मुखशुद्धीचा प्रकार खर्ऱ्याने केले निलंबन
नागपूर/ललित लांजेवार:
दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाबाहेर पोलिस व वकिलात झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतांनाच भंडाऱ्यात खर्ऱ्या खाण्याच्या वादावरून दोन पोलिसातच फ्री-स्टाईल रंगली,
जिल्हा मुख्यालयातील पोलीस कर्मचारी सोमवारी सकाळी आरोपींना घेवून पोलिसांच्या वाहनाने जिल्हा रुग्णालयात पोहोचले.
वैद्यकीय तपासणी आटोपून आरोपींना वाहनापर्यंत आणण्यात आले. एका पोलिसाने आरोपीला खर्रा दिला हे दुसऱ्या कर्मचाऱ्यांला खटकले,त्याने या गोष्टीचा विरोध केला असता खर्रा देणाऱ्या पोलिसाला विरोध केल्याचा राग आला अन याचे रुपांतर चक्क हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस एकमेकांना मारत असल्याचे दृश्य पाहून नागरिक अचंबित झाले होते. एकमेकांना बुटाने मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना खर्रा देण्यावरुन पोलिसांत वाद झाल्याची माहिती आहे.
नागरिकांच्या संरक्षणाची आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे दोन पोलीस एकमेकांना बुटाने मारत होते. अनेकजण या मारहाणीचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करित होते. शहरात दिवसभर पोलिसांच्या हाणामारीचीच चर्चा सुरु होती,
त्यामुळे खर्रा मैत्री जोडू शकतो तर मैत्री तोडू देखील शकतो,आणि निलंबीत होण्यासाठी कारण देखील ठरू शकतो
या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला. जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचली,येथील रुग्णालयासमोर पोलिसांत झालेल्या हाणामारीचा 3० सेकंदाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला याची तात्काळ दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेत चौघांनाही निलंबित केले आहे. सदर चौघेही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी घेवून गेले होते. त्याठिकाणी दोघांमध्ये गणवेशातच कर्तव्यावर असतांना हाणामारी झाली. णेवशात हाणामारी केल्याप्रकरणी चार पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तात्काळ निलंबित केले. विकास गायकवाड, निलेश खडसे, विष्णु खेडीकर आणि मनोज अंबादे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. अंबादे मोटर परिवहन विभागात तर इतर तिघे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत.
ही घटना पोलीस दलाची जनमानसातील प्रतीमा मलीन करणारी असल्याने त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.