Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०१, २०२०

कोरोनाविरोधाच्या लढाईत खासदारांच्या सौभाग्यवतीही उतरल्या मैदानात




जुन्नर / आनंद कांबळे
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या सौभाग्यवती डॉ. अश्विनी अमोल कोल्हे यादेखील कोरोना विषाणूंच्या संकटाशी दोन हात करत कोविड योध्दा म्हणून पुढे आल्या आहेत. डॉ अश्विनी कोल्हे ह्या केईएम हॅास्पिटलमधे असिस्टंट प्रोफेसर म्हणून २००९ पासून कार्यरत असून त्याचबरोबर रक्तवाहिन्या, शवविच्छेदन, चेतारोग विज्ञान तसेच जठरमार्गावरिल उद्भवणारे विकार यासारख्या पॅथॅलॅाजी विभागात देखील काम करत आहेत.

याशिवाय दुसरी ओळख सांगायची झाली तर त्यांचे यजमान अभिनय क्षेत्राबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच त्यांना दोन मुले असा छोटेखानी परिवार आहे.रोज सकाळी उठून घरातील कामे, दोन्ही मुलांना नाष्टा, जेवणाची व्यवस्था करुन त्या रोजच्या वेळेवर हॅास्पिटलमध्ये हजर असतात.हॅास्पिटलमधिल इतर सहकारी यासोबत सर्वात अग्रभागी असणा-या सौ. डॉ. अश्विनी अमोल कोल्हे आहेत.

‌‌ सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीवर इतर हॅास्पिटल प्रमाणे केईएम हॅास्पिटलमध्येही अनेक रुग्णांना विलगीकरन कक्षात ठेवलेले असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. कधी हॅास्पिटलमधून घरी जाण्यास उशीर झाला तर आपल्या दोन्ही चिमुकल्यांना आपण लढत असलेली कोरोना विरुध्दची लढाई अभिमानाने सांगतात.

मी एक महिला आहे म्हणून घरी न थांबता बरोबर सोबतीला दोन लहान मुलांना घेऊन स्वतःच कुटुंब सांभाळत त्यात आपले पती लोप्रतिनिधी असल्याने प्रसारमाध्यमांवर कोरोना विरुध्दची लढाईत सतत समुपदेशनाबरोबर आपल्या मतदारसंघातील उपेक्षित घटकांना मदत मिळावी यासाठी सतत काम करत आहेत. आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा वापर करत आज दोघेही वेगवेगळ्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात ऑन फिल्ड सेवा करत असल्याचे पाहताना निश्चित समाधान वाटते. पडद्यावरील योध्यांप्रमाणे त्या काम करत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.