समाजावरील वाईट विचारांचे ओझी कमी करा.- पोलीस उपनिरीक्षक शेख
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.19 नोव्हेंबर:- आपल्या समाजावर ज्या काही वाईट विचारांचं ओझं आहे, ते ओझं झटकून कमी करून, नवविचारांचा समाज घडविण्याच्या कामी सर्वांनी पुढे यावे. असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक शेख धाबे पवनी पोलिस सशस्त्र दूरक्षेत्र केंद्र यांनी केले आहे.
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती उत्सवानिमित्य आयोजित येथील क्रांतीपर्व क्रांतीचौक येथे आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी शुक्रवारला दुपारी एक वाजता समाज प्रबोधन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदन कौरेथी हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच अनिरुद्ध शहारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून तुळशीदास कुंभरे, रामू फरदे ,रेवचंद शहारे,शहारेताई,देवरी येथील रामेश्वर वाघाडे, प्रकाश गावडकर, संचीत वाळवे, रणवीर ढोक, भास्कर बडोले, इंदुरकर, ग्रामपंचायत सदस्य शितल राऊत, लिलाबाई सांगोळकर अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रकाश गावडकर यांनी आपल्या भाषणातून आदिवासींची दशा आणि दिशा यावर प्रकाश टाकला. उलगुलान चळवळीची माहिती संचित वाळवे यांनी देऊन, त्याबरोबरच आदिवासींच्या खऱ्या संस्कृतीची ओळख देखील त्यांनी करून दिली. रामेश्वर वाघाडे यांनी बिरसा मुंडा यांचे जीवन चरित्रावर, त्यांच्या पंचवीस वर्षाच्या आयुष्या चा आलेख उपस्थितांसमोर मांडला. रामू फरदे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनातील काही प्रसंग आपल्या भाषणातून मांडले. समाजाला संघटित करण्याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन मदन कौरेथी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. पिंपळगाव कोहळी येथील बिरसा मुंडा डान्स ग्रुप यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली चाचेरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सपना बनसोड यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सुनंदा येल्ले यांनी मानले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांती पर्व, क्रांती चौकातील सर्व महिला पुरुषांनी सहकार्य केले.