Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर १९, २०२१

तांब्याच्या (copper) पात्रात पाणी पिल्यास शरीराला कोणते फायदे होतात?

तांब्याच्या (copper) पात्रात पाणी पिल्यास शरीराला कोणते फायदे होतात?



तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे


तांबाच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे आणि तांब्याच्या भांड्यात जेवण बनवण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळं आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. तसंच. पचनशक्ती चांगली होते. कर्करोगाच्या धोका टळण्यास मदत होते.



सर्दी, खोकल्याचा सततचा त्रास असलेल्यांसाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी उपयुक्त असते. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी आॅक्सिडेंट्स असतात. त्यामुळं कर्करोगाचा धोका कमी होतो. रोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानं पूर्ण दिवस शरीरात ऊर्जा राहते.



पोटाचे विकार दूर होतात


पोटाचे कोणतेही विकार झाल्यास तांबाच्या भांड्यातील पाणी प्यावे. अतिसार, जळजळ असे रोग निर्माण करणारे जीवाणू तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यानं नष्ट होतात. पोटदुखी,गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्टताही दूर होते. यकृत आणि मूत्रपिंड निरोगी राहण्यास मदत होते.




बाटली फ्रिजमध्ये ठेवू नका. तांब्याच्या बाटलीत साचलेले पाणी पिण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी.दिवसातून दोन वेळा (सकाळ आणि संध्याकाळी). तांबेच्या बाटलीमध्ये साचलेले पाणी पिणे आपल्या शरीरा मध्ये आवश्यक प्रमाणात तांबे प्रदान करण्यासाठी पुरेसे असते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) प्रति कप तांबे 0.47 मिलीग्रामपेक्षा जास्त न घेण्याची शिफारस करतो ( 2 मिलिग्रॅम / लिटर). आणि हे सुनिश्चित करते की दररोज 10 मिलीग्रामच्या सहनशील उच्च पातळीची पातळी ओलांडली जाणार नाही.

तांब्याच्या भांड्यात पिण्याचे पाणी साठवून ठेवल्यास तुमची रोगप्रतिकार शक्ती सुधारते, पचन त्वरित वाढते, जखमेच्या बरे होण्याची वेळ कमी होते . तांबे पाण्याच्या बाटल्यांच्या इतर सांगितल्या गेलेल्या आरोग्य फायद्यांमध्ये संयुक्त आरोग्य, लोह शोषण, थायरॉईड आरोग्य आणि चांगले पचन यांचा समावेश आहे.



संधिवातासाठी उपयोगी

तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते. तसंच, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळं शरीरातील युरिक अॅसिड कमी होते. त्यामुळं संधिवाताची समस्या दूर होते.


त्वचाविकार दूर होतात!


दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर फोड्या, तारुण्यपीटिका वा सुरकुत्या पडत नाहीत. त्यामुळं सैांदर्य टिकण्यास मदत होते.




copper-water-is-beneficial/







SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.