Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

धार्मिक-बौध्द लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धार्मिक-बौध्द लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, एप्रिल १२, २०२१

बुद्ध पंथातील गणपतीची रूपे...

बुद्ध पंथातील गणपतीची रूपे...

बुद्ध पंथातील गणपतीची रूपे...



फेसबुक लिंक http://bit.ly/3a6dlBU
'कप्पदुमावदानम्' हा एक संस्कृत-महायानी भाषा मिश्रित प्राचीन बौद्ध ग्रंथ आहे.त्यामध्ये एका प्राचीन कथेचा उल्लेख आहे. श्रावस्तीचा एक व्यापारी बौद्ध धर्माचा उपासक होता.तो व्यापारासाठी 'रत्नाकर' नावाच्या बेटावर गेला होता. काही दिवसानंतर समुद्रात वादळ आल्याने त्याची नाव बुडाली.या संकटवेळी त्याने जिवाच्या रक्षणासाठी आपल्या धर्मातील देवांबरोबर गणपतीची आराधना केली.यावरून असे दिसून येते प्राचीन काळात बौद्ध धर्मात अन्य देवतांबरोबर 'गणेश' आराधना प्रचलित होती.

बुद्ध पंथातील गणपतीची रूपे...

बौद्धपरंपरेमध्ये गणेशाच्या मूर्ती दिसायला सुरुवात होते. आग्नेय आशिया, मध्य आशिया आणि पूर्व आशियामधून गणपती-विनायक हळूहळू लोकमानसात रुजताना दिसतात. यांचा प्रसार निश्चितच भारतामधून झाला. सुवर्ण युगापूर्वीचे मथुरा शैलीतील गणेशाचे स्वरूप हे यक्ष कोटीतील देवतांसारखे वाटते. हा तुंदिलतनू आहे, गजमुख आहे परंतु भक्तांची दुखे वारणारा नसून, तो थोडाफार दुष्ट आहे.इ.स.च्या पाचव्या शतकात चिनी भाषेत धर्ममक्षेमाने भाषांतरित केलेला ‘धर्मगुप्तविनय’ नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. यात असा उल्लेख सापडतो की ‘जे कोणी विनयाचे नियम तोडल्याबद्दलची शिक्षा भोगणार नाहीत, ते पुढील जन्मी शारीरिक व्यंग अथवा घोडय़ाचे किंवा हत्तीचे तोंड घेऊन जन्माला येतील.’ ही विनयाची परंपरा प्राचीन असावी. ‘विनय’ग्रंथ हे बौद्धांच्या प्रमुख तीन (विनय, अभिधम्म आणि सुत्त) पिटक ग्रंथांपकी एक. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच या ग्रंथांचे संकलन केले गेले. विनयपिटकामध्ये भिक्षूंसाठीचे नियम दिले आहेत. बौद्धधर्मात अनेक निकाय (संप्रदाय) होते. सम्राट अशोकापूर्वीच साधारण १८ निकाय अस्तित्वात होते. त्यापकीच एक ‘धर्मगुप्तिक’ निकाय होता. या संप्रदायांपकी अनेकांचे स्वतंत्र विनयग्रंथ होते.
इ.स.च्या सहाव्या शतकापासून आपल्याला बौद्धपरंपरेमध्ये गणेशाच्या मूर्ती दिसायला सुरुवात होते. आग्नेय आशिया, मध्य आशिया आणि पूर्व आशियामधून गणपती-विनायक हळूहळू लोकमानसात रुजताना दिसतात. यांचा प्रसार निश्चितच भारतामधून झाला. सुवर्ण युगापूर्वीचे मथुरा शैलीतील गणेशाचे स्वरूप हे यक्ष कोटीतील देवतांसारखे वाटते. हा तुंदिलतनू आहे, गजमुख आहे परंतु भक्तांची दुखे वारणारा नसून, तो थोडाफार दुष्ट आहे.सुरुवातीच्या बौद्ध साहित्यामध्येही गजवदनाचे असेच काहीसे स्वरूप आहे. इ.स.च्या पाचव्या शतकात चिनी भाषेत धर्ममक्षेमाने भाषांतरित केलेला ‘धर्मगुप्तविनय’ नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. यात असा उल्लेख सापडतो की ‘जे कोणी विनयाचे नियम तोडल्याबद्दलची शिक्षा भोगणार नाहीत, ते पुढील जन्मी शारीरिक व्यंग अथवा घोडय़ाचे किंवा हत्तीचे तोंड घेऊन जन्माला येतील.’ ही विनयाची परंपरा प्राचीन असावी. ‘विनय’ग्रंथ हे बौद्धांच्या प्रमुख तीन (विनय, अभिधम्म आणि सुत्त) पिटक ग्रंथांपकी एक. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच या ग्रंथांचे संकलन केले गेले. विनयपिटकामध्ये भिक्षूंसाठीचे नियम दिले आहेत. बौद्धधर्मात अनेक निकाय (संप्रदाय) होते. सम्राट अशोकापूर्वीच साधारण १८ निकाय अस्तित्वात होते. त्यापकीच एक ‘धर्मगुप्तिक’ निकाय होता. या संप्रदायांपकी अनेकांचे स्वतंत्र विनयग्रंथ होते.
