Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

भंडारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भंडारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, मार्च १९, २०२१

 मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा

मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा

 मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा

बालदिवस सप्ताह निमित्त पत्रलेखन स्पर्धेत समिक्षा ढबाले तालुका स्तरावर द्वितीय

(ता. तुमसर, जि. भंडारा) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२० ला संपूर्ण महाराष्ट्रात बालदिवस सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा तुमसर तालुका स्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला असून यात तुमसर पंचायत समिती अंतर्गत सिहोरा केंद्रातील जिल्हा परिषद पूर्व माध्य. शाळा मांडवी येथील इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी समिक्षा अरुण ढबाले हीने विशेष प्राविण्य प्राप्त करत द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला.

     प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनिय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्रकुमार सरोदे, शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. राऊत, पदविधर शिक्षिका के. डी. पटले, सहाय्यक शिक्षक एन. जी. रायकवार तसेच दामोधर डहाळे (वर्गशिक्षक तथा मार्गदर्शक), सर्व पालक व ग्रामस्थ यांनी समिक्षाचे अभिनंदन केले.

बुधवार, मार्च १७, २०२१

मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा

मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा

बालदिवस सप्ताह निमित्त पत्रलेखन स्पर्धेत समिक्षा ढबाले तालुका स्तरावर द्वितीय

 तुमसर, जि. भंडारा- 
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२० ला संपूर्ण महाराष्ट्रात बालदिवस सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा तुमसर तालुका स्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला असून यात तुमसर पंचायत समिती अंतर्गत सिहोरा केंद्रातील जिल्हा परिषद पूर्व माध्य. शाळा मांडवी येथील इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी समिक्षा अरुण ढबाले हीने विशेष प्राविण्य प्राप्त करत द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला.

प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनिय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्रकुमार सरोदे, शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. राऊत, पदविधर शिक्षिका के. डी. पटले, सहाय्यक शिक्षक एन. जी. रायकवार तसेच दामोधर डहाळे (वर्गशिक्षक तथा मार्गदर्शक), सर्व पालक व ग्रामस्थ यांनी समिक्षाचे अभिनंदन केले.

मंगळवार, मार्च ०९, २०२१

जागतिक महिला दिनी मांडवीच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

जागतिक महिला दिनी मांडवीच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

जागतिक महिला दिनी मांडवीच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वेशभूषेतून कर्तृत्ववान महिलांचा जागर, मोफत शालेय गणवेश वाटप व पारितोषिक वितरण

     दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तुमसर तालुक्यातील मांडवीच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थीनींनी वेशभूषेतून विभिन्न क्षेत्रातील भारतीय कर्तृत्ववान महिलांचा जागर केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप केले. तसेच युथ व इको क्लब अंतर्गत फेब्रुवारी महिन्यात शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्राविण्यप्राप्त व सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

     याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून अनिता ढबाले (माता पालक), उपाध्यक्षा शामकला ढबाले (माता पालक),  उद्‌घाटक मंगला ढबाले (सदस्या शाव्यस), तर कैलाश मते (पोलिस पाटील), विजेश ढबाले (ग्रा.पं. सदस्य तथा सचिव पानलोट समिती), भारत ढबाले (सदस्य शाव्यस), अरुण ढबाले (पालक), सरिता मते (माता पालक) तसेच गौतम दहिवले (स.शि. मच्छेरा) हे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषेतील विद्यार्थीनींनी विचार मंचावर उपस्थित आदर्श माता भगिनिंचा गुलाब पुष्प देवून सत्कार केला. त्यानंतर वेशभूषेतील इयत्ता ७ वी ची योगेश्वरी ढबाले (राजमाता जिजाऊ), आचल बुराडे (राणी लक्ष्मीबाई), सलोनी शेंडे (रुपाली चव्हान), खुशबू ढबाले (डॉ. आनंदीबाई जोशी), इयत्ता ६ वी ची राणु मते (इंदिरा गांधी), वेदिका ढबाले (सरोजिनी नायडू), साक्षी ढबाले (सावित्रीबाई फुले), नंदिनी बांडेबुचे (अहिल्याबाई होळकर), सोनम मते (कस्तुरबा गांधी), इयत्ता ५ वी ची श्रद्धा मते (प्रतिभाताई पाटील), समिक्षा ढबाले (रमाबाई), समृद्धी ढबाले (संत मीराबाई), प्रविणा ढबाले (किरण बेदी), मानवी ढबाले (लता मंगेशकर) या विद्यार्थीनींनी अशा विविध भूमिकेतून कर्तृत्ववान महिलांनी केलेल्या कार्याचे व त्यागाचे आत्मवृत्त कथन करून आदर्श जीवनदर्शन घडवून सर्वांना प्रेरणा दिली.

