ललित लांजेवार/चंद्रपूर:
चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रात कोर झोनमध्ये एक वाघिण मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कक्ष क्रमांक १२३ मध्ये हरिण मारण्याऱ्या फाश्यात अडकून या वाघिणीचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
सदर घटना ही 2 दोन दिवसांपूर्वीची असल्याचे समजते आहे, त्यामुळे या वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून तिची शिकार करण्यात आली आहे, या वाघिणीचे वय अंदाजे दीड ते दोन वर्ष आहे. क्षेत्रसंचालक प्रवीण एन. आर. यांच्यासह कोअर विभागाचे उपसंचालक ना. सि. लडकत यांनी घटनास्थळी भेट देऊन याची माहिती घेतली.
यावेळी मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे हे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या सह वनअधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
गोंडपिपरी :
मानव-वन्यजीव संघर्ष जीवावर उठला असून शुक्रवारी पुन्हा एकदा वाघाने गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी येथील नंंदु मारोती बोबडे ह्या व्यक्तीला आपला शिकार बनविला.
12 एप्रिल 2019 ला नंदू हा मोहफूल वेचायला जंगलात गेला असता नंदू घरी न परतल्याने जंगल शोधाशोध सुरू केली असता त्याचा मृतदेह आढळल्याने त्यावर वाघाचे हल्ल्याचे घाव दिसून आले. त्यामुळे नंदूवर वाघाचा हल्ला झाला असल्याचे निष्पन्न झाले.ही घटना परसोडी येथील कक्ष क्रमांक 533 येथे घडली असून ह्यासंदर्भात वनवीभाग तसेच पोलीस खात्याला माहिती देण्यात आली आहे.