Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर १५, २०२१

26 नक्षल्यांना कंठस्नान घातले | गडचिरोली पोलीस दलास ५१ लाख रुपयांचे बक्षीस |

गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्यांना आणि एकूण २६ नक्षलवाद्यांना ठार (Naxal Encounter) करत या चळवळीचं कंबरडं मोडलं आहे. या कामगिरीबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जिल्हा नियोजनमधील निधीतून गडचिरोली पोलीस दलास ५१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा आज केली आहे. पोलिसांचं मनोबल वाढावं व त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या निधीचा निश्चितच त्यांना फायदा होईल असं ते यावेळी म्हणाले.

Naxal #Encounter #EknathShinde


शनिवारी धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्र अंतर्गत येणा-या मदिनटोला जंगल परिसरात घडून आलेल्या भीषण चकमकीत जिल्हा पोलिस दलाच्या सी-60 जवानांनी 26 नक्षल्यांना कंठस्नान घातले. यात नक्षल्यांच्या सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडे याचेसह 16 नक्षल्यांची ओळख पटविण्यात आली आहे. तर उर्वरित 10 मृत नक्षल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या चकमकीत मोठ्या कॅडरचे नेते ठार झाले असून यात 20 पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे. या घटनेने उत्तर गडचिरोलीत नक्षल चळवळ संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. विशेषत: या वर्षातील नक्षल चळवळी विरोधात ही सर्वात मोठी कारवाई असून ही कामगिरी ऐतिहासिक अशी ठरली असल्याची माहिती डीआयजी संदीप पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.

पत्रकार परिषदेला जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधिक्षक समीर शेख, अपर पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधिक्षक अनुप तारे आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.