     यानंतर युथ व इको क्लब अंतर्गत फेब्रुवारी महिन्यात शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान, वक्तृत्व, वादविवाद १०० मी. दौड, स्लो सायकलिंग, चमचा गोळी, संगीत खुर्ची, दोरीवरच्या उड्या, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल या विविध स्पर्धांमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्राविण्यप्राप्त विवेक ढबाले, वृषभ मते, परमानंद मते, राहुल शेंडे, प्रज्वल बुराडे, सलोनी शेंडे, खुशबु ढबाले, हर्षल मते, तेजस मते, समृद्धी ढबाले, प्रेम कहालकर व निकिता शेंडे यांना प्रथम क्रमांकाचे इंग्रजी शब्दकोष, सचिन देशमुख, साक्षी ढबाले, नैतिक ढबाले, ओम सपाटे, समिक्षा ढबाले, आचल बुराडे, राणु मते, प्रविणा ढबाले व दर्शल गायकवाड  यांना द्वितीय क्रमांकाचे कंपास पेटी, तर योगेश्वरी ढबाले, मनिष बारस्कर, अंशुल टांगले, कर्तव्य बुराडे व सोनम मते यांना तृतीय क्रमांकाचे चित्रकला वही तर सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून रंगकांडी पेटी असे पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

       सदर प्रसंगी डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे राबण्यात आलेल्या पेलोड क्यूब्स चॅलेंज २०२१ या प्रकल्पांतर्गंत फाउंडेशनच्या महाराष्ट्र कोअर कमिटीचे सदस्य दामोधर डहाळे यांच्या मार्गदर्शनात अवकाशाला गवसणी घालून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसह आणखी ४ जागतिक  विक्रम नोंदवून मांडवी गावाचे नाव वैश्विक पातळीवर पोहोचवणाऱ्या शाळेतील ९ ही विद्यार्थ्यांचे उपस्थित सर्वच मान्यवरांनी गुणगौरव केला. मांडवी शाळेत कोरोनाच्या संकट काळातही वर्षभर विविध ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रमांच्या माध्यमातून 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' ठेवल्याने मुख्याध्यापक पी. डी. राऊत, पदविधर शिक्षिका के. डी. पटले, सहाय्यक शिक्षक एन. जी. रायकवार व दामोधर डहाळे यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच कर्तृत्ववान महिलांच्या जीवनातून आदर्शबोध घेवून त्यास कृतीची जोड देवून आपले जीवन यशस्वी करण्याचा कानमंत्रही दिला.

     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता ७ वी च्या आचल बुराडे हिने केले तर इयत्ता ७ वी च्याच योगेश्वरी ढबाले हीने उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील इयत्ता ५ वी ते ७ वी च्या सर्वच विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. 

मंगळवार, फेब्रुवारी १६, २०२१

घोड्यांना ग्लँडर्स या प्राणघातक आजाराची लागण; औषध नसल्यानं दिलं दयामरण

घोड्यांना ग्लँडर्स या प्राणघातक आजाराची लागण; औषध नसल्यानं दिलं दयामरण

भंडारा- नगरपालीकेच्या हद्दीतल्या २ घोड्यांना ग्लँडर्स या प्राणघातक आजाराची लागण झाल्यानं, त्यांना दयामरण दिलं गेलं. याच महिन्याच्या ६ तारखेला या घोड्यांना हा आजार झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र या आजारावर कोणताही उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं घोड्यांना दयामरण दिलं गेलं. या घोड्यांना शहरातल्या डम्पिंग परिसरात पुरलं आहे. यानंतर परिसरातल्या एकूण १३ घोड्यांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी हरियाणातल्या हिस्सार इथं पाठवले आहेत.

सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१

मानेगाव बाजार येथे सरपंचपदी सौ. कविता संदीप डोरले आणि उपसरपंचपदी अतुल मधुकर कानतोडे यांची निवड

मानेगाव बाजार येथे सरपंचपदी सौ. कविता संदीप डोरले आणि उपसरपंचपदी अतुल मधुकर कानतोडे यांची निवड

भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथील ग्रामपंचायत सरपंच निवडणूकीत सौ. कविता संदीप डोरले यांची बहुमताने निवड करण्यात आली. तर उपसरपंच पदावर अतुल मधुकर कानतोडे यांना निवडण्यात आले. ही निवडणूक श्री. किशोर हरडे यांच्या नेतृत्वाखाली तर श्री. नामदेव निंबार्ते (माजी सैनिक) यांच्या मार्गदर्शनाखाली  लढविण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य श्री. किशोर हरडे, सौ. मनीषा निंबार्ते, सौ. प्रीती घरडे, सौ. अर्चना ठवकर यांनी या निवडीस सहकार्य केले. नवनिर्वाचित कार्यकारिणीने निवडीचे श्रेय समस्त ग्रामस्थांना दिले. या निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी श्रीराम डोरले, झिबल डोरले, मंसाराम डोरले, गोपीचंद बोन्द्रे, शेखर मते, दिलीप ठवकर, भीमराव ढोमने , रामू बारई, कमलेश वासनिक, जयदेव पडोळे, योगेश पडोळे, सौरभ निंबार्ते, रोहित चांदेकर, नागेश डोरले, भूषण बोरकर, रोहित पडोळे यांनी विशेष सहकार्य केले.

मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०२१

डोंगा उलटून महिला ठार, तीन महिला बचावल्या

डोंगा उलटून महिला ठार, तीन महिला बचावल्या

 भंडारा : डोंगा उलटून महिला ठार, तीन महिला बचावल्या; भंडारा तालुक्याच्या गोसे बॅक वाटरच्या बेरोडी नाल्यावरील घटना. धान रोवणीसाठी जाताना अपघात

सविस्तर थोड्याच वेळात 

सोमवार, जानेवारी १८, २०२१

मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या बाल वैज्ञानिकांची गगनभरारी

मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या बाल वैज्ञानिकांची गगनभरारी

मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या बाल वैज्ञानिकांची गगनभरारी

लघु उपग्रह बनवून एकाच वेळी कोरनार जागतिक, आशियाई व भारतीय विक्रमावर नाव

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया तर्फे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१

'राईस सिटी तुमसर' या नावाने १० विद्यार्थ्यांचा १ गट

तुमसर : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ साठी विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून पहिल्यांदाच जागतिक, आशिया आणि भारतीय विक्रम साधण्याची सुवर्ण संधी मार्टिन ग्रुप तर्फे उपलब्ध करून दिली आहे. भारतातील १००० बाल वैज्ञानिकांद्वारे एकाच वेळी १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीत हे विद्यार्थी नक्कीच आपले योगदान देतील. सदर विक्रमावर नाव कोरण्यासाठी महाराष्ट्रातील ३६० बाल वैज्ञानिकांमध्ये मांडवी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब कुटूंबातील प्रज्ञावंत व होतकरू असे इयत्ता ५ वी ते ७ वी च्या ९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून २ दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाले असून १९ जानेवारीला नागपूरच्या सेंट विन्सेन्ट पल्लोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक वर्गास आचल बुराडे (इ. ७ वी), प्रज्वल बुराडे (इ. ५ वी), वेदिका ढबाले (इ. ६ वी), राणु मते (इ. ६ वी), योगेश्वरी ढबाले (इ. ७ वी), समिक्षा ढबाले (इ. ५ वी), खुशबु ढबाले (इ. ७ वी), साक्षी ढबाले (इ. ६ वी), अंशुल टांगले (इ. ५ वी) तसेच तुमसरच्या जनता विद्यालयाची जान्हवी तुमसरे (इ. ७ वी) ह्या दहाही विद्यार्थ्यांना 'राईस सिटी तुमसर' नावाच्या गटाने हजर ठेवण्यासाठी तसेच पालकांना व शाळा प्रशासनास सदर उपक्रमाची संपूर्ण माहिती देवून चर्चा करण्यासाठी १५ जानेवारी रोजी शाळेत सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे कोअर कमिटी मेंबर श्री. दामोधर डहाळे यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट, कार्य याविषयी तसेच स्पेस झोन इंडिया व मार्टिन ग्रुप याविषयीसुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. राऊत, शिक्षक दामोधर डहाळे, पालक शिवशंकर ढबाले, भारत ढबाले, दुर्वास टांगले, रामकिसन बुराडे, कैलास मते (पोलीस पाटील) उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

*🚀विशेष*
🛰️स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय?
🛰️त्याचे विविध भाग कुठले? व त्यांचे कार्य कसे चालते?
🛰️हेलियम बलून म्हणजे काय?
🛰️या प्रकारच्या उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवतात?
🛰️या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर?, कुठले सॉफ्टवेअर वापरले जातात?
🛰️अशी सर्व माहिती व प्रशिक्षण खास महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना मराठी मधूनच देण्यासाठी प्रशिक्षक सज्ज आहेत.
🛰️जगात सर्वात कमी २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम इतक्या वजनाचे १०० उपग्रह बनवून त्यांना ३५ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायन्टिफिक बलूनद्वारे दिनांक ७ फेब्रुवारीला तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथून अवकाशात सोडून प्रस्थापित केले जातील.
🛰️उपग्रह एका केस मध्ये फिट केले जाणार असून या केस सोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल.
🛰️तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील.
🛰️या पेलोड सोबत काही झाडांच्या बीया सुद्धा पाठवण्यात येत आहेत. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल आणि यामुळेच विद्यार्थ्यांची एकाच वेळी जागतिक विक्रम, आशिया विक्रम आणि भारतीय विक्रमात नोंद करुन सहभागी
प्रत्येक विद्यार्थ्यास वरील तिनही प्रमाणपत्रे स्वतंत्ररित्या मिळतील.

