Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०३, २०१९

विटा - महाबळेश्वर रस्त्यावरील अतिक्रमणे हटली


  • चोराडे वडगाव रहाटणी पुसेसावळी  गावांचे भाग्य उजळणार
  • औद्योगिक क्षेत्राच्या वाढीलाही मिळणार चालना



राजू पिसाळ/पुसेसावळी

सातारा जिल्ह्यात नव्याने मंजूर करण्यात आलेला महाबळेश्वर - विटा या महामार्गामुळे खटाव तालुक्यातील कायम औद्योगिक विकासापासून वंचित असलेल्या चोराडे ,वडगाव, रहाटणी, पुसेसावळी या गावांचे भाग्य उजळणार असून या महामार्गामुळे या ठिकाणी औद्योगिक वाढीची चालना मिळण्याची शक्यता आहे,

सातारा सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या या गावांना आजपर्यंत रस्त्यांच्या बाबतीत कायम मागास असलेला हा भाग आहे आजवर या भागातून सिंगल रस्ता जात होता त्यामुळे अनेक वेळा खराब रस्त्यांचे कारण पुढे करून या मार्गावरील एसटी बसेसही महामंडळाने बंद केल्या होत्या,
या मार्गावर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच बसेस दिवसभर धावतात त्यामुळे अनेक वेळा सातारा - सांगली कराडहून येताना प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता तसेच खाजगी वाहनांचाही आधार घ्यावा लागत आहे या गावांपासून एक दोन किलोमीटरवर सांगली जिल्हा आहे या ठिकाणी रस्त्यांचा दर्जा व औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे पण खटाव तालुक्यातील या गावांमध्ये आजवर कोणताही विकास झाला नाही ,
त्यामुळे महाबळेश्वर विटा महामार्गाचे काम सुरु झालेमुळे या भागाचा कायापालट होईल अशी आशा इथल्या शेतकरी वर्गाला लागलेली आहे. विशेष करून चोराडे ,रहाटणी, वडगाव ,या खेडेगावातून जात आहे. त्यामुळे या भागाचे भाग्य उजाळणार असल्यामुळे इथल्या शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता आहे असा प्रश्न इथल्या प्रवाशांना पडलेला आहे, त्यामुळे कधी रस्ता सुरु होतोय याकडे लक्ष लागले होते, परंतु काही दिवसापासून या रस्त्याच्या कामला सुरुवात झाल्यामुळे प्रवाशी वर्गात समाधानकारक स्थिती जाणवत आहे.
या रस्त्यांचे भाग्य उजाळणार आणि आमच्या भागाचा औद्योगिक विकास होणार तसेच इथल्या लोकांना रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.  तरी आता काम सुरु झाल्यामुळे या भागाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील.

महाबळेश्वर विटा रस्ता मंजूर झाल्यानंतर काही दिवसात रस्त्याचे मोजमाप पुर्ण होऊन काम सुरु झाले,परंतु रस्त्याच्या कडेला असणार्‍या नागरिकांची घरे पाडण्याच्या सुचना बांधकाम विभागांकडून आल्या आणि त्याचप्रमाणे अनेकांनी बांधकामे काढली आहेत. तरी काढलेल्या बांधकामांना शासनस्तरावरून मदत मिळणे आवश्यक आहे त्यामुळे याबाबत शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.
- श्रीकांत पिसाळ , (ग्रामपंचायत सदस्य चोराडे)



विटा महाबळेश्वर रस्त्याचे काम सुरु झाले असुन आम्ही रस्त्याच्या बाजुची घरे पाडली असुन ही आमची घरे बर्‍याच दिवसाची आहेत तसेच या घरांची नोंद सि.टी.सर्वे व ग्रामपंचायत मध्ये असुन आम्हाला या घरांचा मोबदला मिळाला पाहिजे.
दत्तात्रय पिसाळ  ( ग्रामस्थ चोराडे )

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.