ललित लांजेवार/चंद्रपूर:
लोकसभेचे पहिल्या टप्यातील निवळणुका विदर्भात सुरु असतांना ऐन मतदान सुरु असतानाच चंद्रपुरातील राणी हिराई नगर आणि महाकाली नगरवासीयांनी मुंडण आंदोलन करून मतदानावर बहिष्कार घातला.
चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्ड, महाकाली मंदिरासमोरील राणी हिराई नगर आणि महाकाली नगरातील १५० घरांच्या दोन्ही लोकवस्ती व झोपडपट्टीत मागील ५० ते ६० वर्षांपासून घरघुती वीज कनेक्शन, पिण्याचे पाणी,अंतर्गत रस्ते,साफसफाई आणि घरकुल योजनेसारखे मूलभूत नागरी सोयीसुविधांचा गंभीर प्रश्न असून जन प्रतिनिधी अजून फिरकले नाहीत.त्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.
या मूलभूत सोयीचा अभाव असल्याने मतदारांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना निवेदन दिले होते ,या निवेदनात आम्हाला सोई सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही केली होती मात्र या तक्रारींला कोणीही गांभीर्याने घेतले नाही. त्याच्या निषेध म्हणून झोपड्पट्टीत राहणाऱ्या ८५० मतदारांनी ऐन मतदानाच्या दिवशीच मतदान न केल्याने मतदानावर काही टक्के परिणाम नक्कीच पडणार आहे.