ह्युएनत्सांग या सातव्या शतकात भारतात आलेल्या चिनी प्रवाशाचा वॉनचूक नावाचा कोरियन विद्यार्थी आपल्या ग्रंथात म्हणतो, ‘घेतलेल्या व्रतामध्ये अडथळा आणायचं काम गजवदन असलेले आत्मे करतात.’ इ.स. ९८३ मध्ये दानपालाने भाषांतरित केलेल्या ‘अष्टसाहस्रिकप्रज्ञापारमिता’ सूत्रामध्ये तो हत्तीचे मुख असलेल्या यक्षाचा उल्लेख करतो. याचाच अर्थ असा की पूर्व आशियातील बौद्धसंस्कृतीमध्ये गजमुख असलेले जीव वाईट कर्माचे फलित घेऊन जन्माला आलेले अथवा दुरात्मे, यक्ष म्हणून प्रचलित होते. दहाव्या शतकातील भारतातील गणेशाला पूजेत अग्रस्थान देण्याची परंपरा अजून तेथे पोहोचली नव्हती. साधारण सातव्या-आठव्या शतकात मुख्य बौद्ध धार्मिक परंपरेत गणेश, विनायक नावाने विघ्नकारी भूत अथवा दानव म्हणून गणेशाला स्थान मिळाले होते. यातूनच पुढे बुद्धांच्या तंत्राचारात त्याचा शिरकाव झाला. बौद्धतांत्रिक परंपरेत विनायकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्याचे मंत्र, धारणी, मुद्रा आणि त्याच्याशी संबंधित विधी यांची मोठी रेलचेल या साहित्यामध्ये पाहायला मिळते. इ.स.च्या आठव्या शतकाच्या सुरुवातीच्या एका ग्रंथात असे म्हटले आहे की, ‘एक दिवस-रात्र अथवा तीन दिवस उपास करून, अधिष्ठान करून,  विशिष्ट मंत्र १०८ वेळा म्हटल्याने विनायक व त्याने निर्मिलेली अरिष्टे दूर होतात. भिक्षूला ध्यानधारणेसाठी चित्त एकाग्र करता येते.’
अतिगुप्ताने इ. स. ६५४ मध्ये चिनी भाषेत भाषांतरित केलेल्या ‘धारणीसमुच्चय’या ग्रंथात विनायकाशी संबंधित एका विधीची माहिती येते.अशा प्रकारे बौद्ध साहित्यात अनेक दंतकथेत गणपतीचा उल्लेख मिळतो.'महायानीत' तर गणपतीविषयी अनेक लहान-मोठ्या दंतकथा आहेत.
बौद्ध मंदिरात बुद्ध मूर्तीबरोबर अनेक गणपतीच्या मूर्ती सापडतात.
नेपाळमध्ये सम्राट अशोकाच्या मुली चारुमतीने अनेक बौद्ध मंदिराची निर्मिती केली आहे.त्यामध्ये तिने स्वत: श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे . त्याचे नाव आहे,"सूर्यगणपती "पाचव्या शतकात चिनी यात्रेकरू फाहीयान भारतात आले होते तेव्हा ते आपल्याबरोबर गणपतीच्या अनेक मूर्ती घेऊन गेले होते.गणेश पूजेच्या परंपरेला ते आपल्यासोबत घेऊन गेले.वरील छायाचित्रात गणपती च्या सगळी कडे बुद्ध बसलेले आहेत...
पाचव्या आणि आठव्या शतकाच्या मध्यंतरात चिनी बौद्ध साहित्यात भारतीय संस्कृतीचा सविस्तर उल्लेख आहे.त्यात गणेश पूजेचे वर्णन मिळते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,ब्रिटीश संग्राहलयात जावा येथून मिळालेल्या अनेक गणेश मूर्ती आहेत.या मूर्ती विविध मुद्रा असलेल्या आहेत. जावा बौद्ध धर्म मानणारा देश आहे.यावरून असे दिसते की महायान संप्रदायात गणेश उपासनेचे एक विशिष्ट स्थान होते. नेपाळ, लडाख आणि तिबेट येथील वज्रयान संप्रदायातील लोक आपल्या आराध्य देवाबरोबर 'गणेश मूर्तीची' स्थापना करतात.

