Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०२, २०१९

विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध 3 प्रकारच्या समस्या घेऊन जिल्हाधिकारी भेट

कुणाल खेमणार
कुणाल खेमणार
1) नवोदय परिक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांना संधी देने-
ऑनलाईन फॉर्म भरण्याचा फटका बसल्याने अनेक विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार आहेत याबाबत मा.जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करण्यात आली, नवोदय समिती महाराष्ट्र व नवोदय विद्यालय यांच्याशी संपर्क व चर्चा करून संधी उपलब्ध होत असल्यास नक्की करून देऊ असे आश्वासन साहेबांनी दिले.

2) सैनिकी शाळा वार्षिक फी कमी करणे - ग्रामीण भागातील विद्यार्थी लाखो च्या घरात असलेली फी भरू शकणार नाही करिता फी कमी करावी अशी मागणी केली, यावेळी साहेबांनी प्रवेश पूर्व समितीची सभा होईल त्यात मुद्दा मांडतो तसेच तश्या आशयाचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत सैनिकी शाळा समिती ला पाठवतो असे आश्वासन दिले.

3) निवडणूक सेवेत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी मतदान च्या दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करणे-

याबाबत सविस्तर चर्चा झाली, 2 दिवसीय duty चा ताणतणाव व मध्यरात्री घरी येणे त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळ पाळीची शाळा करणे शक्य नाही, करिता सुट्टी ची गरज आहे हे समजावून सांगितले. साहेबांनी म्हणणे मान्य केले व ceo साहेबांशी चर्चा करून सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
(सदर निवेदन मा.मुख्य निवडणूक आयुक्त महा.राज्य यांना पाठवून राज्यस्तरावर निर्णय घेण्याबाबत प्रस्तावित केले जाईल असे सांगितले)

भेटीच्या वेळी पुरोगामी राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी निखिल तांबोळी, आकाश झाडे, मनोज बेले उपस्थित होते. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.