दिव्यांग बांधवांसाठी साहित्य बॅंक सुरु करणार - आ. किशोर जोरगेवार
मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर : समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी मला मुंबई येथील सर्वोच्च सभागृहात पाठविले आहे. दिव्यांग बांधवही याच समाजाचा घटक आहे. त्यामूळे विकासासोबतच समाजात दिव्यागांबदलही विचार केला गेला पाहिजे अशी आमची भुमीका असून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. दिव्यांग बांधवांची गरज लक्षात घेता तसेच त्याच्या सोईसाठी आपण 26 जाणेवारी पासून दिव्यांग बांधव साहित्य बॅंक हा उपक्रम सुरु करत आहोत. या बॅंकेत जमा होणारे साहित्य दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येणार असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
श्री सतपाल महाराज यांच्या प्रेरणेतून मानव उत्थान सेवा समीतीच्या वतीने पडोली येथील यशवंत नगर येथे दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात मानव उत्थान सेवा समिती चंद्रपुर च्या प्रभारी कांता बाईजी, रत्नाकर निर्बड शिक्षक, मुख्याध्यापीका अल्काताई रघाताटे, पडोलीचे माजी सरपंच भारत पाटील बलकी, वरारकर गुरुजी, मानव उत्थान सेवा समीतीचे जिल्हा प्रमूख आमले आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. दिव्यांग बांधवाचा स्नेहमीलन कार्यक्रम, दिव्यांग बांधवांना तिनचाकी सायकलचे वाटप, असे अनेक उपक्रम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने वेळोवेळी घेतले जात आहे. आता दिव्यांग बांधवांच्या साहित्यांची बॅंक यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु करण्यात येणार असून 26 जानेवारीला या बॅंकेचा शुभारंभ करण्याचे आमचे नियोजन आहे. या बॅंकेच्या माध्यमातून गरजू दिव्यांग बांधवांना सहित्य वाटप करण्यात येणार आहे. अनेकांच्या घरी दिव्यांगांच्या कामी येतील असे साहित्य पडले असतील. त्या साहित्यांचा उपयोग आता सदर नागरिकांना नसला तरी हे साहित्य गरजू दिव्यांग बांधवांच्या कामी येवू शकतात त्यामूळे अशा नागरिकांनी त्यांच्या कडे असलेले हे साहित्य सदर बॅंकेत जमा करावे याकरिता त्यांनी जैन भवन जवळील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी केले. लोकसहभागातून हा उपक्रम नक्कीच यशस्वी होणार अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिव्यांग बांधवांसाठी अनेक सेवाभावी संस्था काम करत आहे. त्यांच्या कामाची दखल घेतल्या गेली पाहिजे असेही ते यावेळी बोलले. दिव्यांग बांधवांमधील कलागुनांना वाव मिळावी याकरीता त्यांना प्रशिक्षण दिल्या जावे या करीताही येत्या काळात आम्ही काम करणार आहोत. यात अनेक सेवाभावी संस्थांचे आम्हाला सहकार्य लागणार आहे. चंद्रपूरकरांची नेहमी देण्याची भावणा ठेवली असते त्यामूळे अशा चांगल्या उपक्रमात चंद्रपूरकर नक्कीच सहकार्य करणार अशी आशाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले.
SHARE THIS