यवतमाळ/प्रतिनिधी:
जिल्ह्याच्या नांदेड सीमेवरील उमरखेड येथे सोमवारी मुस्लीम समाजाच्यावतीने छत्तीसगडमधील एका घटनेच्या निषेधार्थ सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्याला आलेल्या काही लोकांनी बसस्थानकासमोर आल्यावर दुकानांवर दगडफेक करून दुकानाच्याकाचा फोडल्या,रस्त्यालगत उभ्या वाहनांची नासधूस केली व नुकसान केले.तर काही जण जखमी झाले.
या घटनेनंतर लगेचच शहरातील बाजारपेठ बंद झाली.या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले,सर्व व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करीत पोलिस ठाण्याच्या प्रांगणात ठिय्या दिला.
या प्रकरणात पोलिसांनी आयोजक आठ जणांसह 30-35 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विकास तोटावार व ठाणेदार अनिल किनगे यांनी चोख बंदोबस्त लावला असून, शहरात तणावपूर्ण शांतता आहे.