चंद्रपूर : शहरातील अरविंदनगर भागात नकली पिस्तोलचा धाक दाखवून बेड रूम मधील पलंगामधील थैल्यात भरून ठेवलेले १,७३,००,०००/- रोकड लंपास करण्यात आली. दरोडेखोरानी पांढऱ्या रंगाच्या वाहानाने पोबारा केला. या प्रकरणी नाजनीन हारून कोळसावाला यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. घरी आई, सासु हजर असताना पाच अनोळखी दरोडेखोरांनी घरात घुसुन गळ्याला चाकु लावुन तोंड दाबून चोरी केल्याचे तक्रारीत म्हंटले. गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा सायबर सेलच्या मदतीने शोध घेवून डी. बी. पथकानी दोन आरोपीतांना नागपुर येथून ताब्यात घेतले.
रामनगर पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील अधिकारी हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक भुरले व पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे व गोपनिय बातमिदार यांच्या माहिती प्रमाणे गुन्हयातील अज्ञात आरोपीना शोध घेतला. एक डी.बी. पथक नागपुर येथे रवाना झाले. पोउपनि विनोद भुरले हे डी.बी. पथकासह बल्लारशाह, राजुरा येथे गुन्हयात वापरलेले वाहन जप्त करण्यास रवाना झाले. गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा सायबर सेलच्या मदतीने शोध घेवून डी. बी. पथकानी दोन आरोपीतांना नागपुर येथून ताब्यात घेतले.पोलिसांनी वाहन हुन्डाई आय २० व महिंद्रा बोलेरो चार चाकी वाहन जप्त केले. दरोडा घालुन चोरून नेलेले १,७३,००,०००/- रुपये संपूर्ण रक्कम, एक नकली पिस्तुल किमंत ५०० रुपये, एक फोल्डींग वाला स्टिलचा लाकडी मुठ असलेला चाकु किमंत २०० रु. असा एकुण एक कोटी, ८८ लाख, ७०० रुपये तसेच गुन्हयात वापरलेली गाडी, हत्यार चाकु व पिस्तोल जप्त करण्यात आले. गुन्हयातील 4 आरोपी इमरान शेख, शाहबाज बेग, शुभम उर्फ मायाभाई दाचेवार सर्व चंद्रपुर येथील आहेत .
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक मधुकर गिते, सहाय्यक पोलिस निरिक्षक हर्षल एकरे, पोलीस उप निरीक्षक विनोद भुरले, पोलीस हवालदार रजनीकांत पुठ्ठावार, प्रशात शेंदरे, पुरुषोत्तम चिकाटे, विनोद यादव, पेतरस सिडाम, किशारे वैरागडे, आंनद खरात, पांडुरंग वाघमोडे, निलेश मुडे, सतिश अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, माजीद पठान, हिरालाल गुप्ता, भावना, गजानन डोईफोडे तसेच सायबर सेल, चंद्रपुर येथील पोलस कर्मचारी यांनी केली.
#chandrapur #police #ramnagar