Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल ०७, २०२३

चंद्रपुरात मोफत शस्त्रक्रिया करून वाचविले रुग्णाचे प्राण | Health News Chandrapur

चंद्रपुरात मोफत शस्त्रक्रिया करून वाचविले रुग्णाचे प्राण | Health News Chandrapur
Health News Chandrapur


ख्रिश्चन कॉलनीतील रहिवासी असलेला सतीश देवगडे हा मागील काही महिन्यांपासून मूत्रविकाराने त्रस्त होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याचा मूत्र मार्ग पूर्णपणे बंद झाला. त्यानंतर एका रुग्णालयाने तात्पुरता इलाज म्हणून मूत्रपिशवी लावून दिली.मात्र, ही पिशवी घेऊन फिरणे कठीण झाले होते. (Health News Chandrapur)

सतीशला चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथून त्याला नागपूर येथे रेफर करण्याचा सल्ला देण्यात आला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नागपूर येथे जाणे शक्य नव्हते. त्यानंतर, ख्रिस्ती विकास समितीचे अध्यक्ष विजय नळे यांनी यांसदर्भात येथील मूत्ररोगतज्ज्ञ . 
Ghate Hospital डॉ. संजय घाटे यांना माहिती दिली. तसेच त्याच्या आर्थिक स्थितीबाबत डॉक्टरांना सांगितले. डॉ. घाटे यांनी वेळीच रुग्णाला आपल्या रुग्णालयात त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय होता. म्हणून रुग्णाची गरज ओळखून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी डॉ. बोरीकर, डॉ. प्रशांत टोंगे यांनी मदत केली , सध्या रुग्ण धोक्याबाहेर असून, तो पूर्णपणे बरा होईल, असा विश्वास डॉ.  त्यांनी जपलेल्या सामाजिक जबाबदारीचे कौतुक होत आहे. यासाठी ख्रिस्ती विकास समितीने त्यांचे आभार मानले आहे. 



Smit digital media online shoping


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.