Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०३, २०१९

स्फोटक पावडरसदृश्य वस्तू, घातक हत्यार सापडले


  • पिंपळवंडी येथे आरोपीस अटक


जुन्नर /आनंद कांबळे

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील अभंगवस्ती परिसरात मंगळवारी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून बॉम्ब सदृश्य वस्तू तसेच इतर घातक हत्यारांसह आरोपीस अटक केली.

पिंपळवंडी येथील अभंगवस्ती (भटकळवाडी) परिसरात स्फोटक पावडरसदृश्य वस्तू तसेच इतर घातक शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या नुसार पथकाने सापळा रचून आरोपी राजाराम किसन अभंग (वय 60,रा.अभंगवस्ती पिंपळवंडी) यास अटक केली असल्याची माहिती,पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. या वेळी संबंधीत आरोपिकडे 2 भाले,1 पाईप गण(बंदूक),1 तलवार,1 हेलमेट,1 चिलखत,तसेच स्फोटक पावडरसदृश्य वस्तू आदी साहित्य सापडले. या ठिकाणी बॉम्बशोधक पथकानेही भेट दिली असून पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.या ठिकाणी 2003 मध्येही असाच प्रकार घडला होता.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.