Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल ०७, २०२३

आपले नाव किंवा मोबाइल नंबर बदलला आहे? तुमच्या मुलाला अलीकडेच 5 किंवा 15 वर्ष झाले का? मग, करा आधार अपडेट aadhar update

आपले नाव किंवा मोबाइल नंबर बदलला आहे? तुमच्या मुलाला अलीकडेच 5 किंवा 15 वर्ष झाले का? मग, करा आधार अपडेट 







आधार कार्ड कुठे 
पडेट करावा
अलीकडे आपले नाव किंवा मोबाइल नंबर बदलला आहे? तुमच्या मुलाला अलीकडेच 5 किंवा 15 वर्ष झाले का? आपण जवळच्या नामांकन / अद्ययावत केंद्रावर आपला आधार तपशील (डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक्स) दुरुस्त / अद्ययावत करू शकता. त्यासाठी तुम्ही बँक, पोस्ट खाते किंवा सेतू केंद्रात भेट द्या 


आपल्या शहरातील जवळचे आधार अपडेट केंद्र शोधण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.



Enrolment Centre Found

आपण एका नव्या शहरात गेला आहात का? 
किंवा अलीकडे आपला पत्ता बदलला आहे? 
आपल्या नवीन पत्त्यावर आपला नवीन पत्ता अपडेट करण्यास विसरू नका. आपल्याकडे वैध पत्ता पुरावा आहे किंवा पत्ता प्रमाणीकरण पत्र प्राप्त झाले आहे (ज्याच्याकडे वैध पत्त्याचा पुरावा नसल्यास), आपण आपला पत्ता अद्ययावत करू शकता


How/Where can I update my details in Aadhaar?

There are 2 different ways you can get your details updated:-
• By Visiting Permanent Enrolment centre. Search nearest enrolment centre by clicking on “Locate Enrolment Center” on uidai.gov.in.
• Online using Self Service Update Portal (SSUP). Click “Update Aadhaar Details (Online)” on uidai.gov.in.


  • मला सुधारणेनंतर माझे आधार पत्र ऑनलाईन डाउनलोड करून मिळेल का?
होय, तुम्ही तुमची विनंती एकदा मान्य झाल्यानंतर तुम्ही ई-आधार ऑनलाईन डाउनलोड करू शकता. तुम्ही uidai.gov.in वर “डाउनलोड आधार” वर क्लिक करून तुमचे ई-आधार डाउनलोड करू शकता.


  • माझा आधार क्रमांक सुधारणेनंतर बदलेल का?
नाही, सुधारणेनंतरही तुमचा आधार क्रमांक तोच राहील.

  • मला सुधारणेनंतर पुन्हा आधार पत्र मिळेल का?
आधार पत्र जर नाव, पत्ता, जन्मतारीख व लिंग यामध्ये सुधारणा असेल तरच सुधारणांसहित दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल. मोबाईल क्रमांक/ईमेल पत्त्यात सुधारणेसाठी, दिलेल्या मोबाईलक्रमांकावर/ईमेल पत्त्यावर सूचना पाठवली जाईल.


  • आधारमध्ये सुधारणा करण्यासाठी किती वेळ लागतो?
आधारमध्ये विनंतीनंतर सुधारणा करण्यासाठी 90 दिवसांपर्यंतचा कालावधी लागतो.


  • जैवसांख्यिकी ऑनलाईन किंवा टपालाद्वारे सुधारित करण्याची काही पद्धत आहे का?
नाही, छायाचित्रासह सर्व जैवसांख्यिक सुधारणांसाठी तुम्हाला आधार कायमस्वरुपी नावनोंदणी केंद्राला समक्ष भेट द्यावी लागेल.


  • मला आधारमधील जैवसांख्यिकी (बोटांचे ठसे/डोळ्यांची बाहुली/छायाचित्र) सुधारित करता येईल का?
होय, तुम्ही आधारमधील जैवसांख्यिकी (बोटांचे ठसे/डोळ्यांची बाहुली/छायाचित्र) सुधारित करू शकता. जैवसांख्यिक सुधारणांसाठी, तुम्ही सर्वात जवळच्या कायमस्वरुपी नावनोंदणी केंद्राला भेट दिली पाहिजे.