ते सर्वप्रथम गणेश पूजा करतात. मंत्र सिद्धीसाठी गणेश आराधना आवश्यक आहे असा त्यांचा विश्वास आहे.नेपाळी बौद्ध साहित्यात 'गणपती उदय' नावाचा एक प्रमुख ग्रंथ आहे.
नेपाळी बौद्ध साहित्यात 'गणपती उदय' नावाचा एक प्रमुख ग्रंथ आहे
त्या ग्रंथानुसार तथागत गौतम बुद्ध स्वत: म्हणतात- 'हे आनंद! गणपती उदयाचे वाचन केल्यावर लवकरच आपल्या इच्छा पूर्ण होतात.'
मग "गणपती" फक्त ब्राह्मण लोकांनी तयार केलेला देव आहे का ??
बुद्ध आणि जैन पंथात त्याला अनन्यसाधारण महत्व आहे..
आता आपण गणपतीचे अन्य देशातील स्थान बघू
१) इराण -हत्तीच्या चेहेरा असणारा आणि मनुष्य देह असलेली मूर्ती लुरीस्तान,पश्चिम इराण मध्ये सापडली,ही पहिली मूर्ती आहे असे मानतात...
२) अफगाणिस्तान- १२०० ख्रिस्त पूर्व मध्ये इथे एक संगमरविरी मूर्ती सापडली आहे,त्यात गणपती एक लढवय्या स्वरुपात आहे.
अश्या खूप मूर्ती तिथे होत्या पण त्या नष्ट करण्यात आल्या आहेत,कुणी केल्या असतील हे सांगायला नको.
३) ग्रीक देशात गणपतीला वेगळा देव म्हणून पूजतात,त्याचे नाव आहे "जानुस" त्याला मनुष्य देह आणि हत्ती चे तोंड असते.
४) Mexico मध्ये ही असाच देव पुजला जातो.
५) १३ व्या शतकातील गणपती कांबोडिया इथे गणपती ला "प्रहागणपती" म्हणतात..
६) जपान मध्ये गणपती ला "विनायाकश्र" म्हणतात..
७) जावा मध्येत्याला "कालांतक" ह्या नावाने ओळखतात.Ⓜ

