Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १३, २०२२

पूल व रस्ते महत्वाची भूमिका बजावतात.सगळी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करा.-पालकमंत्री प्राजक्त तनपुरे.पांढरी जि.प.क्षेत्रात विविध विकास कामांचे भूमिपूजन.



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.13 एप्रिल:-
सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी जि.प.क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन १०एप्रिल मंगळवारला गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री नगरविकास,ऊर्जा, आदिवासी विकास,उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री ना. प्राजक्त तनपूरे यांचे हस्ते करण्यात आले.
 रस्त्याचे जाळे हा महत्त्वाचा घटक असून, ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रस्ते व पूल महत्त्वाची भूमिका बजावतात.ही सगळी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करा. अशा सुचना पालकमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी यांनी बांधकाम विभागाला केल्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पांढरी जि.प.क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.पांढरी जि.प.क्षेत्रांतर्गत कोसमतोंडी-पांढरी-जांभळी रस्ता प्रजिमा ३९किमी. ५/६०० मध्ये मोठ्या पूलाचे बांधकाम व कोसमतोंडी-थाडेझरी रस्ता इजिमा ८३ साखळी क्र.१/५०० मध्ये पूलाचे बांधकाम या दोन्ही  सहा कोटी पस्तीस लाख से चाळीस हजार खर्चाचे कामाचे भूमिपूजन पालकमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी केले.
  यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापूरे,माजी आमदार राजेंद्र जैन,जि.प.सदस्या सुधा राहांगडाले,पं.स.सदस्या संगिता खोब्रागडे,पं.स.सदस्या निशा काशिवार, गंगाधर परशुरामकर जिल्हाध्यक्ष राकापा, अविनाश काशिवार सहायक अभियंता संचित शिंदे,कनिष्ठ अभियंता मो.शफीउद्दीन, सरपंच सविता पारधी,डी.यु.राहांगडाले, सरपंच गुलाब तोंडफोडे,सरपंच महेंद्र पशिने, उपसरपंच अश्विनी काशिवार, उपसरपंच ज्ञानेश्वर बिसेन उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.