ग्रामपंचायतीच्या १४ वित्त आयोगातुन खर्च केलेला ६ लाखाचा निधी गेला वाया
विरोधकांकडुन मंजुर होत असलेल्या विकास कामांना खो घालण्याचा प्रयत्न
पुसेसावळी (राजु पिसाळ) कराड:
खटाव तालुक्यातील चोराडे ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातुन पिण्याच्या पाण्याच्या टाकीखाली बसविलेल्या पाणी शुध्दीकरणाच्या प्लांटला ६ लाख रुपये निधी खर्चुन उभा करण्यात आला.परंतु निधीचा दुरुपयोग झाल्याचे दिसुन असून पाणी शुध्दीकरणाचा प्लांट चालु केल्यानंतर काही तासातच बंद झाल्याने , तो आजतागायत बंद अवस्थेतच आहे.
त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची पाईपलाईन लिकीज झालेली आहे. त्यामुळे सत्ताधारी गावचा नक्की विकासच करताय का ? असा प्रश्न त्यांच्या या कार्यामुळे स्पष्ट हाेत आहे.सध्या हा पाणी शुध्दीकरणांचा प्लांट धुळ खात बसला आहे. तरी सत्ताधांर्याकडुन १४ वित्त आयोगातील निधी खर्च करण्यास सक्षम नसल्याने याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालुन खर्च करण्याची गरज आहे.
तसेच सरपंचपदी महिला उमेदवार असल्याने त्यांच्या कारभारात बाकींच्याचीच लुडबुड जास्त असल्यामुळे गावच्या कामकाजावर यांचा परिणाम जाणवत आहे.ग्रामसेवकांची भूमिका ही गावच्या हिताची असावी ,मात्र याठिकाणी चित्र उलटे आहे. आण्णासाहेब फक्त सत्ताधाऱ्यांचेच ऐकत असल्यामुळे विरोधकांची कामे करण्यास त्यांची चाल-ढकल सर्वश्रुतच आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये स्ट्रीट लाईट संदर्भातील ग्रामपंचायतीला विद्युत कंपनी कडुन पत्रव्यवहार हाेवून देखील चोराडे गावातील सद्यस्थितीमध्ये असणार्या स्ट्रीट लाईटचे थकबाकी भरावी व थकबाकी भरलेचे पत्र सादर केले तरच तांबोटीमळा, मांगवाडा मळा, कोलिस्त वस्ती, नांगरे वस्ती,परटाचे माळ,पाटलुबाचा मळा, या मळ्यामधील लाईट संबंधीचा प्रस्ताव मंजुरी बाबत जिल्हा नियोजन कार्यालयाकडे पाठवता येईल .
परंतु याबाबत ग्रामपंचायतीत काही सदस्यांनी वारंवार सांगुनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत की स्ट्रीट लाईटची बिले जिल्हा परिषद भरते, परंतु आता ही पद्धत बंद झालेली असुन ती बिले ग्रामपंचायतीने भरावयाची आहेत. अनेकवेळा याबाबत गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना बिले भरणेबाबत सुचनाही केलेल्या हाेत्या. तरीसुद्धा त्यांच्या कडुन आजपर्यंत बिले भरली गेली नाहीत.
त्यामुळे चोराडे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झाली असुन या ग्रामपंचायतीला सक्षम अधिकारी देऊन ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थितपणे चालवला जावा. या ग्रामपंचायतीत ९ सदस्य संख्या आहे त्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडे ५ सदस्य तर विरोधांकडे ४ सदस्य आहेत. तरी सुद्धा ग्रामपंचायतीतील मासिक मिटींगमध्ये झालेल्या विषयात या ग्रामसेवकांना हाताशी धरुन काही बदल केले जात आहेत.