विद्यार्थ्यांमध्ये स्पेस संबधी संशोधनाची आवड निर्माण करणारा तसेच त्यांना भविष्यात करियर बनविताना नक्कीच उपयुक्त ठरणारा
हा उपक्रम कलाम कुटुंबियांद्वारे हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम् येथून राबविला जात असून संपूर्ण भारतात डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, स्पेस झोन इंडिया यांच्या मार्गदर्शनात, मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने, मिलिंद चौधरी, ठाणे (जनरल सेक्रेटरी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन) व महाराष्ट्रामध्ये मनिषा ताई चौधरी, नाशिक (महाराष्ट्र राज्य समन्वयक) यांचे नेतृत्वात तसेच दामोधर डहाळे (कोअर कमिटी मेंबर) यांचे सहकार्याने यशस्वी होत आहे.

मंगळवार, नोव्हेंबर २४, २०२०

राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या : डॉ. परिणय फुके

राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या : डॉ. परिणय फुके

भंडारा जिल्ह्यात झंझावाती संपर्क दौरा

भंडारा- पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. त्याची ओळख त्याच्या कर्तृत्वाने असावी. समाजातील विविध समस्यांची जाणीव ठेवून त्यासंबंधी कार्य करणारा तो असावा. पदवीधरांनो आपला प्रतिनिधी म्हणून राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले.

भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या मोहाडी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. लाखनी येथील प्रचारसभेत पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने सुद्धा पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी समर्थन दिले. संदीप जोशी यांनी लाखनी शहरातील समर्थ विद्यालयात दिवंगत बापुसाहेब चिखलीकर यांच्या स्मृतीला वंदन केले व शिक्षकवृंदांशी संवाद साधला.

संदीप जोशी यांनी मंगळवारी (ता.२४) भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, जवाहरनगर आदी ठिकाणी संपर्क दौरा केला.
विविध ठिकाणी झालेल्या सभेमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, माजी राज्यमंत्री आमदार डॉ.परिणय फुके, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, भाजपा भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, महिला आघाडी अध्यक्षा गीताताई कोंडेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, डॉ. कल्याणी भुरे, डॉ. हिवराज जमीरवार, डॉ. गोविंद कोठाणी, जिल्हा महामंत्री मुन्नाभाऊ फुंडे, तुमसर शहर अध्यक्ष ॲड.आशिष कुबडे, तुमसर ग्रामीण अध्यक्ष ॲड. विजय पारधी, महिला नेत्या कुंदाताई वैद्य, मोहाडी येथे विकास फाऊंडेशनचे हंसराजजी आगासे, यादवराव कुंभारे, अफरोज पठाण, माजी सभापती हरीशचंद्र बंदाटे, सेवक चिन्नलोरे, चंद्रशेखर भिवगडे, बंडूभाऊ बनकर, मेहताष ठाकुर, लाखनी येथे आल्हाद भांडारकर, मधुकर लाड, धनंजय घाटबांधे, भरत खंडाईत, शिक्षक परिषदेचे के.डी. रोकडे, महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे रवी रहांगडाले, साकोली येथे डॉ.ब्रम्हानंद करंजेकर, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, भाजपा तालुका अध्यक्ष लखन बर्वे, रेखाताई भाजीपाले, सैय्यद मुजानद्दीन, घनश्याम निखाडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मतदार उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी राज्यमंत्री आमदार डॉ परिणय फुके म्हणाले, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा पंडीत बच्छराज व्यास, गंगाधरराव फडणवीस यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड आहे. पदवीधरांचा प्रतिनिधी हा पदवीधरच असावा, असे सांगणाऱ्या प्रा. अनिल सोले यांचाही गड आहे. पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. त्याची ओळख त्याच्या कर्तृत्वाने असावी, असा कर्तृत्ववान उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिला, याचा आनंद आहे.
संदीप जोशी यांनी नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेते, लघु उद्योग मंडळाचे अध्यक्ष, महापौर या सगळ्याच पदांना त्यांनी न्याय दिला, लोकांच्या चिरकाल स्मरणात राहतील अशी असंख्य कामे केली. भविष्यातही ते उत्तमच कामे करतील, तरूणांचे, शिक्षकांचे, पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावतील, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतील यात काही शंका नसावी, कार्यकर्ता ते महापौर असा संदीप जोशी यांचा प्रवास आहे. यावेळी पक्षाने संदीप जोशी या युवा कार्यकत्त्यास संधी दिली आहे. आपण आपली पहिली पसंती त्यांच्या पारड्यात टाकू, एक चांगली निवड करू. अव्याहत कामे करणाऱ्या आपल्या संदीप जोशींचा सन्मान करू, असे आवाहनही माजी राज्यमंत्री आमदार डॉ परिणय फुके यांनी केले.