  • विनंती सादर केल्यावर माहितीमध्ये खात्रीशीरपणे सुधारणा केली जाईल का?
माहितीमध्ये सुधारणा करण्यासाठी विनंती सादर केल्यावर आधार डेटामध्ये सुधारणा होईल अशी खात्री देता येत नाही. सादर केलेल्या माहितीची व वैधतेची पडताळणी केली जाईल. चुकीची माहिती सादर करणे/माहिती लपवणे यामुळे अर्ज फेटाळला जाईल.


  • मी टपालाद्वारे विनंती पाठवताना, केवळ एका क्षेत्रातच बदल हवा असला तरीही मला सगळ्या चौकटी भराव्या लागतील का?
होय, कोणत्याही चौकटीत/चौकटींमध्ये सुधारणा/दुरुस्ती करायची असली तरीही तुम्ही संपूर्ण अर्ज भरला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये सुधारणा/बदल करण्यासाठी मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे.तथापि, ईमेल पत्ता देणे ऐच्छिक आहे.तथापि,कोणत्या चौकटींमध्ये सुधारणा आवश्यक आहे हे अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद केले असले पाहिजे.


  • टपालाद्वारे/ऑनलाईन पोर्टलद्वारे सुधारणा विनंती सादर करताना मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे का?
होय, मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे, कारण तो अर्जदाराला बोलावण्यासाठी पडताळणीकरिता वापरला जाऊ शकतो. रहिवाशाला त्याच्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीविषयी एसएमएस पाठवून सूचना दिली जाईल. सुधारणेसाठी टपालाद्वारे/ऑनलाईन अर्ज मोबाईल क्रमांकाशिवाय असेल तर फेटाळला जाईल.


  • मी टपालाद्वारे माझी विनंती कुठे पाठवली पाहिजे?
आवेदन अर्ज सहाय्यक दस्तऐवजांसह युआयडीएआयला पाठवला पाहिजे. पाकिटावर “आधार सुधारणा/दुरुस्ती” असे लिहा. पाकिट व्यवस्थित बंद करा. तुम्ही पुढीलपैकी कोणत्याही पत्त्यावर नोंदणीकृत पत्राद्वारे सुधारणा विनंती पाठवू शकता: पत्ता
युआयडीएआय
पोस्ट बॉक्स क्र. 99
बंजारा हिल्स हैदराबाद- 500034 | भारत

  • मी टपालाद्वारे सुधारणा विनंती पाठविण्यासाठी कोणताही आवेदन अर्ज वापरला पाहिजे का?
होय, युआयडीएआयवर प्रकाशित करण्यात आलेला प्रमाणभूत “आधार डेटा सुधारणा/दुरुस्ती अर्ज” वापरा. uidai.gov.in वर “टपालाद्वारे सुधारणा विनंती”वर क्लिक करा.


  • मला इंग्रजीमध्ये तसेच स्थानिक भाषेमध्ये अर्ज भरावा लागेल का?
होय, एसएसयूपी तसेच टपालाद्वारे सुधारणा विनंती या दोन्हींच्या बाबतीत, अर्ज इंग्रजी तसेच स्थानिक भाषेत भरावा लागेल.तुम्ही आधारमध्ये नावनोंदणी करते वेळी वापरलेली व तुमच्या आधार पत्रात दिसणारी स्थानिक भाषाच वापरा.


  • माझा आधारमध्ये नोंदवलेला मोबाईल क्रमांक हरवला आहे/माझ्याजवळ नाही. मी सुधारणेची विनंती कशी सादर करू?
< Best Deal Harsh span style="font-size: medium;">तुम्ही आधारमध्ये नोंदवेलेला मोबाईल क्रमांक आता हरवला असेल/तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला मोबाईल क्रमांक सुधारित करण्यासाठी सर्वात जवळच्या आधार सुधारणा केंद्राला समक्ष जाऊन भेट द्यावी लागेल. या प्रकरणी तुम्ही टपालाद्वारे किंवा ऑनलाईन मोबाईल क्रमांक सुधारित करू शकत नाही.


