Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०९, २०१९

चोराडेतील विकास कामांना गती देण्याचे काम करणार:बाळासाहेब पाटील

(राजु पिसाळ) पुसेसावळी, कराड:

 मी नेहमी सांगतो की लोकांच्या भावनेशी खेळु नका आता बघा निवडणुका आल्या की काही लोक आम्ही एवढा विकास केला तेवढा विकास केला हे शंभर टक्के सांगणार इथच नाही ही राज्यातमध्येही तिच पद्धत आहे,
त्यामुळे माझ्या कामाची पद्धत अशी आहे जो पर्यंत काम सुरु करत नाही तो पर्यत तिथल्या विकासकामांचे भुमिपुजन करत नाही,असे प्रतिपादन आ.बाळासाहेब पाटील यांनी केली.

चोराडे (ता.खटाव ) येथे रस्त्याच्या भूमीपूजनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, म‍ाजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत,उपसभापती संतोष साळुंखे,नंदकुमार मोरे,सह्याद्रीचे संचालक संजय जगदाळे पं.स.सदस्या जयश्री कदम, पं.स.सदस्या रेखा घार्गे,माजी उपसभापती बबनराव कदम,माजी सभापती सी.एम.पाटील सरपंच संतोष घार्गे, महादेव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ.पाटील म्हणाले की सह्याद्रीच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, या शासनाने विविध निर्णय घेतले परंतु त्या निर्णयाच्या परिणामांची काळजी घेतली नाही, त्यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला आहे, सध्या या सरकारची पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करण्याची भुमिका आहे परंतु कायद्याने जो अधिकार आहे त्याच्या माध्यामातून हि विकासकामे आपण देत आहोत,कराड-उत्तर मतदारसंघातील चोराडेतील मुलभूत समस्यांचा सातत्याने पाठपुरावा करुन त्या समस्या सोडविल्या आहेत, 

तद्नंतर नंदकुमार मोरे म्हणाले की विकास काय असतो तो तुम्ही या भागाचे नेतृत्व करायला लागल्यापासुन कळायला लागले आहे, तुमचे नशीब चांगले म्हणुन पुसेसावळी जिल्हा परिषद गट हा कराड उत्तर मतदारसंघास जोडला गेला आदरणीय पी.डी.पाटील साहेबाच्या मुशीमध्ये लहानाचे मोठे झालेले आपण संस्काराचा आदर्श मिळालेले आपण तुमच्या नेतृत्वामुळे आमच्या भागात साकव पुल, रस्ते, सभा मंडपे,तालीम बंधारे अशा सगळ्या प्रकारची कामे मार्गी लागली आहेत, 

समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड म्हणाले कि राजकारणात पाऊल टाकताना ते योग्य आहे का ? याची खात्री करावी, योग्य नेत्याच्या विचाराने विकास कामाला प्राधान्य दयावे, मतदारसंघाबरोबर इतर भागाचा विकास करणारे सर्व समावेशक नेतृत्व या भागाला मिळाले आहे, त्यामुळे विकासकामांचा वेग चांगला आहे, त्यातच मी सभापती असणार्‍या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातुन चोराडेस पुरेपुर निधी देण्याचे काम केले आहे,

या कार्यक्रमास संभाजी कदम(सर),चेअरमन लक्ष्मण घार्गे,अविनाश घार्गे,सुरेश पिसाळ,तुषार माने ,बजरंग पिसाळ बापुराव पिसाळ ,हणमंत पिसाळ ,शंकर पवार,शिवाजी अवघडे, श्रीकांत पिसाळ, विजय पिसाळ,संजय पिसाळ, राजाराम पिसाळ,शांताराम पिसाळ, उमेश पिसाळ, श्रीरंग पिसाळ विलास पिसाळ, नंदकुमार पिसाळ,रविद्र पिसाळ,संजय चव्हाण,सुनिल जानकर,प्रशांत पिसाळ, पिंटु घार्गे ,भाऊसो मदने, हणमंत मदने,अशोक पिसाळ,तुषार पिसाळ,अतुल कोळी, लक्ष्मण जानकर, सुनिल पिसाळ,पै.अक्षय घाडगे, विठ्ठल पिसाळ,गौरव पालकर,अजय कदम, अक्षय पिसाळ, संतोष कोळेकर,शिवाजी देसाई ,आदीची व परिसरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक श्रीकांत पिसाळ यांनी केले तर आभार हणमंत पिसाळ यांनी मानले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.