*"कोपरगावची जिल्हयाची मागणी म्हणजे निव्वळ मृगजळ"* - अँड.नितीन पोळ
प्रतिनिधी -अजय विघे
नुकतेच शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी मिळाली असून नव्याने जिल्हा विभाजनाच्या वादाला तोंड फुटले मात्र कोपरगाव जिल्हा व्हावा असे कोपरगावच्या नागरिकांना वाटत असले तरी कोपरगाव ची जिल्ह्याची मागणी निव्वळ मृग जळ आहे.
असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
मागील तीस वर्षां पासून अहमदनगर जिल्हा विभाजनाची मागणी होत असून जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर की संगमनेर असा बराच दिवस वाद सुरू असला तरी श्रीरामपूर येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आदी प्रमुख कार्यालय अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यातच संगमनेरकर देखील जिल्हा मुख्यालय व्हावे म्हणून आग्रही होते.
मात्र आता या दोन्ही वादात राज्याचे महसूल मंत्री असलेल्या नामदार राधा कृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणून संभाव्य शिर्डी जिल्हा व्हावा म्हणून श्रीगणेशा केला आणि नवीन जिल्ह्याच्या वादाने पुन्हा तोंड काढले असून श्रीरामपूरच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर जिल्हा व्हावा म्हणून नुकतीच बंदची हाक दिली असली तरी सद्या तरी मंत्री मंडळात विखे पाटलांच्या रूपाने शिर्डीचे पारडे जड आहे.
असे दिसते त्यातच कोपरगाव तालुक्यातून देखील मुख्यालय कोपरगाव ला व्हावे अशी मागणी होताना दिसत असून काकडी विमानतळ, रेल्वे स्टेशन,समृद्धी महामार्ग व गोदावरी नदी असा जिल्ह्या करिता अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले जात.
असले तरी मागील तीस वर्षात कोपरगाव जिल्हा व्हावा या दृष्टीने कोपरगावचे प्रस्तापित नेते मात्र आपली मागणी शासन दरबारी रेटताना दिसले नाही.
मागील तीस वर्षात तालुक्यातील नेते आलटून पालटून ज्या ज्या पक्षात होते ती सरकारे आली आणि गेली मात्र कोपरगाव जिल्हा व्हावा म्हणून विविध शासकीय कार्यालये आणण्यात कोणत्या ही नेत्यांनी ठोस भूमिका घेतली नाही.
याउलट जिल्हा कोर्ट,पोलीस उप अधीक्षक कार्यालय कोपरगाव हुन राहता व शिर्डी येथे गेले मात्र आता कोपरगाव जिल्हा व्हावा म्हणून वराती मागून कितीही घोडे दामटण्याचा प्रयत्न केला तरी, ही रेस जिंकणे शक्य नाही.
असेच दिसते कारण इतर वेळी कोपरगाव चे नेते स्वतःला राज्याच्या राजकारणात खूप मोठा दबदबा आहे असे भासवत असले तरी या विषयावर कोणतीच ठोस भूमिका मांडताना दिसले नाही.... एक कोपरगाव कर नागरिक म्हणून स्वतःची व कोपरगावकरांची जिल्हा मागणी ही निव्वळ मृगजळ आहे असेच दिसते.