गेल्या काही वर्षांत वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वेचे जाळे वाढू लागले,कमी खर्चात, जलदगतीने आणि जंगलातुन जाणाऱ्या कमी अंतराच्या ट्रेन रूटचे जाळे तयार होऊ लागले.अनेक ट्रेन तर वन्यजीव भ्रमंनमार्ग आणि अभयारन्यातून गेल्या आहेत,त्यातही गती वाढविल्या मुळे अनेक हत्ती,वाघ,बछडे, बिबट,अस्वल,गवे, हरीण आणि असंख्य लहान वन्यजीव दरवर्षी मारले जात आहेत.
चंद्रपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग असाच संवेदनशील असून ह्या रुळावर परवा वाघाचे बछडे मारल्या गेले असून चंद्रपुर जवळ 2013 मध्ये 2 आणि 2018 मध्ये 3 वाघाचे बछडे चिरडले गेले. गवे, बिबट,हरीण,आणि हजारो लहान वन्य जीव तर दररोज कुठे ना कुठे मारली जातात,अनेक तक्रारी करूनही रेल्वे आणि वन्यजीव विभाग फारसे गंभीर दिसत नाही.
2019 मध्ये रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत गुरेढोरे, सिंह वाघ आणि लेपर्ड सह 32,000 पेक्षा जास्त प्राणी मारले गेले आहेत. 2019 मध्ये ट्रेनने 3,47 9 वन्य प्राण्यांना ठार मारले . यामध्ये गेल्या तीन वर्षांत हत्तींचा सुद्धा समावेश आहे, आतापर्यंत 60 आणि यावर्षी ते 20 जूनपर्यंत पाच जण हत्ती ठार झाले होते. 2016 मध्ये 7,945 वन्य प्राण्यांना रेल्वे रुळावर ठार मारण्यात आले होते, 2017 मध्ये ही संख्या 11,683 आणि 2018 मध्ये वाढली आहे, ती 12,625 गेली होती.
वरील वन्यजीव मृत्युची गंभीरता पाहता रेल्वेने जंगलातून जाणाऱ्या सर्व मार्गासाठी दर किमी अंतरात अंडरपास,मार्गाला जाळीचे कुंपण, रात्री 40 तर दिवसा 50 किमी ताशी गती असावी रुळावर खाद्यपदार्थ फेकू नये,रुळावर वन्यजीव असल्याच्या अत्याधुनिक सूचना यंत्रणा लावणे बंधनकारक केले जावे आणि वन्यजीव व्यवस्थापन आराखडा तयार करून उपाययोजना कराव्या अशी मागणी ग्रीन प्लानेट सोसायटी च्या वतीने प्रा सुरेश चोपणे ह्यानी रेल्वे प्रशासन,राज्य, केंद्रीय वन्यजीव विभाग,व्याघ्र प्राधिकरण कडे केली आहे.