बुद्ध पंथातील गणपतीची रूपे...
फेसबुक लिंक http://bit.ly/3a6dlBU
'कप्पदुमावदानम्' हा एक संस्कृत-महायानी भाषा मिश्रित प्राचीन बौद्ध ग्रंथ आहे.त्यामध्ये एका प्राचीन कथेचा उल्लेख आहे. श्रावस्तीचा एक व्यापारी बौद्ध धर्माचा उपासक होता.तो व्यापारासाठी 'रत्नाकर' नावाच्या बेटावर गेला होता. काही दिवसानंतर समुद्रात वादळ आल्याने त्याची नाव बुडाली.या संकटवेळी त्याने जिवाच्या रक्षणासाठी आपल्या धर्मातील देवांबरोबर गणपतीची आराधना केली.यावरून असे दिसून येते प्राचीन काळात बौद्ध धर्मात अन्य देवतांबरोबर 'गणेश' आराधना प्रचलित होती.बौद्धपरंपरेमध्ये गणेशाच्या मूर्ती दिसायला सुरुवात होते. आग्नेय आशिया, मध्य आशिया आणि पूर्व आशियामधून गणपती-विनायक हळूहळू लोकमानसात रुजताना दिसतात. यांचा प्रसार निश्चितच भारतामधून झाला. सुवर्ण युगापूर्वीचे मथुरा शैलीतील गणेशाचे स्वरूप हे यक्ष कोटीतील देवतांसारखे वाटते. हा तुंदिलतनू आहे, गजमुख आहे परंतु भक्तांची दुखे वारणारा नसून, तो थोडाफार दुष्ट आहे.इ.स.च्या पाचव्या शतकात चिनी भाषेत धर्ममक्षेमाने भाषांतरित केलेला ‘धर्मगुप्तविनय’ नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. यात असा उल्लेख सापडतो की ‘जे कोणी विनयाचे नियम तोडल्याबद्दलची शिक्षा भोगणार नाहीत, ते पुढील जन्मी शारीरिक व्यंग अथवा घोडय़ाचे किंवा हत्तीचे तोंड घेऊन जन्माला येतील.’ ही विनयाची परंपरा प्राचीन असावी. ‘विनय’ग्रंथ हे बौद्धांच्या प्रमुख तीन (विनय, अभिधम्म आणि सुत्त) पिटक ग्रंथांपकी एक. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच या ग्रंथांचे संकलन केले गेले. विनयपिटकामध्ये भिक्षूंसाठीचे नियम दिले आहेत. बौद्धधर्मात अनेक निकाय (संप्रदाय) होते. सम्राट अशोकापूर्वीच साधारण १८ निकाय अस्तित्वात होते. त्यापकीच एक ‘धर्मगुप्तिक’ निकाय होता. या संप्रदायांपकी अनेकांचे स्वतंत्र विनयग्रंथ होते.
इ.स.च्या सहाव्या शतकापासून आपल्याला बौद्धपरंपरेमध्ये गणेशाच्या मूर्ती दिसायला सुरुवात होते. आग्नेय आशिया, मध्य आशिया आणि पूर्व आशियामधून गणपती-विनायक हळूहळू लोकमानसात रुजताना दिसतात. यांचा प्रसार निश्चितच भारतामधून झाला. सुवर्ण युगापूर्वीचे मथुरा शैलीतील गणेशाचे स्वरूप हे यक्ष कोटीतील देवतांसारखे वाटते. हा तुंदिलतनू आहे, गजमुख आहे परंतु भक्तांची दुखे वारणारा नसून, तो थोडाफार दुष्ट आहे.सुरुवातीच्या बौद्ध साहित्यामध्येही गजवदनाचे असेच काहीसे स्वरूप आहे. इ.स.च्या पाचव्या शतकात चिनी भाषेत धर्ममक्षेमाने भाषांतरित केलेला ‘धर्मगुप्तविनय’ नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. यात असा उल्लेख सापडतो की ‘जे कोणी विनयाचे नियम तोडल्याबद्दलची शिक्षा भोगणार नाहीत, ते पुढील जन्मी शारीरिक व्यंग अथवा घोडय़ाचे किंवा हत्तीचे तोंड घेऊन जन्माला येतील.’ ही विनयाची परंपरा प्राचीन असावी. ‘विनय’ग्रंथ हे बौद्धांच्या प्रमुख तीन (विनय, अभिधम्म आणि सुत्त) पिटक ग्रंथांपकी एक. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच या ग्रंथांचे संकलन केले गेले. विनयपिटकामध्ये भिक्षूंसाठीचे नियम दिले आहेत. बौद्धधर्मात अनेक निकाय (संप्रदाय) होते. सम्राट अशोकापूर्वीच साधारण १८ निकाय अस्तित्वात होते. त्यापकीच एक ‘धर्मगुप्तिक’ निकाय होता. या संप्रदायांपकी अनेकांचे स्वतंत्र विनयग्रंथ होते.
