मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या बाल वैज्ञानिकांची गगनभरारी
लघु उपग्रह बनवून एकाच वेळी कोरनार जागतिक, आशियाई व भारतीय विक्रमावर नाव
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया तर्फे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१
'राईस सिटी तुमसर' या नावाने १० विद्यार्थ्यांचा १ गट
तुमसर : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ साठी विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून पहिल्यांदाच जागतिक, आशिया आणि भारतीय विक्रम साधण्याची सुवर्ण संधी मार्टिन ग्रुप तर्फे उपलब्ध करून दिली आहे. भारतातील १००० बाल वैज्ञानिकांद्वारे एकाच वेळी १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीत हे विद्यार्थी नक्कीच आपले योगदान देतील. सदर विक्रमावर नाव कोरण्यासाठी महाराष्ट्रातील ३६० बाल वैज्ञानिकांमध्ये मांडवी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब कुटूंबातील प्रज्ञावंत व होतकरू असे इयत्ता ५ वी ते ७ वी च्या ९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून २ दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाले असून १९ जानेवारीला नागपूरच्या सेंट विन्सेन्ट पल्लोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक वर्गास आचल बुराडे (इ. ७ वी), प्रज्वल बुराडे (इ. ५ वी), वेदिका ढबाले (इ. ६ वी), राणु मते (इ. ६ वी), योगेश्वरी ढबाले (इ. ७ वी), समिक्षा ढबाले (इ. ५ वी), खुशबु ढबाले (इ. ७ वी), साक्षी ढबाले (इ. ६ वी), अंशुल टांगले (इ. ५ वी) तसेच तुमसरच्या जनता विद्यालयाची जान्हवी तुमसरे (इ. ७ वी) ह्या दहाही विद्यार्थ्यांना 'राईस सिटी तुमसर' नावाच्या गटाने हजर ठेवण्यासाठी तसेच पालकांना व शाळा प्रशासनास सदर उपक्रमाची संपूर्ण माहिती देवून चर्चा करण्यासाठी १५ जानेवारी रोजी शाळेत सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे कोअर कमिटी मेंबर श्री. दामोधर डहाळे यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट, कार्य याविषयी तसेच स्पेस झोन इंडिया व मार्टिन ग्रुप याविषयीसुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. राऊत, शिक्षक दामोधर डहाळे, पालक शिवशंकर ढबाले, भारत ढबाले, दुर्वास टांगले, रामकिसन बुराडे, कैलास मते (पोलीस पाटील) उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन हार्दिक शुभेच्छा दिल्यात.
*🚀विशेष*
🛰️स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय?
🛰️त्याचे विविध भाग कुठले? व त्यांचे कार्य कसे चालते?
🛰️हेलियम बलून म्हणजे काय?
🛰️या प्रकारच्या उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवतात?
🛰️या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर?, कुठले सॉफ्टवेअर वापरले जातात?
🛰️अशी सर्व माहिती व प्रशिक्षण खास महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना मराठी मधूनच देण्यासाठी प्रशिक्षक सज्ज आहेत.
🛰️जगात सर्वात कमी २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम इतक्या वजनाचे १०० उपग्रह बनवून त्यांना ३५ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायन्टिफिक बलूनद्वारे दिनांक ७ फेब्रुवारीला तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथून अवकाशात सोडून प्रस्थापित केले जातील.
🛰️उपग्रह एका केस मध्ये फिट केले जाणार असून या केस सोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल.
🛰️तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील.
🛰️या पेलोड सोबत काही झाडांच्या बीया सुद्धा पाठवण्यात येत आहेत. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल आणि यामुळेच विद्यार्थ्यांची एकाच वेळी जागतिक विक्रम, आशिया विक्रम आणि भारतीय विक्रमात नोंद करुन सहभागी
प्रत्येक विद्यार्थ्यास वरील तिनही प्रमाणपत्रे स्वतंत्ररित्या मिळतील.
विद्यार्थ्यांमध्ये स्पेस संबधी संशोधनाची आवड निर्माण करणारा तसेच त्यांना भविष्यात करियर बनविताना नक्कीच उपयुक्त ठरणारा
हा उपक्रम कलाम कुटुंबियांद्वारे हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम् येथून राबविला जात असून संपूर्ण भारतात डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, स्पेस झोन इंडिया यांच्या मार्गदर्शनात, मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने, मिलिंद चौधरी, ठाणे (जनरल सेक्रेटरी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन) व महाराष्ट्रामध्ये मनिषा ताई चौधरी, नाशिक (महाराष्ट्र राज्य समन्वयक) यांचे नेतृत्वात तसेच दामोधर डहाळे (कोअर कमिटी मेंबर) यांचे सहकार्याने यशस्वी होत आहे.