चंद्रपूर /प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा हा कोरोना मुक्त असून यात एकही पाॅझीटीव्ह रूग्ण नाही. जे 2 रूग्ण चंदपूर च्या नावाने दर्शविल्या जात होते त्यांचा कुठलाही संपर्क चंद्रपूर जिल्हयाशी झालेला नसतांना चंद्रपूर जिल्हयाला ऑरेंज झोन मध्ये चुकीने नमुद केले असल्याने या जिल्हयाचा ग्रीन झोन मध्ये समावेश करावा अशी विनंती पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय स्वास्थ तथा परिवार कल्याण मंत्री डाॅ. हर्ष वर्धन यांना केली आहे.
केंद्रीय स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालयाच्या सचिवांकडून दि. 30 एप्रील 2020 रोजी कोरोना बाधीत जिल्हयांची झोन पध्दतीने यादी जाहीर करण्यात आली मात्र या यादीत चंद्रपूर जिल्हयाचा समावेश चुकीने आरेंज झोन मध्ये करण्यात आली असल्याची बाब हंसराज अहीर यांनी केंद्रीय मंत्री डाॅ. हर्ष वर्धन यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. पुढे अहीर यांनी सांगीतले आहे की, जे 2 रूग्ण चंद्रपूर च्या नावाने दाखविण्यात आले आहेत ते इंडोनेशिया येथून परत येतांना नागपूर विमानतळावर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्वरीत परस्पर त्यांना नागपूर येथेच वैद्यकीय सेवा पुरविण्यात आल्या, त्यांचा चंद्रपूर जिल्हयाशी कुठलाही संबंध आला नाही फक्त त्यांचे कायमस्वरूपी निवास हे चंद्रपूर जिल्हयात आहे. या रूग्णांनी फेब्रुवारी महिण्यातच चंद्रपूर सोडून इंडोनेशिया या देशात गेेले व परतीच्या प्रवासात त्यांना कोरोणा रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे असेही यात हंसराज अहीर यांनी नमुद केले आहे
चंद्रपूर जिल्हा कोरोना मुक्त असून यात चंद्रपूर जिल्हयातील विविध षासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांची व सुचनांची अंमलबजावणीची फलश्रूती असून चंद्रपूर जिल्हयाचा समावेष आॅरेंज झोन एवजी ग्रीन झोन मध्ये करून त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांचा सन्मान करावा अषी विनंती सुध्दा हंसराज अहीर यांनी यावेळी डाॅ. हर्षवर्धन यांना केली आहे.