ह्युएनत्सांग या सातव्या शतकात भारतात आलेल्या चिनी प्रवाशाचा वॉनचूक नावाचा कोरियन विद्यार्थी आपल्या ग्रंथात म्हणतो, ‘घेतलेल्या व्रतामध्ये अडथळा आणायचं काम गजवदन असलेले आत्मे करतात.’ इ.स. ९८३ मध्ये दानपालाने भाषांतरित केलेल्या ‘अष्टसाहस्रिकप्रज्ञापारमिता’ सूत्रामध्ये तो हत्तीचे मुख असलेल्या यक्षाचा उल्लेख करतो. याचाच अर्थ असा की पूर्व आशियातील बौद्धसंस्कृतीमध्ये गजमुख असलेले जीव वाईट कर्माचे फलित घेऊन जन्माला आलेले अथवा दुरात्मे, यक्ष म्हणून प्रचलित होते. दहाव्या शतकातील भारतातील गणेशाला पूजेत अग्रस्थान देण्याची परंपरा अजून तेथे पोहोचली नव्हती. साधारण सातव्या-आठव्या शतकात मुख्य बौद्ध धार्मिक परंपरेत गणेश, विनायक नावाने विघ्नकारी भूत अथवा दानव म्हणून गणेशाला स्थान मिळाले होते. यातूनच पुढे बुद्धांच्या तंत्राचारात त्याचा शिरकाव झाला. बौद्धतांत्रिक परंपरेत विनायकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्याचे मंत्र, धारणी, मुद्रा आणि त्याच्याशी संबंधित विधी यांची मोठी रेलचेल या साहित्यामध्ये पाहायला मिळते. इ.स.च्या आठव्या शतकाच्या सुरुवातीच्या एका ग्रंथात असे म्हटले आहे की, ‘एक दिवस-रात्र अथवा तीन दिवस उपास करून, अधिष्ठान करून, विशिष्ट मंत्र १०८ वेळा म्हटल्याने विनायक व त्याने निर्मिलेली अरिष्टे दूर होतात. भिक्षूला ध्यानधारणेसाठी चित्त एकाग्र करता येते.’
अतिगुप्ताने इ. स. ६५४ मध्ये चिनी भाषेत भाषांतरित केलेल्या ‘धारणीसमुच्चय’या ग्रंथात विनायकाशी संबंधित एका विधीची माहिती येते.अशा प्रकारे बौद्ध साहित्यात अनेक दंतकथेत गणपतीचा उल्लेख मिळतो.'महायानीत' तर गणपतीविषयी अनेक लहान-मोठ्या दंतकथा आहेत.
बौद्ध मंदिरात बुद्ध मूर्तीबरोबर अनेक गणपतीच्या मूर्ती सापडतात.
नेपाळमध्ये सम्राट अशोकाच्या मुली चारुमतीने अनेक बौद्ध मंदिराची निर्मिती केली आहे.त्यामध्ये तिने स्वत: श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे . त्याचे नाव आहे,"सूर्यगणपती "पाचव्या शतकात चिनी यात्रेकरू फाहीयान भारतात आले होते तेव्हा ते आपल्याबरोबर गणपतीच्या अनेक मूर्ती घेऊन गेले होते.गणेश पूजेच्या परंपरेला ते आपल्यासोबत घेऊन गेले.वरील छायाचित्रात गणपती च्या सगळी कडे बुद्ध बसलेले आहेत...पाचव्या आणि आठव्या शतकाच्या मध्यंतरात चिनी बौद्ध साहित्यात भारतीय संस्कृतीचा सविस्तर उल्लेख आहे.त्यात गणेश पूजेचे वर्णन मिळते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,ब्रिटीश संग्राहलयात जावा येथून मिळालेल्या अनेक गणेश मूर्ती आहेत.या मूर्ती विविध मुद्रा असलेल्या आहेत. जावा बौद्ध धर्म मानणारा देश आहे.यावरून असे दिसते की महायान संप्रदायात गणेश उपासनेचे एक विशिष्ट स्थान होते. नेपाळ, लडाख आणि तिबेट येथील वज्रयान संप्रदायातील लोक आपल्या आराध्य देवाबरोबर 'गणेश मूर्तीची' स्थापना करतात.
ते सर्वप्रथम गणेश पूजा करतात. मंत्र सिद्धीसाठी गणेश आराधना आवश्यक आहे असा त्यांचा विश्वास आहे.नेपाळी बौद्ध साहित्यात 'गणपती उदय' नावाचा एक प्रमुख ग्रंथ आहे.
नेपाळी बौद्ध साहित्यात 'गणपती उदय' नावाचा एक प्रमुख ग्रंथ आहे
त्या ग्रंथानुसार तथागत गौतम बुद्ध स्वत: म्हणतात- 'हे आनंद! गणपती उदयाचे वाचन केल्यावर लवकरच आपल्या इच्छा पूर्ण होतात.'मग "गणपती" फक्त ब्राह्मण लोकांनी तयार केलेला देव आहे का ??
बुद्ध आणि जैन पंथात त्याला अनन्यसाधारण महत्व आहे..
आता आपण गणपतीचे अन्य देशातील स्थान बघू
१) इराण -हत्तीच्या चेहेरा असणारा आणि मनुष्य देह असलेली मूर्ती लुरीस्तान,पश्चिम इराण मध्ये सापडली,ही पहिली मूर्ती आहे असे मानतात...२) अफगाणिस्तान- १२०० ख्रिस्त पूर्व मध्ये इथे एक संगमरविरी मूर्ती सापडली आहे,त्यात गणपती एक लढवय्या स्वरुपात आहे.
अश्या खूप मूर्ती तिथे होत्या पण त्या नष्ट करण्यात आल्या आहेत,कुणी केल्या असतील हे सांगायला नको.
३) ग्रीक देशात गणपतीला वेगळा देव म्हणून पूजतात,त्याचे नाव आहे "जानुस" त्याला मनुष्य देह आणि हत्ती चे तोंड असते.
४) Mexico मध्ये ही असाच देव पुजला जातो.
५) १३ व्या शतकातील गणपती कांबोडिया इथे गणपती ला "प्रहागणपती" म्हणतात..
६) जपान मध्ये गणपती ला "विनायाकश्र" म्हणतात..
७) जावा मध्येत्याला "कालांतक" ह्या नावाने ओळखतात.Ⓜ