Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी ०१, २०२१

भारताच्या स्वातंत्र्यासाठी भोगला तुरुंगवास

 ओळख कर्तृत्वाची 1     

कर्मवीर मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार 

             

भारताच्या स्वातंत्रासाठी भोगला तुरुंगवास

    11 मार्च 1930 ला गांधीजीने दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला आणि देशव्यापी आंदोलन सुरू झाले. या कायदेभंगाचे वेळी चंद्रपूर तालुका कॉंग्रेस कमेटीचे सेक्रेटरी म्हणून चंद्रपूर युद्ध मंडळाचे सूत्रे कन्नमवारांच्या हाती होती .महात्मा गांधीच्या आदेशाप्रमाणे प्रभातफेऱ्या, पिकेटींग, सत्याग्रह, हरताळ इ. कार्यक्रम ते करारीपणाने पार पाडीत होते. थोडक्यात ते या चळवळीचे सूत्रे पद्धतशीर हालवीत होते. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या अटके निमित्याने हरताळदिनी कन्नमवारांना अटक करण्यात आली. त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली. परंतू गांधी-इरवीन करारानुसार शिक्षा संपण्यापूर्वी ते 1931 मध्ये सर्व राजकीय बंद्याबरोबर मुक्त झाले.

मिठाच्या सत्याग्रहाबरोबरच कॉंग्रेस कार्यकारिणीने विदेशी कपडे आणि विदेशी मालांवर बहिष्कार टाकण्याचे ठरविले. चंद्रपूर पिकेटींगचे नेत्रुत्व सौ.ताई कन्नमवार , सौ.प्रमिलाबाई याज्ञिक, सौ.गोपीकाबाई फूलझेले यांनी केले. यावेळी सरकारने 143 कलमाअंतर्गत त्यांना पकडून तुरुंगवास व दंड ठोठावला.


महात्मा गांधी गोलमेज परिषदेहून भारतात येण्यापूर्वीच देशातील वातावरण अतिशय तंग झाले होते. ते भारतात येऊन पोहचताच लढ्याला सुरुवात झाली. झेंडावंदन, प्रभातफेऱ्या, गुप्त बुलेटिन कार्यक्रम सुरू झाले.13 फेब्रुवारी 1932 ला गढवाल दिन साजरा करण्याचे ठरताच चंद्रपूर शहरात 145 कलम जारी करण्यात आले. सेठ खुशालचंद खजानजी यांना अटक होताच चळवळीचे उग्र स्वरूप धारण केले. 27 फेब्रुवारी 1932 ला आर्डिनन्स जारी करण्यात आला आणि चंद्रपूर शहरात बहुतेक प्रमुख कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. त्यात काही महिलांचाही समावेश होता. या महिलांच्या अटकेच्या निषेधार्थ निघालेल्या मिरवणुकीत सौ.गोपीकाताई उर्फ ताई कन्नमवार सामील झाल्या असता त्यांनाही अटक झाली. 

10 जून 1942 च्या नागभीड येथील भाषणामुळे पकड वारंट सुटले. दादासाहेब कन्नमवार नागपूर मार्गावर असतांनाच त्यांना अटक करण्यात आली व नागपूर कारागृहात त्यांची रवानगी झाली. काही दिवसांनी त्यांची सुटका झाली. पण लगेच त्यांचेवर राजद्रोहाचा खटला होऊन एक वर्षाची सजा सुनावण्यात आली. त्यांना जबलपूर तुरुंगात पाठविण्यात आले. एक वर्षाची शिक्षा पूर्ण झाली तरी 1945 पर्यंत त्यांना तेथेच डांबून ठेवण्यात आले. (जबलपुर तुरुंगवास - 1942 ते 1945, हा दादासाहेबांचा शेवटचा तुरुंगवास होता.)

भारताच्या स्वातंत्रासाठी सत्याग्रह, हरताळ करतांना दादासाहेबांबरोबर ताईसाहेबांना सुध्दा तुरुंगवास झाला. स्वातंत्र्य लढ्यात दादासाहेबांसोबत ताईसाहेब कन्नमवार खंबीरपणे उभे होते.

- खिमेश बढिये, नागपूर

 दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती, नागपूर

8888422662, 9423640394

      


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.