मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा
बालदिवस सप्ताह निमित्त पत्रलेखन स्पर्धेत समिक्षा ढबाले तालुका स्तरावर द्वितीय
(ता. तुमसर, जि. भंडारा) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२० ला संपूर्ण महाराष्ट्रात बालदिवस सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा तुमसर तालुका स्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला असून यात तुमसर पंचायत समिती अंतर्गत सिहोरा केंद्रातील जिल्हा परिषद पूर्व माध्य. शाळा मांडवी येथील इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी समिक्षा अरुण ढबाले हीने विशेष प्राविण्य प्राप्त करत द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला.
प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनिय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्रकुमार सरोदे, शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. राऊत, पदविधर शिक्षिका के. डी. पटले, सहाय्यक शिक्षक एन. जी. रायकवार तसेच दामोधर डहाळे (वर्गशिक्षक तथा मार्गदर्शक), सर्व पालक व ग्रामस्थ यांनी समिक्षाचे अभिनंदन केले.