आमदार विनोद अग्रवाल यांचेही समर्थन

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनीही पदवीधर निवडणुकीसाठी संदीप जोशी यांना पूर्ण समर्थन दिले. समर्थनासह विनोद अग्रवाल यांनी गोंदिया शहरातील विशाल लॉन येथे भव्य सभा घेतली. सभेमध्ये बहुसंख्य पदवीधर, शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.

असे करा मतदान
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे मतदान हे मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) होते. यामध्ये मतदारांचे नाव आणि त्यापुढे रकाना असतो. उमेदवाराच्या नावापुढील रकान्यामध्ये मतदारांना पसंतीक्रम द्यायचे असते. हा पसंतीक्रम केवळ अंकातच असावा. उमेदवाराच्या नावापुढे 1 हा अंक काढावा. तो मराठी, इंग्रजी किंवा रोमण लीपीमध्ये लिहिता येते. मात्र रोमण अंकात लिहिल्यास मत वैध होण्याची शक्यता जास्त असते. मतदार नोंदणी केलेल्या सर्व पदवीधरांनी १ डिसेंबर २०२० रोजी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या नावापुढे रोमण लीपीमध्ये I (एक) असा अंक काढून त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

शुक्रवार, ऑक्टोबर २३, २०२०

रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त; एक लाख 15 हजार रुपयांचा दंड

रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त; एक लाख 15 हजार रुपयांचा दंड

तलाठी गस्ती पथकाची कारवाई

रेती चोरांची खैर नाही, तालुक्यात विशेष कारवाई मोहीम

संजीव बडोले/ प्रतिनिधी
नवेगावबांध दि. 23 ऑक्टोंबर:-
तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांनी रेती चोरी करणार्‍या विरुद्ध कारवाई करत बंदया येथे विनापरवाना अवैधरित्या एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. सदर प्रकरणी ट्रॅक्टर मालकावर 1लाख 15 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई 22 ऑक्टोंबर रोज गुरुवारला करण्यात आली आहे. सदर मालकाने दंडाची रक्कम भरल्यामुळे त्याचा ट्रॅक्टर ट्राली त्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तलाठी गस्ती पथकातील तलाठी पुंडलिक कुंभरे,टेंभरे,निमकर,बिसेन, यांचे पथक गस्त घालत असताना बंध्या महागाव येथे सकाळी 6.20 वाजता प्रदीप आत्माराम मस्के राहणार शिरोली यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच 35,एजी 8455  ,ट्राली क्रमांक एम एच 35 ,एफ 3168 उमेश देवाजी वघारे राहणार सिरोली हा चालक  अवैधरीत्या विनापरवाना अवैध एक ब्रास रेतीची वाहतूक करताना आढळला. तलाठी पथकाने पंचनामा करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये ट्रॅक्टर चालक व मालकावर कारवाई करण्यात आली आहे. ट्रॅक्टर मालक प्रदीप आत्माराम मस्के व चालक उमेश देवाजी वघारे यांनी  महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक 18 दिनांक 12 जानेवारी 2018 नुसार कलम 48 (आठ) अन्वय ट्रॅक्टर एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक केल्या प्रकरणी रक्कम रुपये 1लाख व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अध्यादेश 2015 चे कलम 48( 7) बाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयीन परिपत्रक दिनांक 11 नोव्हेंबर 2016 अन्वय निर्गमित केलेल्या खनिजाच्या बाजार भावाच्या पाच पट व स्वामित्वधन याप्रमाणे पाच ब्रास रेती चा बाजार भाव रुपये तीन हजार प्रमाणे पाच पंधरा हजार अधिक स्वामित्वधन चारशे रुपये अशी एकूण 1 लाख 15 हजार 400 रुपये दंड ठोठावण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी तहसीलदार विनोद मेश्राम अर्जुनी-मोर यांनी सदर प्रकरण उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्याकडे पाठविले ट्रॅक्टर मालक प्रदीप मस्के यांनी दंडाची रक्कम शासन खजिना जमा केली त्यामुळे रेती जप्त करून खाली ट्रॅक्टर व ट्राली त्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.  सदर मालकाने दंडाची रक्कम भरल्यामुळे त्याचा ट्रॅक्टर ट्राली त्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.         जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका व भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर व साकोली या शेजारच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशी माहिती आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील  महालगाव,सुकळी,परसोडी, पळसगाव घाटावरून रेतीची अवैध तस्करी नवेगावबांध ला होत असल्याची माहिती आहे. महालगाव पळसगाव, गोंडउमरी येथील व अन्य ठिकाणचे तसेच काही स्थानिक रेती तस्कर रेती अवैध वाहतुकीचा गोरखधंदा बऱ्याच दिवसापासून करीत असल्याची माहिती आहे.
अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालया अंतर्गत  गौणखनिजांची अवैध वाहतूक व चोरी रोखण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी  यांचे 27 गस्ती पथक तहसीलदार अर्जुनी मोरगाव विनोद मेश्राम यांनी नियुक्त केले आहेत. तालुक्यात होणाऱ्या अवैध रेती सारख्या गौण खनिजांची चोरी करणाऱ्या तस्करांवर हे पथक नजर ठेवून आहेत. त्यामुळे या महसूल विभागाच्या दणक्यामुळे  आता रेती चोरणाऱ्यांची खैर नाही. तालुका अर्जुनी मोरगाव येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी दिली आहे.

मंगळवार, ऑक्टोबर ०६, २०२०

वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा

वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा

अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे जाहीर आवाहन

भंडारा : दि. ५ ऑक्टोबर
अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे महाराष्ट्राच्या तळागाळातील विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी म्हणून दि. १५ ऑक्टोंबर २०२० ला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' निमित्ताने वाचन संस्कृती व चळवळ अधिक समृद्ध करण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली असून जास्तित - जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे फाऊंडेशन तर्फे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

     कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे जरी शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्न पुर्तीकरिता वाचन विकास घडवून आणणे काळाची गरज आहे. याअनुषंगाने सदर ऑनलाईन स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थी व पाल्यास सहभागी होण्यासाठी संबंधित शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेवून याबाबत पालकांना अवगत करून ई - मेल आयडी तयार करण्यास मार्गदर्शन करावे. कारण सदर प्रश्न संच सोडवल्या नंतर सहभाग प्रमाणपत्र ई-मेल वरच पाठवण्यात येणार असल्याने ऑनलाईन प्रश्न संच सोडवताना नाव व ईमेल आयडी आवश्यक आहे.

       सदर राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा ही इयत्ता १ ली ते ५ वी चा पहिला गट, इयता ६ वी ते ८ वी चा दुसरा गट तसेच इयता ९ वी ते १० वी चा तिसरा गट या तीन गटात होणार असून ऑनलाईन प्रश्नमंजूषा सोडवण्याकरिता आवश्यक लिंक अग्निपंख फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यांच्या व्हाट्सअॅप समुहांमध्ये दि. १० ऑक्टोंबरला पुरविण्यात येईल. या स्पर्धेत शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्वच व्यवस्थापनेच्या व संवर्गाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
       शिक्षक व पालक यांनी नोंद घेवून या राज्य स्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत जास्तीत - जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचे अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे राज्य समन्वयक गजानन गोपेवाड, महिला राज्य समन्वयक जयश्री सिरसाटे तसेच नागपूर विभागीय समन्वयक दामोधर डहाळे यांनी जाहीर आवाहन केले आहे आहे.

गुरुवार, सप्टेंबर १०, २०२०

 गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडले

गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडले

जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर दि.10 सप्टेंबर : गोसीखुर्द धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने गोसेखुर्द धरणाचे एकूण 17 दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे सावली, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, मुल आदी तालुक्यातील नदी काठावरील गावातील नागरिकांना व प्रशासनाला  सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडल्याने 2067 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच, रात्रभरात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असून 5 ते 10 हजार क्युमेंक्स पर्यंत  विसर्ग वाढू शकतो.

मंगळवार, एप्रिल २८, २०२०

भंडारा:त्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील 145 संशयितांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला

भंडारा:त्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील 145 संशयितांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला

संग्रहित 
नागपूर/ललित लांजेवार:
भंडारा- नागपूर येथे आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ४०९ घशातील स्त्रावाच्या नमुन्यांपैकी २८६ निगेटिव्ह आले तर २७ एप्रिल रोजी एक पॉझिटिव्ह आला. 

१२२ अहवालाची प्रतीक्षा. 

गराडा येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील १४५ संशयितांचे नमुने नागपुरला पाठवले आहेत.

तर क्षयरोगाच्या आजाराने आयसोलेशन वार्डात भरती असलेल्या रुग्णाच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.