शनिवार, एप्रिल १०, २०२१

बौद्ध धर्मातील ब्राम्हण

बौद्ध धर्मातील ब्राम्हण

बौद्ध धर्मातील ब्राम्हण


फेसबुक लिंक http://bit.ly/3a0PZxn
बौद्ध धर्म हा बहुजनांचा धर्म आहे असे मानले जाते. पण यातील बहुजन या शब्दाचा अर्थ आजचे बहुजनवादी घेतात तसा 'ब्राम्हणेतर' असा नाही, तर बहुतांश लोक असा आहे. त्यामुळे गौतम बुद्धांच्या शिष्यांमध्ये ब्राम्हण शिष्यही होते. त्यांची संख्या समाजातील त्यांच्या संख्येच्या टक्केवारी पेक्षा खूपच जास्त होती.Ⓜबौद्ध धर्मात गेल्या अडीच हजार वर्षात जे महान भिक्कू आणि विद्वान झाले, त्यात ब्राम्हणांची संख्या मोठी आहे, किंबहुना महान आणि विद्वान बौद्ध भिक्कुंमध्ये ब्राम्हणेतरांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. या लेखात मी अशा कांही ब्राम्हण भिक्कू आणि विद्वानांची थोडक्यात माहिती देत आहे. हे लोक जन्माने वैदिक ब्राम्हण होते, पण त्यांना बौद्ध तत्वज्ञान पटल्यामुळे बौद्ध भिक्कू झाले.
Ⓜसारीपुत्र: हे गौतम बुद्ध यांच्या पट्टशिष्यांपैकी एक होते. हे जन्माने ब्राम्हण होते आणि त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला होता. अश्वजीत या भिक्कूकडून त्यांनी गौतम बुद्धांच्या बद्दल ऐकले आणि ते बुद्धांचे शिष्य झाले. सारीपुत्र अतिशय बुद्धिमान होते. त्यांनी गौतम बुद्ध यांचा चुलत भाऊ देवदत्त याने बुद्धांच्या विरोधात केलेले बंड मोडून काढले. गौतम बुद्ध यांच्या उपदेशांचा खूप मोठा प्रचार केल्यामुळे त्यांना 'धम्मसेनापती' ही पदवी देण्यात आली. त्यांनी आपल्या आईलाही बुद्धांचा उपदेश देवून बौद्ध धर्म स्वीकारायला लावला होता. सारीपुत्राचे परीनिर्वाण गौतम बुद्ध यांच्याही आधी झाले.

