Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०२, २०१९

7 वा वेतन आयोग त्रुटी समिती गठीत करण्यात यावी


पुरोगामी शिक्षक समितीची मागणी

राज्य कार्यकारिणी सभेत विद्यार्थी व शिक्षक हिताचे अनेक ठराव पारित


चंद्रपूर- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारी मंडळ सभा श्रीक्षेत्र शेगाव येथे संपन्न झाली सभेच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील हे होते, तर विनायकराव घटे राज्य आर्थिक सल्लागार, विजय भोगेकर राज्य नेते, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस, बालाजी पांडागळे कोषाध्यक्ष, अल्काताई ठाकरे म.मंच राज्याध्यक्ष, चंदाताई खांडरे म.मंच सल्लागार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सभेत विद्यार्थी व शिक्षक हिताचे पुढील प्रमुख ठराव पारित करण्यात आले. जुनी पेन्शन योजना लागू करावी व डी.सी.पी.एस.कपात, पावती बाबत राज्यभर एकवाक्यता असावी, 7 वा वेतन आयोग निश्चिती मध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्ती साठी त्रुटी निवारण समिती गठीत करणे व याबाबत संघटनेने दिलेल्या प्रस्तावावर विचार करन्यात यावा,1.1.2016 ते वेतन आयोग अधिसूचना लागू होण्याच्या कालावधीत वरिष्ठ श्रेणी लागु होणाऱ्या शिक्षकांना 4200 Gp ऐवजी 2800 Gp वर वेतन फिक्सएशन करतांना होणारा अन्याय दूर करावा, एकाच तारखेला रुजू झालेल्या पदवीधर व सहायक यांच्यामध्ये पदवीधर चे वेतन कमी येत आहे. हा अन्याय दूर व्हावा, 7 वा वेतन आयोगात एकस्तर चे लाभ पूर्ववत सुरू ठेवावे व प्रोत्साहन भत्ता 7 व्या वेतन आयोगानुसार मिळावा, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोग Gr मध्ये आर्थिक श्रेणीवाढ उदाहरण सह जोडपत्र काढून स्पष्ट करण्यात यावी, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका अवघड घोषित करण्यात यावा व त्या तालुक्यात सेवा केल्याची नोंद अवघड क्षेत्र सेवेत घेण्यात यावी, सर्व विषय शिक्षकांना 4300 ग्रेडपे लागू करावा, गोंदिया, यवतमाळ येथील संपकालीन कपात वेतन देण्यात यावे, अप्रशिक्षित शिक्षकांना रुजू दिंनाकापासून वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, सर्व उच्च प्राथमिक शाळांना विनाअट मुख्याध्यापक पद लागू करावे, खाजगी शाळा सारखे 28 फे. 2015 च्या Gr प्रमाणे जि प शाळांना मुख्याध्यापक पद कायम करावे, निवड/ वरिष्ठ श्रेणी साठी टक्केवारी तसेच (Gr 23/10/17) शाळा सिद्धी, प्रगत शाळा ह्या अटी कमी करण्यात याव्यात, म.न.पा./न.पा. शिक्षकांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा, विस्थापित शिक्षकांना बदलीची संधी मिळावी, बदली अर्हता तारीख 30 जून करण्यात यावी, शुद्धीपत्रकाचे स्पष्टीकरण करण्यात यावे, सर्व जिल्ह्यात समान नोंदी पोर्टल ला व्हाव्यात, शाळांचे वीजबिल ग्रामपंचायत ने भरावे, 10, 20, 30 ही आश्वसित प्रगती योजना शिक्षकांना लागू करण्यासाठी स्वयंस्पष्ट आदेश जारी करण्यात यावे, मार्च 2009 च्या आधी सेवानिवृत्त शिक्षकांना वरिष्ठ/निवड श्रेणी मंजुरीसाठी असलेली प्रशिक्षणाची अट कमी करावी. म्हणजेच 20 जुलै 2004 च्या शासन निर्णयातील प्रशिक्षण अट वगळण्यात यावी, शाळा फंडातील व्याजाची रक्कम वापरण्याची परवानगी देण्यात यावी, काही जिल्ह्यात प्रलंबित असलेला बदली प्रवास भत्ता निधी अदा करण्यात यावा, Obc शिक्षकांच्या पाल्याना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती ची सन 2017-18 ची मंजूर रक्कम संबंधितांकडे वर्ग करण्यात आली नाही ती तात्काळ वर्ग करण्यात यावी, शालेय विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्या सत्र अखेरीस नियमितपणे वितरित करण्यात याव्या. सोबतच पुढील संघटनात्मक ठराव घेण्यात आले अध्ययन निष्पत्ती बाबत संघटनेच्या वतीने जागृतीपर कार्यशाळा लावाव्यात, नागपूर, चंद्रपूर शाखेच्या उपक्रमाप्रमाणे,7 वा वेतन आयोग निश्चिती कार्यशाळा लावून शिक्षकांचे निशुल्क फिक्सएशन करून देण्यात यावे, संघटना मूल्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे असे ठरविण्यात आले, विशेष बाब म्हणजे सभेत राज्य अधिवेशनाचा हिशोब सादर करण्यात आला हिशोब सार्वजनिक करन्याचे ठरविण्यात आले. महिला मंच राज्याध्यक्ष अल्काताई ठाकरे यांचा स्काऊट गाईडच्या वतीने अमेरिका USA येथे विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. पूरोगामी संघटना परिवारात दाखल झालेल्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले यात मल्लिकार्जुन जोडराने, नांदेड यांनी आपल्या शेकडो समर्थकासह संघटनेत प्रवेश केला, त्यांची नांदेड जिल्हा नेते पदी नियुक्ती करण्यात आली, इरफान बेग मिर्झा कारंजा यांनी आपल्या शेकडो समर्थकासह संघटनेत प्रवेश केला त्यांची वाशीम जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, पंकज भदाणे, नंदुरबार यांची नंदुरबार जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांनी 2 तालुका कार्यकारिणी सह कार्याची सुरवात केली, संजय साहू, यांची हिंगोली जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

सभेला मालती राजमाने, म.म.सल्लागार, लक्ष्मी पाटील, म.म.सरचिटणीस यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच भुपेश वाघ प्रमुख संघटक, श्यामराव चन्ने उपाध्यक्ष, प्रभाकर चौधरी विभाग अध्यक्ष, रवींद्र देवरे वि. सचिव, बाबुराव माडगे वि. उपाध्यक्ष व सर्व जिल्हाध्यक्ष तथा पदाधिकारी पुरोगामी शिक्षक समिती यांची उपस्थिती होती.

राज्य कार्यकारी मंडळ सभेत विद्यार्थी, शिक्षक व पालक हिताचे ठराव पारित केल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने दीपक वर्हेकर, रवी सोयाम, निखिल तांबोळी, सुनीता इटनकर, माधुरी निंबाळकर, विद्या खटी, सुलक्षणा क्षीरसागर यांनी राज्य शाखेचे अभिनंदन केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.