आ. किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर:
सार्वजनीक बांधकाम विद्युत विभागाशी निगडीत कामे जलद गतीने करता यावी या करीता चंद्रपूरात सार्वजनीक बांधकाम विद्यूत विभाग कार्यकारी अभियंता कार्यालय मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी आ. किशोर जोरगेवार यांचा पाठपूरावा सुरु होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सदर कार्यालय सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
नागपूर परिमंडळासाठी नागपूर येथे सार्वजनीक बांधकाम विद्यूत विभागाचे कार्यालय आहे. या परिमंडळात नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्हांचा समावेश आहे. त्यामूळे या कार्यालयावर कामाचा मोठा ताण आहे. सध्या चंद्रपूरात ईमारतीचे कामे मोठ्या प्रमाणात प्रस्तावीत आहे. मात्र विद्यूत विभागाकडील कामाची व्याप्ती पाहता सदर सर्व कामांची गती मंदावली आहे. परिणामी अनेक कामे दोन वर्षापासून रेंगाळली आहेत. ही बाब लक्षात घेता चंद्रपूरात सार्वजनीक बांधकाम विद्यूत विभागाचे कार्यालय सुरु करण्यात यावे अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांच्या कडून केल्या गेली होती. या बाबत सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदनही देण्यात आले होते. सदर मागणी संदर्भात आ. जोरगेवार यांचा सातत्याने पाठपूरावा सुरु होता. आता अखेर त्यांच्या या पाठपूराव्याला यश आले असून सार्वजनीक बांधकाम विद्यूत विभागाचे कार्यालय चंद्रपूरात सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. परिणामी आता प्रलंबित अनेक कामांना गती मिळणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.