Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १२, २०२०

'युरीया'चा काळाबाजार थांबवा: शेतकरी कामगार पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी




गडचिरोली: उशिरा आलेल्या पावसामुळे रोवणी हंगाम सध्या भरात चालू असताना जिल्ह्यात युरीया खताची क्रुत्रिम टंचाई निर्माण करुन काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
  जिल्हाधिकारी यांच्या कडे केलेल्या लेखी तक्रारीत भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, राज्याचे क्रुषीमंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, जिल्ह्याकरीता रासायनिक खतांची असलेल्या आवश्यकतेऐवढे खत वेळेपूर्वीच उपलब्ध करण्यात आलेले असल्याचे म्हणाले होते. असे असतांना जिल्हाभरात शेतकऱ्यांना २६६ रुपये किंमतीचे युरीया खत टंचाईच्या नावाने २९० ते ३५० अशा चढ्या दराने विक्री केले जात आहे.
           तसेच विदर्भ को - ऑपरेटीव्ह सोसायटी आणि इतर संस्था, बचत गट, विक्रेते यांच्या कडून 'युरीया' ची मागणी करण्यात येवूनही डिलर कडून पुरवठा होत नसल्ल्याने सदरची क्रुत्रिम टंचाई निर्माण झाली असून जिल्हा क्रुषी अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही भाई रामदास जराते यांनी केला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरून युरीया खतांच्या पुरवठ्याची चौकशी करून २६६ रुपयांपेक्षा अधिक दराने 'युरीया' विक्री होण्यास कारणीभूत असलेल्या डिलरवर कारवाई करण्यात येवून काळ्या यादीत टाकावे अशी मागणी  शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे क्रुषीमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेकडे  केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.