नवेगावबांध येथे सोमवार सकाळ पर्यंत दोन दिवसांचा कडकडीत विकेंड लॉकडाऊन
नवेगावबांधकरांचा शंभर टक्के प्रतिसाद
नवेगावबांध पोलिसांची करडी नजर
अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापने, दुकाने कडकडीत बंद.
संजीव बडोले प्रतिनिधी
नवेगावबांध दि.११ एप्रिल:-
ब्रेक द चेन अंतर्गत दिनांक नऊ एप्रिल रोज शुक्रवार च्या रात्री आठ वाजेपासून ते दिनांक १२ एप्रिल रोज सोमवारच्या सकाळी सात वाजेपर्यंत नवेगावबांध येथे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापने व दुकाने कडकडीत बंद आहेत. ब्रेक द चेन या अंतर्गत दोन दिवसाचा कडकडीत विकेंड लॉक डाऊन पाळला जात आहे.या कालावधीत नवेगावबांध ग्रामवासीयांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. असे आवाहन ग्रामपंचायत नवेगावबांध यांच्यावतीने करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत येथील सर्व आस्थापने व दुकाने आज शनिवार ला कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत.नवेगावबांध ग्रामवाशियानी देखील या वीकेंड लॉकडाऊन ला शंभर टक्के प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केले. येथील बस स्थानक, आझाद चौक, बालाजी चौक, इंदिरा चौक,टी पॉईंट चौक हे एरवी वर्दळ असणारी ठिकाणे विकेंड लॉक डाऊन मुळे निर्मनुष्य झाली आहेत. सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाले. नियमांचे पालन व्हावे व संचार बंदीचे उल्लंघन होऊ नये याकडे, नवेगावबांध पोलीस लक्ष ठेवून आहेत. अत्यावश्यक सेवेत असलेले आस्थापने व दुकाने मात्र वीकेंड लॉक डाऊन मधून वगळण्यात आले आहेत. इतर आस्थापने व दुकान सुरू आढळल्यास तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त नागरीक घराच्या बाहेर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध साथरोग अधिनियम १९८७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल. असे ग्रामपंचायतीच्या आदेशात म्हटले आहे.सोमवार सकाळी सात वाजेपर्यंत घोषित केलेल्या कडकडीत लॉकडाऊनला नवेगावबांध येथील सर्व ग्रामस्थानी सहकार्य करावे. असे आवाहन नवेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे व ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण यांनी केले आहे. नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर व त्यांचे सहकारी गावात गस्त करीत आहेत व परिस्थितीवर करडी नजर ठेवून आहेत.