  • माझा मोबाईल क्रमांक आधारमध्ये नोंदवलेला आहे मात्र मला त्याऐवजी दुसरा क्रमांक बदलायचा आहे. मला तो ऑनलाईन सुधारित करता येईल का?
होय, तुमचा मोबाईल क्रमांक आधीच नोंदवलेला असेल व तुमच्याकडे तो क्रमांक असेल, तर तुम्ही स्व सेवा सुधारणा पोर्टलद्वारे तुमचा दुसरा क्रमांक सुधारित करू शकता/बदलू शकता. तुम्हाला एसएसयूपीमध्ये एका वेळचा पासवर्ड (ओटीपी) घालावा लागेल जो तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पोहोचवला जाईल.


मी ज्या केंद्रावर नावनोंदणी केली होती, त्याच मूळ केंद्राला सुधारणेसाठी मला भेट द्यावी लागेल का?
नाही, तुम्ही सुधारणेसाठी कोणत्याही कायमस्वरुपी नावनोंदणी केंद्राला भेट देऊ शकता.


टपाल पद्धतीच्या संदर्भात सुधारणेसाठी सहाय्यक दस्तऐवजांच्या प्रती पाठविताना स्व-साक्ष्यांकन करणे आवश्यक आहे का?
होय, तुम्ही सुधारणेसाठी टपाल पद्धत वापरत असल्यास, सहाय्यक दस्तऐवज स्व-साक्ष्यांकित करणे आवश्यक आहे.

  • आधार तपशीलांमध्ये सुधारणा करण्यासाठी काही शुल्क आकारले जाते का?
होय, आधारच्या जनसांख्यिक किंवा जैवसांख्यिक माहिती सुधारणा करायची असेल, तर तुम्हाला प्रत्येक वेळी तपशील सुधारित करताना सेवा पुरवठादाराला 25/- रुपये द्यावे लागतील. तुम्ही युआयडीएआयने मंजुरी दिलेली शुल्क रचना पाहण्यासाठी uidai.gov.in वर “आधार केंद्रावर (पीईसी) विविध युआयडीएआय सेवांसाठी शुल्क” वर क्लिक करू शकता. 

  • मला नावनोंदणी केंद्रावर सुधारणा करण्यासाठी मूळ दस्तऐवज सोबत आणण्याची आवश्यकता आहे का?
होय, तुम्हाला नावनोंदणी केंद्रावर सुधारणा करण्यासाठी मूळ दस्तऐवज सोबत आणावे लागतील. मूळ दस्तऐवज स्कॅन केले जातील व सुधारणा केल्यानंतर तुम्हाला परत केले जातील.


  • मी सुधारणेसाठी टपालाची पद्धत वापरत असल्यास मला कोणते तपशील सुधारित करता येतील?
तुम्ही सुधारणेसाठी टपाल पद्धत वापरत असल्यास, तुम्ही तुमचे जनसांख्यिक तपशील सुधारित करू शकता (नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग व ईमेल).


  • मी सुधारणेसाठी ऑनलाईन स्व सेवा सुधारणा (एसएसयूपी) पोर्टल वापरत असल्यास मला कोणते तपशील सुधारित करता येतील?
तुम्ही जर सुधारणेसाठी ऑनलाईन स्व सेवा सुधारणा पोर्टल (एसएसयूपी) वापरत असाल, तर तुम्ही तुमचे जनसांख्यिक तपशील (नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल व ईमेल पत्ता) बदलू शकता.कृपया ही सेवा वापरताना तुमचा मोबाईल क्रमांक आधारमध्ये नोंदविलेला असेल याची खात्री करा.


