Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २०, २०१३

लोक बिरादरीचे छायाचित्रांचे प्रदर्शन

महारोगी सेवा समिती, वरोरा द्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पातल्या गेल्या ४० वर्षातल्या वाटचालीचे काही थरारक क्षण जिवंत करणाऱ्या सुमारे १४० छायाचित्रांचे प्रदर्शन “कलादालन, केशवराव भोसले सभागृह”, खासबाग मैदाना जवळ, कोल्हापूर (दिनांक १ ते ३ डिसेंबर २०१३, वेळ सकाळी ९ ते रात्री ९) व भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन, औंध, पुणे, (दिनांक ६ ते १० डिसेंबर २०१३, वेळ सकाळी १० ते रात्री ८) येथे आयोजित करण्यात आले आहे.

बांबू क्राफ्ट प्रदर्शन: छायाचित्रांबरोबरच प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी बनविलेल्या बांबू हस्तकलेच्या वस्तूही या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा म्हणून लोक बिरादरी प्रकल्पा मार्फत बांबू क्राफ्ट प्रशिक्षण व विक्री केंद्र चालविल्या जाते.

पुस्तके व फिल्म: लोक बिरादरी प्रकल्पाच्या कार्यावर आधारित विडीओ फिल्म तसेच प्रकाशवाटा¸ समिधा¸ नेगल¸ रानमित्र¸ एका नक्षलवाद्याचा जन्म इत्यादी पुस्तके सुद्धा प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत.

महाराष्ट्राच्या एका टोकाला अतिशय दुर्गम भागात चालणाऱ्या या निरलस कार्याचा प्रारंभ स्व. बाबा आमटे व स्व. साधनाताई आमटे यांनी १९७३ मध्ये केला. त्यानंतर डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी अन्य कार्यकर्त्यान समवेत ही जबाबदारी उचलली. आज हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्यात दरवर्षी ३५ ते ४० हजार रुग्ण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतात. लोक बिरादरी च्या आश्रमशाळेत सुमारे ६५० आदिवासी विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. तसेच जंगलतोड आणि शिकारीमुळे मरणाच्या तोंडाशी पोहोचलेल्या अनाथ वन्य जीवांना आमटेज् अनिमल आर्क (वन्यप्राणी अनाथालय) मध्ये अभय देण्याचे कार्य अविरत सुरु आहे.

हे कार्य शहरातील जनते पर्यंत पोहोचावे या हेतूने हे प्रदर्शन गेली ६ वर्षे आम्ही नीर निराळ्या शहरात भरवित असतो. सुसंस्कृत-सजाण-जागृत-संवेदनशील नागरिकांनी सह कुटुंब-सह परिवार या प्रदर्शनाला भेट द्यावी व प्रकल्पात नव्याने बांधण्यात येत असलेल्या मोफत आरोग्यसेवा देणाऱ्या सर्वोपचार दवाखान्याला आर्थिक मदत करून लोक बिरादरी प्रकल्पातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा असे आव्हान लोक बिरादरी मित्रमंडळ, पुणे तर्फे करण्यात येत आहे. देणगीचा चेक "महारोगी सेवा समिती, वरोरा" या नावाने काढावा.

ऑन लाईन देणगी पाठवावयाची असल्यास खाली दिलेल्या खात्यात देणगी जमा करता येते.

S.B. Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora
S.B. Account No.: 20244238823 (Bank of Maharashtra, Bhamragad branch)
IFSC: MAHB0001108

अधिक माहिती करिता श्री. सचिन मुक्कावार - 7588772858 यांच्याशी अथवा लोक बिरादरी मित्रमंडळ, पुणे च्या कार्यकर्त्या सौ. शिल्पा तांबे – 9850666729, कोल्हापुरातील श्री. प्रशांत जोशी - ९७६४२२१९१७, श्री. अमोल कोरगावकर - ९४२२४२४७६३ यांच्याशी संपर्क करावा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.