ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी महावितरणच्या वतीने सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. अशाच उपाययोजनाचा एक भाग म्हणून उच्चदाब ग्राहकांना वीजबिलांची माहिती, ऑनलाईनद्वारे वीजबिलांचा भरणा, वीजवापराचा सविस्तर तपशील तसेच वीजबिल किंवा इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणने उच्चदाब ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे ‘उच्चदाब ग्राहक पोर्टल’ (एचटी कन्झुमर पोर्टल) सुरू केलेले आहे.
या पोर्टलवरून उच्चदाब ग्राहकांना स्वत:चे मोबाईल क्रमांक, ई-मेल व इतर तत्सम माहिती अद्ययावत करता येणार असून प्रतितास, प्रतिदिवस तसेच मासिक वीज वापराची माहिती इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ‘बील सिमुलेशन मेनू’ व ‘कम्पॅरिझन विथ पीअर्स ’ हे दोन मेनू उच्चदाब ग्राहकांच्या द्दष्टिने महत्वाचे असून ‘बील सिमुलेशन मेनू’ द्वारे उच्चदाब ग्राहकांस आपल्या स्वत:च्या वीज वापराचे अंदाजपत्रक तयार करता येऊ शकते. त्यामुळे त्याला वीज वापराचा व त्या अनुषंगाने वीजबिलाचा पूर्वानुमान काढून तसे नियोजन करता येणे शक्य होईल.
या पोर्टल मध्ये ‘कम्पॅरिझन विथ पीअर्स ’ या मेनूद्वारे उच्चदाब ग्राहकांला त्याच्या उद्योगाशी संबंधित अन्य उद्योगांमधील वीज वापराची व स्वत:च्या वीज वापराची तुलना करता येईल. अशी विविध उपयुक्त माहितीचा लाभ उच्चदाब ग्राहकांना या पोर्टलच्या माध्यमातून घेता येईल. हे पोर्टल महावितरणच्याwww.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोटर्लचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.