Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०३, २०१९

सर्व्हिस रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ

  • अटलांटा टोल प्लाझा कंपनीचे दुर्लक्ष
  • फक्त टोलचा पैशा जमा करण्यात गुंग

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळेनागपूर-अमरावती महामार्ग क्रमांक सहावरील वाडी ते कोंढाळी पर्यतच्या चार पदरी रस्त्याचे काम अटलांटा टोल प्लाझा कंपनीला दिले होते . ते चार पदरी रस्त्याचे काम सात वर्षापूर्वीच पूर्ण करुन गोंडखैरी येथील उभारलेल्या टोल नाक्याच्या माध्यमातून पैसाही जमा होत आहे .परंतु आठवा मैल ते नवनीत नगर , नवनीत नगर ते वाडी तसेच गोंडखैरी येथील सर्व्हिस रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही परिणामी अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे . राष्ट्रीय महामार्गावरून वाहने वायू वेगाने जात असल्यामुळे स्थानीक नागरीकांसाठी अंतर्गत सर्वीस रस्ता अपघातापासून वाचविण्यासाठी तयार करण्यात आलेला असतो . दवलामेटी,आठवा मैल येथे विद्यालय व महाविद्यालय असून येथे नवनीत नगर मधील विद्यार्थी ज्ञानार्जन करण्याकरीता येतात सर्वीस रस्ता अपूर्ण असल्यामुळे महामार्गावरूनच विद्यार्थ्याना येणे जाणे करावे लागते . त्या कारणाने पालकवर्गानी अंटलाटा कंपनीच्या विरोधात पत्रव्यवहार सुद्धा केला . करारानुसार बसस्थानक , शौचालय आदी प्रकारच्या सोईसुविधा नसल्यामुळे स्थानिक नागरीकांनी या विषयी अनेकदा निवेदन सुद्धा दिले . परंतु आजपर्यत अटलांटा कंपनीने टोलवा टोलवीचे उत्तर देऊन फक्त दिवस पुढे ढकलले आहे .

गोंडखैरी येथील सरपंच यांचाही अपूर्ण सर्विस रस्त्यामुळे अपघात झाला होता . सर्विस रस्ताच्या अपुऱ्या कामामुळे व अटलांटा कंपनीच्या दुर्लक्षीत कामामुळे चार ते पाच अपघात झाले असून दोन तरुणाला आपला जीव गमवावा लागला . तरीही अटलांटा कंपनी या कडे दुर्लक्ष करीत आहे . अटलांटा कंपनीची यंत्रणा कुचकामी ठरली असून मोठ्या अपघाताची वाट तर पहात नसावी. असे स्थानीक नागरीकांचे म्हणणे आहे .
महामार्ग लागुन असलेल्या ग्रामपंचायतने अंटलांटा कंपनीला वारंवार पत्रव्यवहार करुन सुध्दा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. थोडाफार पाऊस जरी झाला तरीही सर्व्हिस रस्त्यावरून पाणीच पाणी वाहतात परिणामी दुचाकी वाहन रस्त्यावर घसरून पडल्याच्या घटना घडलेल्या आहे . 

काही ठिकाणी सर्विस रस्त्यावरच विद्युत खांब व झाडे असल्यामुळे हा सर्विस मार्ग जिवघेणा झालेला आहे. या विद्युत खांब व झाडे काढण्याची परवानगी मिळाली असूनही अटलांटा कंपनी कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे स्थानिकांच्या मनात रोष दिसून येत आहे.आठवा मैल ते वाडी पर्यतचे सर्विस रस्त्याचे वर्षाभरापासून अपूर्ण असलेले काम त्वरीत पुर्ण करून सुरळीत करावे जेणे करुन होणारे अपघात टाळता येईल. अन्यथा अटलांटा टोल कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा आठवा मैल व नवनीत नगरमधील नागरीकांनी दिला आहे.


सर्विस रस्त्याच्या जागेवरूनच महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची पाईप लाईन गेली होती ती काढण्यासाठी नोटीस दयावी लागली तसेच बीएसएनएल कंपनीचे केबल रस्त्याखालुनच गेले होते ते काढण्यासाठी काही दिवस निघून गेले अशा अनेक प्रकारच्या अडचणीत वाढ झाल्यामुळे आठवा मैल ते नवनीत नगर पर्यतचा सर्विस रस्ता अपूर्ण राहीला आहे वीस ते पंचवीस दिवसात पूर्ण करून डांबरीकरण करणार असल्याचे अंटलांटा कंपनीचे जनरल मॅनेजर (व्यवस्थापक ) एम .जी. बेग यांनी तभाशी बोलतांना सांगीतले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.