अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या..
भारतीय जनता पार्टी सावली तर्फे तहसिलदारांना निवेदन
सावली - तालुक्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात नुकसान झाली असून, कापलेल्या धानाच्या सरड्या पोहायला लागल्या आहेत.
त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांला या कठीण प्रसंगात आधार देण्याची गरज असून प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.
अशी मागणी भाजपा सावली तर्फे तहसिलदार पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी अविनाश पाल जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी तथा तालुकाध्यक्ष, सतिशभाऊ बोम्मावार तालुका महामंत्री, संतोष तंगडपल्लीवार जि.प.सदस्य, अर्जुन भोयर कोषाध्यक्ष प्रकाश पा. गड्डमवार, गणपत कोठारे पं. स., यशवंत ताडाम माजी जि. प. सदस्य, आशिष कार्लेकर शहर अध्यक्ष, दिपक शेंडे, विशाल करंडे युवा जिल्हा उपाध्यक्ष, अनिल माचेवार ग्रा. प. सदस्य,सचिन कटकमवार, पत्रुजी परचाके माजी सरपंच कापसी, हरिश जक्कुलवार,मोहन चन्नावार, किशोर मलोडे, तुळसीदास भुरसे व सर्व कार्यकर्ते व सावली तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.