राज्यात शनिवारपासून (19 जून) 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केलाय. त्याप्रमाणे 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर
(आरोग्य विभाग)
शनिवार, दि. १९ जून २०२१ रोजी सुरू असलेली लसीकरण केंद्र
वेळ : सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत
४५ वर्षावरील नागरिकांसाठी
पहिला आणि दुसरा डोस (कोविशिल्ड)
१. कन्नमवार प्राथमिक शाळा, सरकार नगर
२. गजानन मंदिर, वडगांव
३. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड
४. जलाराम मंदिर, एस.पी. कॉलेज जवळ
५. सावित्रीबाई फुले शाळा, नेताजी चौक
६. खालसा कॉन्व्हेंट, गुरुद्वारा, महाकाली मंदिर रोड
केवळ दुसरा डोस (कोव्हॅक्सीन)
१. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर
२. शासकीय आयटीआय कॉलेज, वरोरा नाका, नागपूर रोड
३० ते ४४ वयोगट + 45 वर्षावरील नागरिकांसाठी
पहिला आणि दुसरा डोस (कोविशील्ड)
१. मातोश्री शाळा, तुकुम
सूचना :
- संपूर्ण लसीकरण ऑफलाईन (टोकन) पद्धतीने होईल.
- कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसानंतर घ्यावा.
- दुसऱ्या डोससाठी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य राहील.
- विनाकारण गर्दी करू नये.
- 70 वर्षावरील तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांना देखील प्राधान्य दिले जाईल. त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही.