वेशभूषेतून कर्तृत्ववान महिलांचा जागर, मोफत शालेय गणवेश वाटप व पारितोषिक वितरण
दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तुमसर तालुक्यातील मांडवीच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थीनींनी वेशभूषेतून विभिन्न क्षेत्रातील भारतीय कर्तृत्ववान महिलांचा जागर केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप केले. तसेच युथ व इको क्लब अंतर्गत फेब्रुवारी महिन्यात शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्राविण्यप्राप्त व सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून अनिता ढबाले (माता पालक), उपाध्यक्षा शामकला ढबाले (माता पालक), उद्घाटक मंगला ढबाले (सदस्या शाव्यस), तर कैलाश मते (पोलिस पाटील), विजेश ढबाले (ग्रा.पं. सदस्य तथा सचिव पानलोट समिती), भारत ढबाले (सदस्य शाव्यस), अरुण ढबाले (पालक), सरिता मते (माता पालक) तसेच गौतम दहिवले (स.शि. मच्छेरा) हे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषेतील विद्यार्थीनींनी विचार मंचावर उपस्थित आदर्श माता भगिनिंचा गुलाब पुष्प देवून सत्कार केला. त्यानंतर वेशभूषेतील इयत्ता ७ वी ची योगेश्वरी ढबाले (राजमाता जिजाऊ), आचल बुराडे (राणी लक्ष्मीबाई), सलोनी शेंडे (रुपाली चव्हान), खुशबू ढबाले (डॉ. आनंदीबाई जोशी), इयत्ता ६ वी ची राणु मते (इंदिरा गांधी), वेदिका ढबाले (सरोजिनी नायडू), साक्षी ढबाले (सावित्रीबाई फुले), नंदिनी बांडेबुचे (अहिल्याबाई होळकर), सोनम मते (कस्तुरबा गांधी), इयत्ता ५ वी ची श्रद्धा मते (प्रतिभाताई पाटील), समिक्षा ढबाले (रमाबाई), समृद्धी ढबाले (संत मीराबाई), प्रविणा ढबाले (किरण बेदी), मानवी ढबाले (लता मंगेशकर) या विद्यार्थीनींनी अशा विविध भूमिकेतून कर्तृत्ववान महिलांनी केलेल्या कार्याचे व त्यागाचे आत्मवृत्त कथन करून आदर्श जीवनदर्शन घडवून सर्वांना प्रेरणा दिली.
यानंतर युथ व इको क्लब अंतर्गत फेब्रुवारी महिन्यात शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान, वक्तृत्व, वादविवाद १०० मी. दौड, स्लो सायकलिंग, चमचा गोळी, संगीत खुर्ची, दोरीवरच्या उड्या, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल या विविध स्पर्धांमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्राविण्यप्राप्त विवेक ढबाले, वृषभ मते, परमानंद मते, राहुल शेंडे, प्रज्वल बुराडे, सलोनी शेंडे, खुशबु ढबाले, हर्षल मते, तेजस मते, समृद्धी ढबाले, प्रेम कहालकर व निकिता शेंडे यांना प्रथम क्रमांकाचे इंग्रजी शब्दकोष, सचिन देशमुख, साक्षी ढबाले, नैतिक ढबाले, ओम सपाटे, समिक्षा ढबाले, आचल बुराडे, राणु मते, प्रविणा ढबाले व दर्शल गायकवाड यांना द्वितीय क्रमांकाचे कंपास पेटी, तर योगेश्वरी ढबाले, मनिष बारस्कर, अंशुल टांगले, कर्तव्य बुराडे व सोनम मते यांना तृतीय क्रमांकाचे चित्रकला वही तर सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून रंगकांडी पेटी असे पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
सदर प्रसंगी डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे राबण्यात आलेल्या पेलोड क्यूब्स चॅलेंज २०२१ या प्रकल्पांतर्गंत फाउंडेशनच्या महाराष्ट्र कोअर कमिटीचे सदस्य दामोधर डहाळे यांच्या मार्गदर्शनात अवकाशाला गवसणी घालून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसह आणखी ४ जागतिक विक्रम नोंदवून मांडवी गावाचे नाव वैश्विक पातळीवर पोहोचवणाऱ्या शाळेतील ९ ही विद्यार्थ्यांचे उपस्थित सर्वच मान्यवरांनी गुणगौरव केला. मांडवी शाळेत कोरोनाच्या संकट काळातही वर्षभर विविध ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रमांच्या माध्यमातून 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' ठेवल्याने मुख्याध्यापक पी. डी. राऊत, पदविधर शिक्षिका के. डी. पटले, सहाय्यक शिक्षक एन. जी. रायकवार व दामोधर डहाळे यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच कर्तृत्ववान महिलांच्या जीवनातून आदर्शबोध घेवून त्यास कृतीची जोड देवून आपले जीवन यशस्वी करण्याचा कानमंत्रही दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता ७ वी च्या आचल बुराडे हिने केले तर इयत्ता ७ वी च्याच योगेश्वरी ढबाले हीने उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील इयत्ता ५ वी ते ७ वी च्या सर्वच विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.