नागपूर/प्रतिनिधी:
खर्च झाल्याचे दु:ख नाही, हिशेब लागला नाही की मग त्रास होतो’ हे श्री. व.पु.काळे यांचे ‘वपुर्झा’ पुस्तकामधील वाक्य आपल्याला व्यवहारीक जीवनात तंतोतंत लागू होते असे म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही. मागिल काही दिवसंपासून ऊनाचा कहर सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे साहाजिकच पंखा रेफ़्रीजरेटर, एअर कंडीशनर यांच्या वापरही दिवसेंदिवस वाढत आहे, या उपकरणांच्या वीजवापराच्या प्रमाणतच आपल्याला वीजबिल आले आहे की नाही ही शंका उपस्थित होते व याची चाचपणी केल्या जाते.
यात वीजेचा वापर कमी व आवश्यक असेल तेवढाच केल्यास केल्यास वीजबिलात बचत होणे शक्य आहे तर वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल आल्याची क्खात्रीही करता येते.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा समजल्या जायच्या पण २१ व्या शतकात वीज ही प्रत्येकाची अत्यावश्यकच नव्हे तर मुलभूत गरज बनली आहे. पूर्वीच्या तुलनेत आज आपल्या अनेक गरजा व दैनंदिन कामे विजेच्या उपकरणावरच अवलंबून आहेत ही वस्तुस्थिती आहे. घर, कार्यालये, उद्योग, व्यवसाय, शेती, दुकाने वा कुठलेच ठिकाण याला अपवाद नाहीत. आजचे युग हे तांत्रिक युग आहे. त्यामुळे विजेवर चालणारी नवनवीन उपकरणे बाजारात येत आहे.
त्यामुळे प्रत्येक घरी विद्युत उपकरणांची यादी वाढतच आहे व वाढतच जाणार आहे व त्यात रोज नवनवीन विद्युत उपकरणाची भर पडत आहे. मात्र हे उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढला की,विजेचे बीलही वाढत जाणार हे वेगळे सागण्याची गरज नाही. यासोबतच दरवर्षी उन्हाळ्यात आपल्याकडे उन्हापासून बचाव करण्याकरिता घरी, दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी सातत्याने फॅन व कुलरचा व अनेक ठिकाणी एअर कंडीशनरचा वापर करण्यात येतो. तापमानापासून बचाव करण्यासाठी याचा वापर होत असल्यामुळे विजेचा वापर वाढणे सुद्धा साहजिकच आहे.
मात्र आपल्या हातात मे, जून व जुलै महिन्याचे वीज देयक हाती आले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. माझा वापर एवढा नसताना बील भरमसाठ आल्याचे त्यांना वाटत असते. एखाद्या प्रकरणात कर्मचार्याच्या दोषामुळे, चुकीच्या मीटर वाचनामुळे किवा मीटर मधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. मात्र हे सर्वच बाबतीत शक्य नाही.
त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये, दुकान व इतर ठिकाणी असलेली विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनदिन वापर याची जर माहिती करून घेतली व अभ्यास केला तर आपल्यालाही सत्यता पडताळता येईल.
त्यासाठी वीज देयक जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळे व अॅप आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वँट व संख्या,आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपले महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीज बिलाची अंदाजीत रक्कम याची माहिती आपण प्राप्त करू शकता.
त्याचबरोबर आपल्या वीज बिलाच्या मागे असलेल्या वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रती युनिट दर दिलेले असतात त्यामध्ये ० ते १००, १०१ ते ३०० व ३०१ ते ५०० व ५०१ ते १००० व १००१ आणि अधिक युनिट वीजवापरासंदर्भातील दर छापलेले असतात, त्यामुळे एखाद्या महिन्यात जास्त वीज युनिट वापरल्यास त्याचे दरही त्या तुलनेत वाढत असतात. घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच उर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या व स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा, जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त उर्जा बचत होते.
आपल्याला उपकरणांचे वॅट, त्याचा दैनदिन वापर याची माहिती झाल्यास वीज बिलाचे नियोजन करण्यासाठी विजेच्या वापरावर लक्ष ठेवून वीज बिल कमी करता येईल व आलेले वीज बिल एवढे का? याचा उलगडा नक्कीच होईल.
१००० वॅटचे उपकरणाचा जर १ तास वापर केला तर १ युनिट साधारणतः वीज खर्च होते, त्यामुळे एकूण विजेचे वॅट व १ युनिट विजेसाठी लागणारा वेळ यासंदर्भातील तक्ता सोबत दिला आहे.
त्यामुळे या सर्व बाबींची माहिती घेतल्यास व स्वत:च याचे ऑडिट केल्यास वीजबचतीसोबतच वीजबिल नियंत्रित करणे सोपे होईल व वापरलेल्या वीजेचे बिल भरताना त्रासही होणार नाही एवढे नक्की,