Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट १७, २०२१

बांबूपासून साकारलेली ही राखी बघून नक्कीच व्हाल खुश !

 पर्यावरणपूरक बांबू राखीमुळे दिव्यांगांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

'बांबूटेक आणि दिव्यांग कौशल्य विकास' चा संयुक्त उपक्रम

A joint venture of 'Bamboo Tech and Divyang Skills Development'

चंद्रपूर:- भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळख असलेला राखीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु राखी निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला घातक अशा प्लॅस्टिक वापर होतो. म्हणूनच पर्यावरण स्नेही बांबू राखी निर्मितीचा संकल्प करून बाबुपेठ परिसरातील 12 दिव्यांग महिला व पुरुषांनी वैशिष्ट्यपूर्ण अशा बांबू राखी बनविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे ज्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या महत्वपूर्ण संदेशासोबतच बांबू राखीमुळे दिव्यांगांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे.

Environmentally friendly bamboo rakhi helps the disabled to become self-reliant

बांबूटेक ग्रीन सर्व्हिसेस चे संचालक व दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष निलेश पाझारे यांच्या संकल्पनेतून सदर सामाजिक उदयमाची मुहूर्तमेढ झाली असून दिव्यांगाना चिचपल्ली जवळी जाभर्ला स्थित बांबूटेकच्या कार्यशाळेत बांबू राखी निर्मितीसाठी तसेच बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले. या बांबूच्या निर्मितीसाठी बांबू सोबतच पर्यावरणपूरक वस्तूंचा उपयोग करण्यात आला आहे. 

वैशिष्ट्यपूर्ण अशा बांबू राखीची विक्रीचे सुद्धा स्वतः दिव्यांग एक चमू बनवून करीत आहे. पर्यावरणपूरक बांबू राखीला चांगलीच मागणी असून समाजातील संवेदनशील व्यक्ती व संस्था या राखीची खरेदी करून दिव्यांग आत्मनिर्भरतेच्या या महत्त्वपूर्ण सामाजिक उदयमाला सहकार्य करीत आहे. हैदराबाद, सोलापूर, पुणे, गडचिरोली आणि नागपूर आदी शहरातून बांबू राखी ची मागणी येत आहे. चंद्रपूर शहरात सुद्धा अनेक ठिकाणी बांबू राखी विकृतीचे स्टॉल लागणार असून चिनी वस्तू व राखीच्या बहिष्कारानंतर स्थानिक दिव्यांग बांबू कारागीरांद्वारा बांबू पासून निर्मित बांबू राखीने भारतीयांना एक पर्यावरणपूरक पूर्णतः भारतीय राखीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 
A joint venture of 'Bamboo Tech and Divyang Skills Development'


Environmentally friendly bamboo rakhi helps the disabled to become self-reliant

चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रतीच्या बांबू पासून निर्मिती तसेच बांबू उद्योगाला चालना देणाऱ्या पर्यावरण स्नेही बांबू राखी निर्मितीच्या सामाजिक उदयम स्वरूपातील प्रकल्पात स्वतः दिव्यांग असलेले निलेश पाझारे यांच्या नेतृत्वात सतीश मूल्लेवार; मुन्ना खोब्रागडे, रुपेश रोहणकर, रवींद्र उपरे, सतीश कोलते, कल्पना शिंदे, दर्शना चाफले, भाग्यश्री कोलते, किरण करमणकर हे दिव्यांग बांबू कारागीर राखी बनवण्यापासून ते विक्रीपर्यंत चे कार्य करीत असून आत्मनिर्भर दिव्यांग या संकल्पनेला सक्रिय सहकार्य  करण्याचे आवहान बांबूटेक ग्रीन सर्व्हिसेस आणि दिव्यांग कौशल्य विकास संस्थेच्या वतीने निलेश पाझारे, अन्नपूर्णा धुर्वे (बावनकर) यांनी केले आहे.

Environmentally friendly bamboo rakhi helps the disabled to become self-reliant


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.