चंद्रपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदावर ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांची निवड थेट भरती प्रक्रियेने झाली असून त्यांनी आपल्यापदाची सूत्रे नुकतीच प्रकाशगड मुख्यालयात स्वीकारली. संचालक (मानवसंसाधन) पद हे नव्याने निर्माण करण्यात आले असून या महत्वाच्या पदावरब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे.उच्च विद्याविभूषित गंजू यांना मानव संसाधन क्षेत्राचा दीर्घ अनुभव आहे.
जम्मू काश्मीर येथील मूळचे असलेले ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांचीसेनादलात ३८ वर्षे सेवा झाली असून त्यांनी विविध महत्वाच्या पदावर कामकेले आहे. भारतभर विविध ठिकाणी सेनादलाच्या सेवाकाळात त्यांनीमहत्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे.
ब्रिगेडियर पवन कुमार गंजू हे विज्ञान शाखेतील पदवीधर असून त्यांनीव्यवस्थापन, पत्रकारिता, कर्मचारी व्यवस्थापन व औद्योगिक संबंध,मार्केटींग, फूड ॲनालायसीस इत्यादी विषयात विविध विद्यापीठातूनपदव्युत्तर पदव्या संपादन केल्या आहेत. याशिवाय त्यांनी सुरक्षा, आपत्तीव्यवस्थापन इत्यादी अनेक महत्वपूर्ण विषयाचे प्रशिक्षण घेतले असून त्यांनीसेनाप्रशासनात मानव संसाधन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.महावितरणच्या मानव संसाधन विभागात अधिक सकारात्मक बदलकरण्याचा मानस ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांनी व्यक्त केला आहे.