सोमवार, एप्रिल २७, २०२०

ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला

ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला

ललित लांजेवार/:
ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला, 45 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे जिल्ह्यधिकारी एम.प्रदीपचंदन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

जिल्ह्यातील गराडा आणि मेंढा या गावाला केंटेन्मेंट झोन म्हणून केले जाहीर. गराडा व मेंढा गाव पूर्णतः लाँकडाऊन करण्यात आले आहे. सभोवतालचा तीन कि. मी. परिसर सील करण्यात आला.

मंगळवार, मार्च १७, २०२०

वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या

वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या

पवनी - येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून अज्ञात इसमानेउडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक आज तारीख 17 मार्चला सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. 

 भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून सायंकाळी साडेचारच्या वाजेच्या दरम्यान ४५ ते ५० वयाच्या इसमाने उडी मारून आत्महत्या केली. पवनी पोलिस स्टेशनचे पगारे संतोष चव्हाण, प्रेमशहा सयाम, विलास बानाईत सिंधपुरी , रुयाळचे पोलीस पाटील नागपुरे यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला.

 सदर मृत इसम अंदाजे पन्नास वर्षाचा असून अजून पर्यंत याची ओळख पटली नाही. त्याच्या उजव्या हातावर "अर्जुन"असे गोदन तून अंगात काळी पॅन्ट व पांढरी टी-शर्ट घातलेली असून टी-शर्ट च्या डावीकडे इंग्रजी एच असे लाल अक्षरात प्रिंट आहे. सदर मृत इस मास कोणी ओळखत असल्यास त्यांनी पवनी पोलिस स्टेशनला कळविण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी केले आहे.

बुधवार, नोव्हेंबर १३, २०१९

विदर्भातील प्रसिद्ध खर्ऱ्यावरून २ पोलिसात हाणामारी:४ पोलीस निलंबित

विदर्भातील प्रसिद्ध खर्ऱ्यावरून २ पोलिसात हाणामारी:४ पोलीस निलंबित

मुखशुद्धीचा प्रकार खर्ऱ्याने केले निलंबन
नागपूर/ललित लांजेवार:
दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाबाहेर पोलिस व वकिलात झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतांनाच भंडाऱ्यात खर्ऱ्या खाण्याच्या वादावरून दोन पोलिसातच फ्री-स्टाईल रंगली,

जिल्हा मुख्यालयातील पोलीस कर्मचारी सोमवारी सकाळी आरोपींना घेवून पोलिसांच्या वाहनाने जिल्हा रुग्णालयात पोहोचले.

वैद्यकीय तपासणी आटोपून आरोपींना वाहनापर्यंत आणण्यात आले. एका पोलिसाने आरोपीला खर्रा दिला हे दुसऱ्या कर्मचाऱ्यांला खटकले,त्याने या गोष्टीचा विरोध केला असता खर्रा देणाऱ्या पोलिसाला विरोध केल्याचा राग आला अन याचे रुपांतर चक्क हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस एकमेकांना मारत असल्याचे दृश्य पाहून नागरिक अचंबित झाले होते. एकमेकांना बुटाने मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना खर्रा देण्यावरुन पोलिसांत वाद झाल्याची माहिती आहे.

नागरिकांच्या संरक्षणाची आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे दोन पोलीस एकमेकांना बुटाने मारत होते. अनेकजण या मारहाणीचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करित होते. शहरात दिवसभर पोलिसांच्या हाणामारीचीच चर्चा सुरु होती, 

त्यामुळे खर्रा मैत्री जोडू शकतो तर मैत्री तोडू देखील शकतो,आणि निलंबीत होण्यासाठी कारण देखील ठरू शकतो 

या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला. जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचली,येथील रुग्णालयासमोर पोलिसांत झालेल्या हाणामारीचा 3० सेकंदाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला याची तात्काळ दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेत चौघांनाही निलंबित केले आहे. सदर चौघेही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी घेवून गेले होते. त्याठिकाणी दोघांमध्ये गणवेशातच कर्तव्यावर असतांना हाणामारी झाली. णेवशात हाणामारी केल्याप्रकरणी चार पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तात्काळ निलंबित केले. विकास गायकवाड, निलेश खडसे, विष्णु खेडीकर आणि मनोज अंबादे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. अंबादे मोटर परिवहन विभागात तर इतर तिघे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत.

ही घटना पोलीस दलाची जनमानसातील प्रतीमा मलीन करणारी असल्याने त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

रविवार, नोव्हेंबर ०३, २०१९

अज्ञान वाहनाच्या धडकेत बापलेक ठार

अज्ञान वाहनाच्या धडकेत बापलेक ठार

 मनोज चिचघरे/पवनी:
नागपूर ते नागभिड रोडवरील भुयार ते कांपा डेपा रोडवर झालेल्या अपघातात बाप लेक जागीच ठार झाले.