  • मी सुधारणेसाठी कायमस्वरुपी नावनोंदणी केंद्राला भेट देणार असेल तर मला कोणते तपशील सुधारित करता येतील?
तुम्ही कायमस्वरुपी नावनोंदणी केंद्राला भेट देणार असाल, तर तुम्हाला दोन्ही जनसांख्यिकी (नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल व ईमेल पत्ता) व जैवसांख्यिकी (बोटाचे ठसे, डोळ्याची बाहुली व छायाचित्र) अशा दोन्ही तपशीलांमध्ये सुधारणा करता येईल.

  • कोणत्याही प्रकारच्या सुधारणेची विनंती करताना माझा मोबाईल क्रमांक आधारकडे नोंदविणे आवश्यक आहे का?
तुम्ही सुधारणेसाठी ऑनलाईन स्व सेवा सुधारणा पोर्टल (एसएसयूपी) वापरत असाल, तर तुमचा मोबाईल क्रमांक आधारकडे नोंदवलेला असला पाहिजे नाहीतर तुम्ही सर्वात जवळच्या कायमस्वरुपी नावनोंदणी केंद्राला सहाय्यक दस्तऐवजांसह भेट देऊन किंवा टपालाद्वारे आवेदन अर्ज व सहाय्यक दस्तऐवजांसहित सुधारणा विनंती करून तुमचा मोबाईल क्रमांक नोंदविला पाहिजे.


मला आधारमधील माझे तपशील कसे सुधारित करता येतील?

तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारांनी तुमच्या तपशीलांमध्ये सुधारणा करता येईल:-
  1. कायमस्वरुपी नावनोंदणी केंद्राला भेट देऊन. uidai.gov.in वर “नावनोंदणी केंद्र शोधा” वर क्लिक करून सगळ्यात जवळचे नावनोंदणी केंद्र शोधा.
  2. ऑनलाईन स्व सेवा सुधारणा पोर्टल (एसएसयूपी) वापरून uidai.gov.in वर“आधार तपशील सुधारित करा (ऑनलाईन)” वर क्लिक करा.
  3. टपालाद्वारे, आवेदन अर्जासोबत स्व-साक्ष्यांकित सहाय्यक दस्तऐवज युआयडीएआयला पाठवावेत. uidai.gov.in वर “टपालाद्वारे सुधारणेची विनंती”यावर क्लिक करा.

  • मला ऑनलाईन स्व सेवा सुधारणा पोर्टलच्या (एसएसयूपी) संदर्भात सहाय्यक दस्तऐवज कसे सादर करता येतील?
तुम्ही सुधारणेच्या पद्धतीसाठी ऑनलाईन स्व सेवा सुधारणा पोर्टल (एसएसयूपी) वापरत असाल, तर तुम्हाला स्कॅन केलेले मूळ दस्तऐवज अपलोड करावे लागतील.


  • आधार तपशीलांमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणते दस्तऐवज आवश्यक आहेत?
कृपया राष्ट्रीय पातळीवर वैध दस्तऐवजांच्या यादीसाठी येथे येथे क्लिक करा . यादीमध्ये 18 ओळखीचे दाखले (पीओआय), 35 पत्त्याचे दाखले (पीओए), 9 नातेसंबंधाचे दाखले (पीओआर) व 9 जन्मतारखेच्या दस्तऐवजांचे दाखले आहेत.
  • मी आधारमध्ये कोणत्या चौकटीतील माहिती सुधारित करू शकतो?
तुम्ही आधारमधील जनसांख्यिक तपशील (नाव, पत्ता, जन्मातारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, ईमेल) तसेच जैवसांख्यिकीमध्ये (बोटांचे ठसे, डोळ्यांची बाहुली व छायाचित्र) सुधारणा करू शकता.
मला आधारमधील माझे तपशील सुधारित करता येतील
खालील लिंकवर क्लीक करा.

https://uidai.gov.in/mr/my-aadhaar-mr/update-your-aadhaar-mr.html
Best Deal Harsh

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.