बौद्ध धर्मातील ब्राम्हण

Ⓜमहाकश्यप : महाकश्यप हेही गौतम बुद्ध यांच्या पट्टशिष्यांपैकी एक होते. त्यांचा जन्म मगधेतील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. हे नेहमी बुद्धांच्या सानिध्यात असत. त्यांचे आचरण अतिशय कडक होते. बौद्ध धर्माची पहिली संगती (council ) भरवण्याचे महत्वाचे काम महाकश्यप यांनी केले. बुद्धांचा सर्वाधिक विश्वास महाकश्यप यांच्यावर होता.
Ⓜमोग्गलायन: बुद्धांच्या पट्टशिष्यांपैकी हे आणखी एक. यांचा जन्म कोलीता येथील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्यांना विविध प्रकारच्या विद्या येत होत्या. यांचे परीनिर्वाण बुद्धांच्यांही अगोदर सहा महिने, आणि सारीपुत्रानंतर पंधरवड्यात झाले.गौतम बुद्ध यांच्या संघात वरील प्रमुख ब्राम्हण शिष्यांशिवाय इतरही अनेक ब्राम्हण शिष्य होते. गौतम बुद्ध यांच्या परीनिर्वाणानंतरही बौद्ध धर्मात अनेक महान बौद्ध भिक्कू, आचार्य व विद्वान झाले.
♏नागार्जुन: यांचा जन्म दक्षिण भारतात एका ब्राम्हण कुटुंबात झाला (इ.स. १५०). हे सातवहान राजा सातकर्णी याचे सल्लागार होते. नागार्जुन यांनी बौद्ध तत्वज्ञानावर अनेक ग्रंथ लिहिले. हे आयुर्वेदाचेही तज्ञ होते. आयुर्वेदातील 'भस्म' प्रकारच्या औषधांचा शोध नागार्जुन यांनी लावला.
अश्वघोष: अश्वघोष (इ.स. ८० ते १५०) यांचा जन्म साकेत येथील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. यांना पहिले संस्कृत नाटककार मानण्यात येते.याशिवाय तिबेटी बौद्ध धर्माचे संस्थापक पद्मसंभव, झेन बौद्ध धर्माचे संस्थापक शांतिदेव, ग्रीक राजा मेनेंदर उर्फ मिलिंद याला बौद्ध धर्माचे अनुयायी बनवणारे नागसेन, सम्राट अशोकाला बौद्ध धर्माचे अनुयायी बनवणारे राधास्वामी, नालंदा विद्या पीठातील बौद्ध महापंडित आर्यदेव आणि शांतरक्षित हे सगळेजण जन्माने ब्राम्हण होते. ही यादी फारच लांबवता येईल,ही सगळी माहिती मी मुख्यत्वे विकीपेडियावरील http://en.wikipedia.org/wiki/Buddhist_Brahmins येथून वरून घेतली आहे, व या माहितीचा खरेपणा वेगवेगळ्या विद्यापीठांच्या वेबसाईट्स आणि दापोडी येथील बौद्ध विहारातील अधिकृत बौद्ध ग्रंथातून तपासून घेतला आहे.,भारतातून बौद्ध धर्म संपवायला ब्राम्हण जबाबदार आहेत असे अनेक जण मानतात. पण खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना हे मत मान्य नाही. त्यांच्या मते बौद्ध धर्माचा -हास भारतावरील मुस्लीम परकीयआक्रमणामुळे झाला. खुद्द गौतम बुद्ध यांच्या संघात त्यांचे सर्वाधिक आणि प्रमुख शिष्य हे ब्राम्हण होते, त्यानंतर क्षत्रिय शिष्यांचा नंबर येतो. या संघात शूद्रांचे स्थान तसे नगण्यच होते. अनेक ब्राम्हणांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो वाढवला. बौद्ध धर्म तिबेट, चीन, जपान वगैरे देशात नेण्याचे श्रेय ब्राम्हनांनाच जाते.हे सत्य आहे व मान्य केले पाहिजे