कांपा डेपां येथुन मोटारसायकलने तांदूळ चूगंडी घेऊन येत असताना भुयार गावाजवळ सांयकाळच्या ६ वाजताच्या सुमारास अज्ञान वाहणाणे धडक दिल्याने शालिक कारमोरे, वय ५५ , नाव , विवेक शालिक कारमोरे वय ३० हे दोघेही जांगीच ठार झाले. पुढील तपास पवनी पोलिस करीत आहे. भुयार गावांमध्ये दुःखा चे वातावरण निर्माण झाले आहे. या कारमोरे परिवारावर दुःखाचे मोठे डोंगर कोसळले आहे.

बुधवार, ऑक्टोबर ३०, २०१९

भंडारा; गॅस सिलिंडरचा स्फोट;एक गंभीर जखमी

भंडारा; गॅस सिलिंडरचा स्फोट;एक गंभीर जखमी

 भंडारा/मनोज चिचघरे :
पवनी पासुन दहा किलोमीटरवर निलज फाटा येथे स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडर मधून अचानक रेगुलेटर बाहेर निघाला व स्पोर्ट झाले, १ वाजता दूपारची ची घटना,त्यावेळी सहपरिवार घरी होते.

आग विझवण्यासाठी गेले असताना ,कैलास किसन देशमुख मुक्काम निलज फाटा, हे गंभीर जखमी झाले,त्याला सामान्य रुग्णालयमध्ये उपचाराकरिता नेण्यात आले आहे,या घटनेत घरगुती वस्तू तांदूळ, गहू, भांडे, कपडे , दागीने व चांती,रोक रंकमं जळून खाक झाले,

लवकरात लवकर पंचनामा करून देशमुख परिवाराला. नुकसान भरपाई देण्यात यावे,असी मागणी गावकऱ्यांनी केली, आहे,

शनिवार, सप्टेंबर २८, २०१९

भाजप आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

भंडारा/प्रतिनिधी :

तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक

महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्या विनयभंगप्रकरणी अटक

18 सप्टेंबरला विनयभंगाचा गुन्हा दाखल 

भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना आज सकाळी त्यांच्या घरून भंडारा पोलिसांनी अटक केली. 

महिला पोलीस उपनिरीक्षक कर्तव्यावर असताना त्यांना आमदार व भाजप शहर अध्यक्ष यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप होता. चौकशीअंती आज महिला पोलीस उपनिरीक्षक यांचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यानंतर आमदाराने जामीन घेण्यास नकार देत कारागृहात जाण्यास पसंत केले.

सोमवार, सप्टेंबर ०२, २०१९

भंडारा विधानसभा: बौद्ध समाजाला उमेदवारी द्या

भंडारा विधानसभा: बौद्ध समाजाला उमेदवारी द्या

मनोज चिचघरे, भंडारा/जिल्हा प्रतिनिधी
भंडारा विधानसभा क्षेत्रातून अनुसूचित जातीतील बौद्ध उमेदवाराला उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपाचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष अॅड.महेंद्र गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडारा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा.डाॅ. परिणयजी फुके व संघटन मंत्री डाॅ. उपेंद्र कोठेकर व जिल्हाअध्यक्ष इंजि. प्रदिप पडोळे  यांना पत्राद्वारेे केली आहे. 
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पवनी हे पूर्वी विधानसभा क्षेत्र होते. आता नव्याने विधानसभा क्षेत्राची पुनर्रचना करण्यात आली असून आता हे क्षेत्र भंडारा विधानसभा क्षेत्राचे नावाने ओळखले जाते.
हे क्षेत्र सन 2009पासून अनुसूचित जातीसाठी राखीव असून सन 2009 मध्ये भाजपा सेना युतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर निवडून आले होते. तर सन 2014 मध्ये भाजपा स्वतंत्र लढली होती व भाजपाचे अॅड. रामचंद्र अवसरे निवडून आले असून हे दोन्ही उमेदवार अनुसूचित जातीतील चांभार या जातीचे आहेत. 
उपरोक्त दोन्ही निवडणुकीत अनुसूचित जातीतील महार बौद्ध जातीच्या उमेदवाराला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे सन 2019 मध्ये होवू घातलेल्या निवडणुकीत महार बौद्ध जातीच्या उमेदवाराला संधी देणे आवश्यक आहे. 
महत्त्वाचे म्हणजे सन 2009 पासून सन 2019 पर्यंतच्या दहा वर्षात फार मोठ्या संख्येने विविध पक्षांचे महार बौद्ध जातीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेतला असल्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. 
त्यामुळे येत्या ऑक्टोबर मध्ये होवू घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भंडारा विधानसभा क्षेत्रातून महार बौद्ध जातीच्या उमेदवाराला संधी देण्यात यावी,अशी मागणी भाजपाचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. महेंद्र गोस्वामी यांनी केली आहे.