभागाच्या वतीने करण्यात यावा.अशी जोरदार मागणी आदिवासी शेतकऱ्यांनी केलेली आहे .
गोंदिया वनविभाग अंतर्गत नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र जब्बारटोला मधील कक्ष क्र. १९७ चे राखीव वनात झाशीनगर उपसा सिंचनच्या कालव्याशेजारी 
 मागिल १० दिवसांपासुन अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्तीच्या कळपाने  धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे.यादरम्यान झाशीनगर उपसा सिंचनच्या कॅनल जवळ कक्ष क्र.१९१राखीव वन जब्बारटोला बिटामध्ये सदर घटना घडलेली आहे.२४सप्टेंबर २०२२ रोजी गोंदिया वनविभागाचे हद्दीमध्ये हत्तींच्या कळपाने प्रवेश केल्यापासून सर्व गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वन विभागाकडून जनजागृती केली जात आहे.वनविभागाचे ६०ते७०कर्मचारी दिवस-रात्र हत्तीचे संनियंत्रण करीत आहेत.तसेच झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्याचे प्रयत्न सुद्धा केले जात आहे. तरीसुद्धा नागरिकांनी हत्तींना पळवून लावण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सदर घटना घडली.असा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.