Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी ०५, २०२२

चारगाव धरणाच्या शेजारच्या शेतात आढळले पक्षांसाठी लावलेले फासे #chandrapur #charagon

चारगाव धरणाच्या शेजारच्या शेतात आढळले पक्षांसाठी लावलेले फासे



चारगाव धरण लगतच्या शेतीत, हरभऱ्याच्या शेतामध्ये, पक्षी पकडण्यासाठी नायलॉन चे पक्षी पकडण्यासाठी लावण्यात आलेले फासे आढळले. अशी माहिती हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे सदस्य अंकित बाकडे, कृपाल नाकाडे,करण तोगट्टीवार, गोलू चट्टे यांनी दिली आहे. ते पक्षी निरिक्षणासाठी गेले असता, हा प्रकार लक्षात आला. त्यांनी फासे काढून टाकले ,व चारगाव धरण लगतच्या शेतकऱ्यांना स्थलांतरित पक्ष्यांचे मह्त्व पटवून दिले, स्थानिक शेतकऱ्यांना अनेक स्थलांतरित पक्षी असल्याची माहिती आहे,काशिनाथ गजभे यांच्या शेतीत करका, बाड्डया,बगळे, मोठे बगळे, करकोचे, रंगीत करकोचे येत असल्याचे त्यांनी सांगितले आपण सुद्धा अश्या प्रकारे पक्षी निरीक्षण करतो असे सांगितले.


ह्या धरणावरती हिवाळ्यात स्तलांतरित पक्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून असंख्य संख्येने दरवर्षी येत असतात. स्थ


सायबेरिया, मंगोलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, यूरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अलास्का, अश्या बर्फाड प्रदेशातून आपल्या विदर्भात पोषक अश्या वातावरणात ते येतात अश्यात पट्टकदंब (Bar-headed goose ) जे माऊंट एवरेस्ट च्या वरून येणारे एकमेव पक्षी चारगाव धरणामध्ये मोठ्या संख्येने येतात, समुद्र सपाटीच्या ६००० ते ९००० मीटर उंचावरून उडण्याची क्षमता ह्या पक्षात आहे.



एवढा संघर्ष करून हे पक्षी आपल्या भागात पाहुणे म्हणून येतात आणि गावातील शेतकरी पक्षी पकडण्यासाठी फासे लावत आहे ,चारगाव धरण मध्ये येणाऱ्या गावांचे १९७६-७७ मध्ये पाट-बंधारे विभागा अंतर्गत पुनर्वसन झालेले गाव म्हणजे अकोला, अकोला-२, राळेगाव, बोरगाव-कवडशी, ज्या शेतामध्ये नायलॉन चे पक्षी पकडण्यासाठी फासे लावण्यात आले होते, त्याच्या लगतच पट्टकदंब (Bar-headed goose ) व अनेक पक्षी होते, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे सदस्यांनी अकोला गावातील सरपंच पुंडलिक नन्नावरे यांना भेटून पक्ष्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फास्याबद्दल बद्दल माहिती देण्यात आली त्यांनी गावातील शेतकऱ्यांना सक्त ताकीद देऊन पक्षी संवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल टाकलं, याच्यापुढे कुठल्याही शेतकऱ्याला फासे लावू देणार नाही असे आश्वासन दिले.



हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे पक्षी अभ्यासक अंकित बाकडे, कृपाल नाकाडे,करण तोगट्टीवार , गोलू चट्टे यांनी पक्षासाठी लावलेले फासे काढून टाकले ,व चारगाव धरण लगतच्या शेतकऱ्यांना स्थलांतरित पक्ष्यांचे मह्त्व पटवून दिले, स्थानिक शेतकऱ्यांना अनेक स्थलांतरित पक्षी असल्याची माहिती आहे,काशिनाथ गजभे यांच्या शेतीत करका, बाड्डया,बगळे, मोठे बगळे, करकोचे, रंगीत करकोचे येत असल्याचे त्यांनी सांगितले आपण सुद्धा अश्या प्रकारे पक्षी निरीक्षण करतो असे सांगितले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.