धनंजय मुंडे विरोधात निदर्शने
नागपूर : आज दिनांक 18 /१/२०२१ ला संविधान चौक नागपुर येथे नागपुर महिला मोर्चा चा वतीने सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी केलेल्य बलात्कार तथा लैंगिक अत्याचाराच्या विरोधात नागपुर शहर महिला मोर्चा ने धरणे आंदोलन व निषेध जाहिर केला , नारे व निदर्शन केले,धनंजय मुंडे यांनी राजीनामा जर दिला नाही तर आम्ही महिला मोर्चा रस्त्यावर उतरू असे सांगितले होते म्हणून आज महिला मोर्चाने रस्त्यावर उतरून धनंजय मुंडे यांच्या विरोधात निदर्शने केली व हे आंदोलन राज्यव्यापी आंदोलन आहेराज्यात एकाच दिवशी एक सोबत हे आंदोलन करत आहो,
त्यांच्या फेसबुक वरील वक्तव्यावरून त्यांना एकूण पाच अपत्य असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची वस्तूस्थिती निवडणूक आयोगा पासून लपवून ठेवून त्यांनी निवडणूक आयोगाची व पर्यायाने जनतेची फसवणूक केली आहे ,
मान्य मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेवर आजपर्यंत भाष्य केलेले नाही अशा घटनेसाठी आपल्या मंत्र्यांना पाठीशी घातले तर जनतेला कायदा आणि पोलिस प्रशासनावर विश्वास राहणार नाही म्हणून सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मान्य मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा त्वरित घ्यावा व नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा त्वरित द्यावा, निदर्शनाला व आंदोलनानंतर महिला मोर्चा कलेक्टर ठाकरे यांना निवेदन दिले..
आजच्या आंदोलनात प्रामुख्याने माननीय .आ. कृष्णा खोपडे यांनी आंदोलनात आपला निषेध जाहीर केला तसेच प्रदेश सचिव अर्चना डेहनकर.
सौ अश्विनी ताई जिचकार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा. किर्तिदा ताई अजमेरा
नीता ठाकरेअध्यक्ष महिला मोर्चा नागपूर शहर, दिव्या धुरडे. वर्षा ठाकरे
मनीषा धावडे उपमहापौर मनपा. मनिषा कोठे . अनुसया
गुप्ता,सीमा ढोमणे आनंदा येवले. निशा भोयर.लता वरखेडे, सरिता माने, वर्षा चौधरी, रेखा दयाने, ज्योती देवघरे व इतर उपस्थित होत्या.