शनिवार, जून २७, २०२०

थायलंड : बौद्ध मंदिर भिंतीवर रामायण

थायलंड : बौद्ध मंदिर भिंतीवर रामायण

  यामुळे थायलंडच्या बौद्धमंदीराच्या भितींवर ‘रामायण’ कोरण्यात आलं आहे 

                     
  ❍ दिनांक - २७.०६.२०२०. ❍

🇦 थायलंडच्या बौद्धमंदीराच्या भिंतीवर रामायण कोरण्यात आलं आहे. 
वाट फ्रा काएव अर्थात हरित बुद्ध मंदिर हे थायलंडचं प्रसिद्ध बौद्धमंदीर आहे. थायलंडची राजधानी बॅंकाकमध्ये असणाऱ्या राजवाड्याशेजारीच हे मंदीर आहे. या मंदिराला हरित बुद्ध मंदिर का म्हणतात तर इथे ज्या गौतम बुद्धांच्या मुर्ती आहेत हिरव्या रंगाच्या दगडात कोरलेल्या आहेत. त्यामुळे हे हरित बौद्ध मंदीर जगभरात प्रसिद्ध आहे.
थायलंडमध्ये तर या बौद्ध मंदिराला रक्षकाच्या स्वरूपात मानण्यात येते.
पण सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या मंदीराची भिंत. या मंदिराभोवती सुमारे दोन किलोमीटर लांबीची भिंत आहे. विशेष म्हणजे त्यावर रामायण कोरण्यात आलेलं आहे. साधारण भारतीय माणसं जेव्हा या मंदिरात जातात तेव्हा त्यांना रामायणाची चित्रे बघून आश्चर्य वाटतं. बौद्ध मंदिरात रामायण कसं असू शकतं.
🇦 भितींवर कोरण्यात आलेल्या रामायणातून  फ्रा राम ची जीवनगाथा चितारण्यात आलेली आहे. इथला श्री रामास तिथे फ्रा राम म्हणून संबोधले जाते तर रामायणाचे रुपांतर रामाकीन होते. रामाकीन याच कथेचा नायक फ्रा राम मानण्यात येतो.
याच रामाकीनची गोष्ट २ किलोमीटर लांबीच्या भिंतीवर रेखाटण्यात आलेली आहे.
थाई भाषेत रामाकीनचा अर्थ राम गौरव गाथा असा होतो. थायलंडमधले रामायण हे वाल्मिकी रामायणाहून काही अर्थी भिन्न स्वरुपाचे आहे. जागेचे वर्णन, पात्रांचे विविरण या गोष्टींमध्ये वाल्मिकी रामायणापासून मतभिन्नता आहे. इथल्या रामाकीनमध्ये इथलीच स्थानिक पात्र दाखवण्यात येतात.
मात्र असे असले तरी रामायणाची चित्र बौद्ध मंदिरात का लावण्यात आली आहेत हा प्रश्न उरतोच.
या प्रश्नाचं उत्तर भारता व दक्षिणपूर्व आशियायी देशांच्यामध्ये पुर्वापार चालत आलेल्या राष्ट्रीय संबधांमध्ये मिळतं. पुर्वीच्या काळा दक्षिण भारतातील व्यापारी या क्षेत्रात व्यापारासाठी पोहचले होते. थायलंड, कंबोडिया इत्यादी देशांमधले हे व्यापारी संबध इसन १३०० पासून चालू आहेत.
याच व्यापाऱ्यांनी इथे पहिल्यांदा रामायण आणले असल्याचे सांगण्यात येते.त्याचसोबतीने इथे हिंदू राजांनी आपले वर्चस्व गाजवण्यास सुरवात केली. काही कालावधीनंतर राजसत्ता बुडाली व हिंदूधर्म देखील संपुष्टात येत गेला.
मात्र धर्माप्रमाणेच इथल्या संस्कृतीत रामायण मिसळले गेले. हिंदू धर्माच्या चालिरीती आणि जगण्याची परंपरा इथल्या ंसंस्कृतीचा अंग होत गेले. याच एक उदाहरण सांगायचं झालं तर, 
काही वर्षांपूर्वी कंबाडियाच्या राजाचा राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा राज्याभिषेक ब्राह्मणांच्या हस्ते पार पडला. कंबोडियाच्या राज्याच्या राज्याभिषेकासाठी देखील ब्राह्मण पौरोहित लागत असल्याने बऱ्याच चर्चा झाल्या होत्या.
इंडोनेशिया हा मुस्लीमबहूल देश आहे तर थायलंड हा बौद्धबहुल देश आहे. मात्र या दोन्ही संस्कृतीत रामाकीन हा महत्वाचा घटक राहिलेला आहे. १८ व्या शतकात संस्करित करण्यात आलेला रामाकीन ग्रॅंथाला थायलंडमध्ये राजग्रॅंथाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
एकाच वेळी अनेक रामाकीन प्रसिद्ध होते मात्र १८ व्या शतकात थायलंडमधील अयुत्थया या राजधानीवर ब्रम्हदेशाच्या सेनेने आक्रमण करुन बेचिराख करुन टाकले.  त्यानंतरच्या काळात चिनी सैन्याने ब्रह्मदेशावर आक्रमण केल्यामुळे थायलंडमधील सैन्य पुन्हा ब्रह्मदेशात परतले व थायलंडमध्ये पुन्हा राजवंशाचा उदय झाला.
चक्री वंशाचा पहिल्या राजाला देखील राम प्रथम उपाधी देण्यात आली होती. जेव्हा ब्रह्मदेशाचं सैन्य इथून परत गेलं तेव्हा आपल्या सांस्कृतिक गोष्टींची पुर्नबांधणी या राजाच्या देखरेखीखाली करण्यात आली.  १७९७ ते १८०७ च्या दरम्यान रामायणाचे हे संस्करण तयार करण्यात आले. त्यातीलच चित्रे या बौद्धमंदीरावर कोरण्यात आलेले आहेत.
बोलभिडु वरून साभार 
               ✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9890875498 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍

थायलंड : बौद्ध मंदिर भिंतीवर रामायण ,Due to this, 'Ramayana' has been carved on the walls of Buddhist temples in Thailand
-------------------------------------------


Due to this, 'Ramayana' has been carved on the walls of Buddhist temples in Thailand

-
  Date - 27.06.2020. ❍
----------------------------------------

Ramayana is engraved on the wall of a Buddhist temple in Thailand.
Wat Phra Kayev (Green Buddha Temple) is a famous Buddhist temple in Thailand. The temple is located next to the palace in Bangkok, the capital of Thailand. Why is this temple called the Green Buddha Temple? The idols of Gautama Buddha are carved in green stone. Therefore, this green Buddhist temple is famous all over the world.
In Thailand, this Buddhist temple is considered as a guardian.
But the most special thing is the wall of this temple. There is a wall about two kilometers long around this temple. What is special is that Ramayana is engraved on it. When ordinary Indians visit this temple, they are amazed to see pictures of Ramayana. How can there be Ramayana in a Buddhist temple.
The life story of Fra Ram is depicted in the Ramayana carved on the walls. Here Shri Rama is referred to as Phra Rama while Ramayana is adapted to Ramakin. Ramakin is believed to be the protagonist of this story.
The story of Ramakin is drawn on a 2 km long wall.
Ramakin in Thai means Ram Gaurav Gatha. The Ramayana in Thailand is somewhat different from the Valmiki Ramayana. The description of the place, the description of the characters differs from the Valmiki Ramayana. Local characters are shown here in Ramakin.
However, the question remains as to why the images of Ramayana have been installed in Buddhist temples.
This question is reflected in the pre-existing national relations between North India and Southeast Asian countries. Traders from formerly black South India had come to this region for trade. These trade relations between Thailand, Cambodia, etc. have been going on since 1300 AD.
It is said that these traders brought Ramayana here for the first time. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, at the same time Hindu kings started dominating here. After some time, the monarchy collapsed and Hinduism also came to an end.
But like religion, Ramayana was mixed in the culture here. The customs and traditions of Hinduism became a part of the local culture. To give just one example,
The coronation ceremony of the King of Cambodia was held a few years ago. This coronation passed through the hands of Brahmins. There was a lot of discussion about the need for a Brahmin priest for the coronation of Cambodia.
Indonesia is a Muslim-majority country and Thailand is a Buddhist-majority country. However, Ramakin remains an important element in both these cultures. The Ramakin Grantha, which was Sanskritized in the 18th century, has been given the status of a Rajgrantha in Thailand.
Many Ramakins were famous at the same time, but in the 18th century, the Thai capital, Ayutthaya, was invaded by the Burmese army. In the ensuing period, the invasion of Burma by the Chinese forces led to the return of the Thai army to Burma and the re-emergence of the dynasty in Thailand.
The first king of the Chakri dynasty was also given the first title of Rama. When the Burmese army returned from here, our cultural heritage was rebuilt under the supervision of this king. This edition of Ramayana was prepared between 1797 and 1807. The paintings are carved on this Buddhist temple.
Thanks from Bolbhidu
               𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9890875498
                  ❍ mahiti seva Group
Pethwadgaon, Dist. Kolhapur


-------------------------------------------