संचारबंदीत अडकलेल्यांना स्वगृही आणण्यासाठीच्या
प्रयत्नांना वेग, आमदार किशोर जोरगेवार यांची
निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक
चंद्रपूर:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी बाहेर जिल्ह्यासह परराज्यात अडकले आहे. या नागरिकांना चंद्रपूरात आणण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न सुरु केले आहे. याकरीता आमदार किशोर जोरगेवार यांनी एक आँनलाईन संकेतस्थळ सुरु केले आहे. याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून या संकेतस्थळावर १२ तासात जवळपास दीड हजार अर्ज प्राप्त झाले आहे. तासाला या अर्जांची संख्या झपाट्याने वाढत आहे हे विशेष.
संपुर्ण जगात कोरोनाने थैमान घातला आहे. भारतात आँनलाईन नंतरही कोरोना बाधीतांचा आकडा दिवसागणीक वाढत चालला आहे. त्यामूळे हे आँनलाईन आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. मात्र या आँनलाईनमूळे चंद्रपूर जिल्हातील नागरिक व विशेषतः विद्यार्थी बाहेर जिल्ह्यासह परराज्यात अडकून पडले आहे. आँनलाईन वाढत जात असल्याने बाहेर अडकलेल्यांच्या अडचणीत भर पडत आहे. मात्र आता या सर्वांना स्वगृही परत आनण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न सुरु केले आहे. आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने आँनलाईन संकेतस्थळ तयार करण्यात आले असून बाहेर अडकेल्यांना या संकेतस्थळावर अर्ज दाखल करायचा आहे. यात त्यांची पुर्ण माहिती भरावी लागत आहे. सध्या या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.
मागील १२ तासात या संकेतस्थळावर दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहे. तासाला अर्जांची संख्या वाढत आहे. आलेले सर्व अर्ज जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्याकडे देण्यात येणार असून योग्य तपासणी करुन अर्ज धारकाला चंद्रपूरात आणण्याचे प्रर्यत्न केल्या जाणार आहे. याकरिता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अडकुन पडलेल्या जिल्हातील जिल्हाधिका-यांशी संपर्क साधणार आहे.
आज आमदार किशोर जोरगेवार यांनी या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांची भेट घेतली असून जारी करण्यात आलेल्या संकेत स्थळावर दुपारी २ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची यादी त्यांना देण्यात आली. आता या यादींची जिल्हाधिकारी कुणार खेमाणार यांच्या मार्फत योग्य तपासणी केल्या नंतर संबधीत जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांशी संपर्क साधून तेथे अडकलेल्या चंद्रपूरातील नागरिकांना स्वगृही आणण्याची प्रक्रिया पुर्ण करणार आहे. चंद्रपूरात पोहचल्यानंतर या सर्व नागरिकांना प्रशासनाच्या सुचनांचे पालण करावे लागणार आहे. मागील अनेक दिवसांपासून बाहेर अडकलेल्या नागरिकांना चंद्रपूरात परत आणण्याची मागणी त्यांच्या नातलगांकडून केल्या जात होती. आता या प्रक्रियेला सूरुवात झाली असून त्याला वेग आला आहे. चंद्रपूर जिल्हातील प्रत्येक नागरिक चंद्रपूरात सुरक्षीतरित्या परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले आहे.